Total Pageviews

Monday, August 27, 2012

* राज ठाकरे रोख ठोक *

* राज ठाकरे रोख ठोक *
रझा अकादमीच्या मौर्च्यात जो काही धुडघूस घातला गेला त्याची जराहि लाज उरली असेल  तर गृहमंत्री आर आर पाटील आणि पोलीस आयुक्त अरुण पटनायक यांनी आपले राजीनामे द्यावे. पोलीस आणि प्रसारमाध्यमांवर हात उचलनार्याना तिथल्या तिथेच फोडून काढायला पाहिजे. पोलीसान वर हात उचलतात म्हणजे काय? राज ठाकरे यांनी मुद्याला हात घालत रझा अकादमीसारख्या सभेला परवानगी मिळते आणि आम्ही पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्याचा  निषेध  करण्यासाठी  मौर्चा आणि  सभा काढली  तर त्याला  हे परवानगी  नाकारतात.म्हणून मी  पोलिसांचे  मनोधैर्य  वाढवण्यासाठी  गिरगाव  ते आझाद मैदान हा मौर्चा काढला आहे.
* टार्गेट बांगलादेशी आणि पाकिस्तानी!!!
राज ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी यांना टार्गेट करत ह्या ज्या टोळ्या येतात त्या उत्तर प्रदेश आणि बिहार मधून चौपर, काठ्या, घेऊन  येथे धुडगूस घालतात. त्यात त्यांना एक बांगलादेशी पासपोर्ट हि सापडले आहे. फक्त इथे येण्याचे हे सिंगल पासपोर्ट आहे हे त्यांनी दाखवून दिले. आणि हे सांगताना त्यांनी ह्या बांगलादेशी टोळ्या आणि पाकिस्तानी टोळ्यांना भविष्यात  रोखणे  हे खूप गरजेचे आहे.
 * मायावती आणि रामदास आठवले गेले कुठे ?
       त्यादिवशी लखनौ  मध्ये गौतम बुद्धाच्या प्रतिमेची विटंबना केली गेली तेव्हा मायावती, रामदास आठवले, स.सु.गवई आणि प्रकाश आंबेडकर होते कुठे? रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर ह्यांना मात्र महाराष्ट्रात इंदू मिल, इंदू मिल एवढेच करता येते त्यात काय त्यांना बंगला बांधायचा आहे. मग त्यावेळी हे सर्व गेले कुठे.
* महाराष्ट्र धर्म *
राज ठाकरे आरोळी देताना बोलले की मजा फक्त एकच धर्म तो म्हणजे महाराष्ट्र धर्म त्यांच्या मध्ये जो कोणी येईल त्याची गय केली जाणार नाही.
                                                         
                                                                                                                    Ni3more