आपल्याला सर्वाना अगदी परिचयाचे असलेला सहयाद्री वरील लोकमानस हा कार्यक्रम नेहमीच
वेगवेगळ्या विषयावर आपले कार्यक्रम सादर करीत असतो. मी वेब जर्नलिज़म हा कोर्स करीत असल्याने मला ह्या कार्यक्रमा मध्ये जाण्याचे भाग्य लाभले नवीन अनुभव मिळेल म्हणून मी कार्यक्रमाला गेलो होतो.
२ ऑक्टोबर २०१२ सह्याद्री वाहिनीला चाळीस वर्ष पूर्ण झाली ह्या निमित्ताने ५ ऑक्टोबर २०१२ रोजी सह्याद्री लोकमानस ह्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक जयू भाटकर ह्यांनी १९७२ ते २०१२ सह्याद्रीची वाटचाल हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्ताने पत्रकारितेशी संबधित असणार्या मुला मुलीना बोलावण्यात आले होते. गेले चाळीस वर्ष काम करून निवृत्त झालेल्या आजी माजी कर्मचार्यांना ह्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून
बोलावले होते. त्यात ज्येष्ट दूरदर्शन अधिकारी डॉ. विश्वास मेहंदळे, याकुब सईद, विनायक चासकर, अशोक दुबे, रविवारचे राजे म्हणून प्रसिद्ध असणारे अरविंद मर्चंड, गुंडाप्पा विश्वनाथ, चिमणराव अश्या एकामागोमाग प्रसिद्ध कार्यक्रम देणाऱ्या विजया धुमाळे त्या आल्या होत्या. त्याच बरोबर अभियांत्रिक क्षेत्रातले डी.स. ल प्रसाद, के न सोमनाथ, नीना राऊत, महाराष्ट्राची लोकधारा सारखा प्रसिद्ध कार्यक्रम देणाऱ्या किरण चित्रे, तसेच तुम्हाला आम्हांला अगदी परिचयाचे असणारे सुप्रसिद्ध निवेदक प्रदीप भेंडे, सुधीर गंडगीळ, आणि देवेंद्र भुजबल तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातले आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निवेदिका ह्या समीर जोशी ह्या होत्या. निवेदिका समीर जोशी ह्यांचे सूत्रसंचालन हे तर अवर्णनीय आणि सुंदर होते.
डॉ.विश्वास मेहंदळे यांनी आपली आठवण सांगताना त्यांनी सुभाषिताचा आधार घेऊन आपल्या भावना प्रकट केल्या ते बोलत होते कि नवीन माध्यमांमध्ये काम करताना अनुभव हा भारत दुर्लभे जन्म महाराष्ट्र अति दुर्लभ आमन्त्राम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनवश्यं अयोग्य पुरुष नास्ती. याकूब सईद यांनी पहिल्याच दिवशी पहिला कार्यक्रम कसा आठ मिनिट उशिरा सुरु झाला आणि एक आशा पारेख यांची एक मस्त आठवण सांगून कार्यक्रमामध्ये अजून रंगत आणून दिली. अशोक यांनी सांगितले कि निर्माता म्हणून आम्ही कलाकारांना मोठे केले नाही तर कलाकारांनी दूरदर्शन ला मोठे केले. तसेच त्यादरम्यान सुधीर गंडगीळ यांनी याकूब जिना टाकलेली गुगली ती अशी ह्या कार्यक्रमात बसले असताना तुम्ही तुमच्याच कार्यक्रमाची निर्मिती करीत असताना तुमच्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलेले असेल का? बदलेल्या प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेऊन ह्या गुगलीने कार्यक्रमात अजून रंगत आणून सोडली.
अरविंद मर्चंड यांनी हेमा मालिनीची आठवण सांगताना सांगितले आपण आता जसे सह्याद्री वाहिनीला चाळीस वर्ष पूर्ण झाले तसे त्यावेळेला सह्याद्री वाहिनी ला पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती म्हणून आम्हाला दिल्लीवरून एक प्रोग्राम करायला सांगितला होता तर त्यावेळी आम्ही हेमा मालिनीला घेवून प्रोग्राम करायचा ठरवला पण एक अडचण होती त्याकाळात हेमा मालिनी हि प्रसिद्ध अभिनेत्री होती आणि आणि मानधन देणे काही परवडणारे नव्हते तर त्यांनी ठरवले कि आपण त्यांना आपला कार्यक्रम करण्यासाठी विनंती करू आणि हेमा मालिनी बोलल्या दूरदर्शन हे माध्यम एवढे मोठे आहे आणि आम्हा कलाकारांना मोठे करण्या मागे त्यांचे हाथ मोठे आहेत म्हणून मी मानधन न घेता कार्यक्रमा मधे सहभागी होईल. तसेच प्रदीप भिडे यांनी मुक्त बर्वे यांनी त्यांना वृत्त वाचनाची संधी कशी दिली आणि त्यांनी १९९३ बॉम्ब ब्लास्ट झाले असताना मजलदरमजल करत कसे सह्याद्री मध्ये पोहचले आणि कश्या दोन दिवस बातम्या सांगितल्या त्याचा थरारक अनुभव सर्वांशी शेअर केला. सुधीर गांडगीळ यांनी सर्व अभियांत्रिक अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली तसेच एक किस्सा सांगताना त्यांनी बाळासाहेब यांच्या एका किस्स्याची आठवण सांगताना सांगितले कि बाळासाहेब आणि व.पु.काळे पंचविशीच्या कार्यक्रमाला आले असताना बाळासाहेब बोलले व पु काळे आणि मी एकाच कॉलोनीत राहत असल्याने दोघांना एकत्र बोलावले आहे का.तसेच सुधीर गांडगीळ यांनी असे मनोरंजन केले अश्या प्रकारे एक एक किस्से आठवणी कार्यक्रम चालू असताना रंगत गेले. हा कार्यक्रम सक्सेसफुल होण्यामागे कारण म्हणजे तेथील टेक्निकल स्टाफ आणि कॅमरमन यांनी त्यावर घेतलेली मेहनत दिसली आणि कार्यक्रम कसा करावा हे सह्याद्री कडून इतर वहिन्यानी शिकले पाहिजे. सह्याद्री हे एक उत्तम उदहारण आजच्या वहिनीच्या समोर आहे. डॉ. विश्वास मेहंदळे आणि किरण चित्रे यांनी सांगितल्या प्रमाने हल्लीचा मीडिया कसा फास्ट फोर्वार्ड्स होत चालला आहे आणि कसा जहिरातिंच्या मागे लागला आहे. कसा आपली संस्कृति विसरून जहिरातिच्या मागे लागला आहे ते पटवून दिले आणि सह्याद्रिने नुसते जहिरातिच्या मागे न लागुन दुसर्या न्यूज़ चेन्नल कडून चांगले घेवुन त्याचे अनुकरण न करता कसे स्वताला पुढे नेले पाहिजे हे सांगितले. तसेच ह्या प्रोग्राम मध्ये तब्बसुम गोविल यांना फ़ोन करून त्यानी सर्व आपल्या सहकर्यंशी आपली आठवण शेअर करताना त्यानी एक शाहिरी केली ती अशी
"जो बीत गए है वो जमाने नहीं आते
जो बीत गए है वो जमाने नहीं आते
आते है नए लोग लेकिन पुराने नहीं आते!!! "
अश्याप्रकारे त्यानी आपली आठवण सांगितली. तसेच ह्या कार्यक्रमात सुहासिनी मुळगावकर ह्यांची एक क्लिप दाख्वान्यत आली आणि त्यांची आठवण दाखवण्यात आली.
ni3more