Total Pageviews
Friday, September 20, 2013
Tuesday, September 3, 2013
हेच तर खरे प्रेम असते !!!
त्या दिवशी झालो मी थोडा क्षणभंगूर
मी कुठे होतो ते मलाच माझे काळत नव्हते
डोळ्यातून आसवांचा पाऊस धो धो वाहू लागला
काय झाले माझेच मलाच कळेना
तिच्या आठवणीत जगताना झालो मी थोडा कावरा-बावरा
का कोणास ठाऊक झालो मी पुरता बेचैन
ती जवळ नसताना तेव्हा तिचेच गीत गात होतो
तिच्या आठवणीत सारी रात्र जागत होतो
का कोणास ठाऊक झालो होतो मी पुरता बेचैन
ती कधी आली आयुष्यात ते कधी कळलेच नाही
ती कधी आयुष्यातून निघून गेली ते हि कळले नाही
प्रेम म्हणजे त्याग समर्पण असते का ???
कधी आली आणि कधी निघून गेली
ते कळलेच नाही
काळीज तर खूप तुटते
या तुटलेल्या काळजा सोबत जगावे लागते
मारावे लागते
हेच तर खरे प्रेम असते
प्रेम असते !!!
--Ni3more
मी कुठे होतो ते मलाच माझे काळत नव्हते
डोळ्यातून आसवांचा पाऊस धो धो वाहू लागला
काय झाले माझेच मलाच कळेना
तिच्या आठवणीत जगताना झालो मी थोडा कावरा-बावरा
का कोणास ठाऊक झालो मी पुरता बेचैन
ती जवळ नसताना तेव्हा तिचेच गीत गात होतो
तिच्या आठवणीत सारी रात्र जागत होतो
का कोणास ठाऊक झालो होतो मी पुरता बेचैन
ती कधी आली आयुष्यात ते कधी कळलेच नाही
ती कधी आयुष्यातून निघून गेली ते हि कळले नाही
प्रेम म्हणजे त्याग समर्पण असते का ???
कधी आली आणि कधी निघून गेली
ते कळलेच नाही
काळीज तर खूप तुटते
या तुटलेल्या काळजा सोबत जगावे लागते
मारावे लागते
हेच तर खरे प्रेम असते
प्रेम असते !!!
--Ni3more
Friday, May 31, 2013
विचार !!!
मी नाही बोलत माझे विचार बोलतात
मी नाही बोलत माझे विचार बोलतात
माझ्या जगण्याला नेहमी माझ्या विचारांची जोड असते
विचारांची जोड असते !!!
आयुष्याच्या वाटेवरती विचारांची गरज असते
विचार नसतील तर आयुष्य पुढेच जाऊ शकत नाही
आयुष्याच्या वाटेवरती विचार करणे मस्ट असते
आपल्या विचारांना मुळेच आपल्याला शक्ती मिळते
आपल्याला शक्ती मिळते !!!
या शक्तीच्या जोरावर आपण माणूस आणि जग जिंकू शकतो
आयुष्याच्या वाटेवरती विचार करणे मस्ट असते
विचारांना नेहमी शब्दांची धार असते
आयुष्याच्या वाटेवरती विचार करणे मस्ट असते
विचार करणे मस्ट असते !!!
-- ni3more
लाईफ हि अशीच असते !!!
लाईफ हि अशीच असते
कधी चढ तर कधी उतार असते
लाईफ हि अशीच असते !!
गुंडाळलेल्या धाग्यांचा गुच्चा सोडवत सोडवत
लाईफ हि जगयाची असते
लाईफ हि अशीच असते
लाईफ हि अशीच असते !!
या काट्याच्या वाटेवरती
पाय तुडवत तुडवत
मार्ग काढायचे असते
भले हृदयात कितीही जखमा झाल्या तरी
मागे वळून पहायचे नसते
मित्रानो लाईफ हि अशीच असते
लाईफ हि अशीच असते
वाट काढत काढत
लाईफ जगायची असते
लाईफ जगायची असते !!
created by
- ni3moreThursday, May 30, 2013
Thursday, May 16, 2013
स्पॉट फिक्सिंग केल्या प्रकरणी एस.श्रीशांत सह सहा जणांना अटक .
मुंबई- आयपीएल सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून
राजस्थान रॉयल्सचा खेळाडू एस.श्रीशांत याच्या सह त्याच्या सहचार्याना आज (गुरुवार)
अटक करण्यात आली. याप्रकरणात सात बुकींना देखील अटक करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या पोलीस पथकाने
मरिन ड्राईव्ह येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये छापा टाकून
स्पॉट फिक्सिंग केल्या प्रकरणी राजस्थान रॉयल्सचा खेळाडू
एस.श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलिया यांना अटक करण्यात आली.आणि त्याच्या
सह सात बुकींना देखील अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या कडून पोलिसांना काही
पैशे आणि स्पॉट फिक्सिंगचे साहित्य जप्त करण्यात आले. आयपीएल सामन्यात मोहाली आणि
मुंबईतील आयपीएल सामन्यांचा काही भाग फिक्स करण्यात आला होता, असे प्राथमिक
चौकशीत उघडकीस आले आहे.
हा छापा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे आयुक्त एस. एन.
श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आला होता. याप्रकरणी अजून काही जणांना
अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Wednesday, May 15, 2013
धक धक गर्ल ' माधुरी दिक्षित हिच आज वाढदिवस .
अदानी, सौंदर्याने आणि नृत्यानी घायाळ करणारी धक धक गर्ल ' माधुरी दिक्षित हिच आज वाढदिवस . माधुरी दिक्षित चा जन्म १९६७ सालातला तिने आज ४६ व्या वर्षात पदार्पण केले. माधुरीला लग्ना नंतर काही मोजक्याच सिनेमात काम केले. माधुरी दिक्षित ने परिंदा, राम लखन , बेटा , खलनायक , हम आपके ही कोन, दिल तो पागल है , पुकार , देवदास असे प्रसिद्ध आहेत.
डॉलर च्या तुलनेत रुपया ५ पैशाने वधारला.
डॉलरच्या तुलनेत रुपया ५ पैशाने वधारला. आंतरबँक विदेशी चलन विनिमयामध्ये निर्यातदारांनी अमेरिकी डॉलरची विक्री केल्यानंतर रुपयाची किंमत पाच पैशांनी वाढून डॉलरमागे 54.76 रुपये एवढी झाली.
याशिवाय देशांतर्गत समभाग बाजार सुरू होताच जोरदार उलाढाली झाल्यामुळे आणि डॉलरच्या तुलनेत युरो वाढत असल्याने रुपयाला त्याचा आधार मिळाला, असे विदेशी चलन विनिमय करणाऱ्या वितरकांनी सांगितले.
काल रुपया डॉलर च्या तुलनेत ५४.८१ रुपयां एक महिन्याच्या आधी रुपया आठ पैशांनी बंद होऊन खाली आला होता.
Tuesday, May 14, 2013
शरण येण्यास नाही मिळणार मुभा.
नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला शरण येण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही असे आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले. संजय दत्त 1993 मध्ये झालेल्या स्पोटा प्रकरणी दोषी आहे. याप्रकरणी संजय दत्तला न्यायालयात शरण येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संजय दत्तची मुदत वाढ देण्याची याचिका याआधीच न्यायालयाने फेटाळून लावली
आता दोन निर्मात्यांनी संजय दत्तला मुदत वाढ देण्याची याचिका
दाखल केली होती. आज यावर सुनावणी होत न्यायालयाने याचिका फेटाळत 16 मे रोजीच शरण
येण्यास सांगितले आहे. संजय दत्त ला याधीच चार आठवड्यांची मुदत न्यायालयाने दिली
होती. पण संजय दत्त ने सहा महिन्याची मुदत मागितली होती.
संजय दत्तला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच
वर्षांची शिक्षा सुनाविलेली आहे. त्यातील दीड वर्षांची शिक्षा त्याने भोगली असून,
आणखी साडेतीन वर्षे त्याला कारागृहात रहावे लागणार आहे.
रॅनबॅक्सीला 50 कोटी अमेरिकन डॉलरचा दंड.
वॉशिंग्टन - जपान मधील रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीला औषधे सुरक्षा संबंधी आरोपांवरून 50 कोटी अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाने रॅनबॅक्सीविरुद्ध
कागदपत्रांमध्ये फेरफार आणि औषध निर्माण झाल्यानंतर सुरक्षाबाबत कंपनीवर आरोप
लावले होते.गेल्या अनेक दिवस पासून रॅनबॅक्सी कंपनी अमेरिकेच्या कायदा मंत्रालया
विरुद्ध न्यायालयात केस लढत होती. अखेर आज हा निकाल रॅनबॅक्सी कंपनीच्या विरोधात
लागला.
या निकालानुसार रॅनबॅक्सी कंपनीला दंडाच्या स्वरुपात
अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाला 50 कोटी अमेरिकन डॉलर द्यावे लागणार आहेत.
रॅनबॅक्सी कंपनीची स्थापना 1961 मध्ये भारतात झाली होती.
मात्र, 2008 मध्ये ही कंपनी 45 कोटी डॉलरला जपानमधील दाइची सांक्यो ग्रुपला विकली.
कंपनीचे व्यवहार 43 देशांमध्ये चालतो.या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण
साहनी हे आहेत.
Wednesday, May 8, 2013
कर्नाटकात कॉंग्रेसला सत्ता स्थापणे साठी स्पष्ट बहुमत.
बंगळूर - ता ७ कर्नाटकात कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाला
(भाजप) हातावर तुरी देत विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवले. येडीयुरप्पा यांचा
कर्नाटक जनता पक्षामुळे भाजपला निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांची तिसर्या
स्थानापर्यंत पिछेहाट झाली .
कर्नाटकात रविवारी (ता. 5) झालेल्या मतदानानंतर आज (बुधवार)
सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली होती. सकाळी साडेदहाच्या दरम्यान
कर्नाटकमधील पहिला विजय नोंदविला गेला. पुत्तुर मतदारसंघातून काँग्रेसच्या शकुंतला
शेट्टी यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. तर बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण
समितीचे उमेदवारही आघाडीवर आहेत.
२००८ मध्ये दक्षिणेत ( कर्नाटकात) पहिल्यांदाच सत्ता स्थापन
करू शकलेल्या भाजप पक्षाला, मात्र ह्या वेळेला आपली सत्ता टिकवता आली नाही आणि पाय
उतार व्हावे लागले आहे. सत्ता
स्थापनेसाठी २२४ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता असते. पण
आता पर्यंत मिळालेल्या आकड्यात कॉंग्रेसला ११६ जागा मिळवल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस)
पक्षाने मुसंडी मारत ४२ जागा जिंकल्या आहेत. भाजपला अवघ्या ३७ जागा जिंकता आल्या
आहेत.येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाला (केजेपी) 12 जागांवर जिंकता आल्या
आहेत.
कर्नाटकातील निकालाबाबत मतदानोत्तर चाचण्यामध्ये चाचण्यांमध्ये
(एक्झिट पोल) निकाल काढला असता भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावे लागेल आणि कॉंग्रेस
ला ११० ते ११३ जागा मिळतील असे
वर्तवण्यात आले होते.जर कॉंग्रेस ला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर येडियुरप्पा
यांच्या कर्नाटक जनता पक्षातील काही नेत्यांनी दर्शविली होती, पण सत्तास्थापनेसाठी
इतर कोणत्याही पक्षाची मदत लागणार नाही, असा विश्वास कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त
केला होता. काँग्रेस नेत्यांचा हा विश्वास खरा ठरला आहे. आघाडी मिळाल्याने
काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंगळूर आणि नवी दिल्लीतील पक्ष कार्यालयाबाहेर फटाके
वाजवून आनंद साजरा केला.
Monday, May 6, 2013
रुपया डॉलरच्या मुकाबले १४ पैशाने वधारला.
रुपया डॉलरच्या मुकाबले १४ पैशाने वधारला.
आज सकाळी सुरुवातीलाच रुपया विदेशी मुद्राच्या प्रवाह मध्ये निर्यात करांच्या द्वारे अमेरिकी ताज्या व्यापारात इंटरबैंक विदेशी मुद्राच्या सुरवातीच्या कारोबार मध्ये डॉलरच्या मुकाबले रुपया १४ पैशाने वधारला. रुपयाचे मुल्य आज ५३.८० रुपये एवढे झाले. आखाती देशात फ़ोरेक्स डीलर च्या मते आज युरो आणि डॉलरच्या विरुद्ध इक्विटी बाजार ने स्थानिक मुद्रेचा समर्थन केल. शुक्रवारी डॉलर च्या मुकाबले रुपया १३ पैशाने खाली आला ५३.९३ ला बंद झाला.
नगर जवळ दरोडेखोरांनी ट्रॅव्हल्स बस लुटली.
नगर जवळ दरोडेखोरांनी ट्रॅव्हल्स बस लुटली.
नगर-सोलापूर रस्त्यावरील मिरजगाव येथे असलेल्या मानव हायवे पेट्रोल पंपावर रविवारी आठ दरोडेखोराने एका खाजगी ट्रॅव्हल्स बस वर दरोडा घातला.
मिळालेल्या माहितीनुसार काल रविवारी, हि बस शनिशिंग नापुर हून आंध्र प्रदेशात जायला निघाली होती. हि बस पेट्रोल पंपावर आली असताना बस अडवून दरोडेखोरांनी त्यामध्ये प्रवेश केला. दरोडेखोरांनी तलवार आणि इतर हत्यारांचा लोकांना धाक दाखवून त्यांच्या कडील सोने - चांदी लुटले. तसेच पैशे हि लुटले. काही लोकांना मारहाण हि केली. दरोडेखोरांनी लाखो रुपयाचा ऐवज लुटल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिस घटना स्थळी दाखल झाले. दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.
Tuesday, April 9, 2013
गुढी उत्क्रांतीची....!!!
प्रभू रामचंद्र रावणाचा पराभव करून अयोध्येला परत आले तेव्हा
सर्व अयोध्यावासीयांनी गुढ्या-तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले! तोरण हे
मांगल्याचे प्रतीक आहे, तर गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. खालच्या पातळीवरून वरच्या
पातळीवर उठणे हा खरा विजय. दगडाच्या अवस्थेतून प्राणी, प्राण्यातून मनुष्य, अन्
मनुष्यातून देव (नराचा नारायण) अशा उत्क्रांतीचे प्रतीक म्हणजे गुढी. आजच्या दिवशी
अहंकाराचा नाश झाला, राक्षसत्वाचा नाश झाला व स्त्रीप्रतिष्ठा, सृजनप्रतिष्ठा
पुन्हा प्रस्थापित झाली. तेव्हापासून गुढीचा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.
खरे तर आध्यात्मिक प्रगतीची गुढी असते. चांगल्या जीवनाची
अंतिम पायरी म्हणजे आध्यात्मिक उंची गाठणे. ज्ञानाची उपासना करणाऱ्या ऋषिमुनींचे
कार्य म्हणजे मनुष्याच्या कल्याणाचे असलेले सगळे मनुष्यापर्यंत पोचवणे. त्यातूनच
एका ऋषींनी व्याकरण लिहिले, दुसऱ्याने आयुर्वेदाचे आरोग्यशास्त्र लिहिले,
तिसऱ्याने नाट्यशास्त्र लिहिले. मानवतेच्या हिताचे काम करणारे ते ऋषिमुनी व तीच
आध्यात्मिक प्रगती. स्वतःच्या इच्छा, वासना यांच्या पलीकडे जाऊन मनुष्यमात्राच्या
इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी सगळ्या विश्वात
परमेश्वर पाहिला व "सर्वेऽत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः' हे
लक्षात ठेवून कार्य केले. ही परंपरा म्हणजे गुढी.
पाण्याचा संयोग होऊन तयार झालेले सूक्ष्म जीव, जमिनीवर
सरपटणारे जीव, हवेत उडणारी चिलटे-मच्छर, प्राणी, पक्षी, जंगली प्राणी असे करत करत
शेवटी माणसाची उत्पत्ती झाली. प्रगती करण्यासाठी माणसाने काही प्राणी माणसाळवले.
आध्यात्मिक प्रगतीला सर्वांत मोठा अडथळा असतो भीतीचा, आणि सर्वांत मोठी भीती असते
मृत्यूची. मोठ्यात मोठा रक्ताला चटावलेला क्रूर वाघही अग्नीला घाबरतो. त्यामुळे
माणसाला अग्नीचा शोध लागल्यानंतर त्याची भीती कमी झाली. अग्नी टिकविण्यासाठी
माणसाला इलाज सापडला तेव्हा त्याची भीती एकदम कमी झाली. त्याच्या लक्षात आले, की
अग्नीसारखा अग्नी आपण माणसाळवू शकतो व त्याचा आपल्या कामासाठी उपयोग करून घेऊ
शकतो, तर वाघ-सिंहाची काय कथा! त्याने मांजर, कुत्रा, बकरी वगैरे प्राणी
माणसाळवले. अग्नीची प्राप्ती व अग्नीपासून संरक्षण हा मनुष्याच्या उत्क्रांतीतील
पहिला टप्पा. लहान मुलांना भीती वाटते तेव्हा आपल्याला कोणीतरी मदत करावी, आपले
कोणीतरी संरक्षण करावे अशी त्यांची अपेक्षा असते व तशी गरजही असते. त्यातूनच काहीही
न करता आपल्याला जास्तीत जास्त मिळावे ही प्रवृत्ती व धारणा निर्माण होते.
माझे-तुझे हा भाव उत्पन्न होतो व दुसऱ्याची भीती वाटते. त्याचप्रमाणे "माझे'
म्हणता येईल याची वृद्धी व्हावी, हा नैसर्गिक भावही त्यांच्यात असतो. या पहिल्या
भावाला "शूद्रवृत्ती' नाव दिले गेले. त्यानंतर शूद्रत्वाकडून वैश्यभाव, वैश्यभावाकडून
क्षत्रियभाव व क्षत्रियभावाकडून ब्राह्मणत्वभाव असे उत्क्रांतीचे पुढील चार टप्पे.
ब्राह्मणत्वभावाकडून मनुष्यमात्राच्या कल्याणाची योजना आखणारा हा मोक्षमार्ग,
मुक्तिमार्ग अशा तऱ्हेने उत्क्रांतीची कल्पना दृढ झाली. हे चार वर्णभाव जन्माने
मिळत नसतात; पण समाजाने स्वतःच्या सोयीसाठी म्हणा वा इतर कारणामुळे म्हणा,
शूद्राच्या पोटी जन्मलेला तो शूद्र, ब्राह्मणाच्या पोटी जन्मलेला तो ब्राह्मण अशा
तऱ्हेने एक समाजव्यवस्था तयार केली. प्रत्येक मनुष्य, मग तो कुणाच्याही पोटी जन्माला
येवो, त्याचे बालपण शूद्रभावातच असते. जसजसे बालक मोठे व्हायला लागेल तसे त्यात
वैश्यभाव, क्षत्रियभाव व ब्राह्मणत्वभाव हे उत्क्रांत व्हावेत, अशी अपेक्षा असते
व यातच त्या व्यक्तीचे व मनुष्यमात्राचे कल्याण असते.
प्रत्येक बालक शूद्र म्हणून जन्माला येते. प्रसरण पावणे, आराम
शोधणे व स्वतःसाठी काही मिळविणे हे शूद्र प्रवृत्तीचे गुण. लहान मुले पाय झाडतात.
पाय नेहमी ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे अस्वस्थ असणारी माणसे येरझाऱ्या घालतात.
प्राणी नेहमी घाबरलेले असतात. वाघ-सिंह झाला तरी जरा कुठे खुट्ट झाले, की त्याला वाटते
आपला शत्रू आला की काय! माणसालाही भीती असल्याने मन अस्वस्थ असते. भीती, कमी समज,
तात्पुरत्या लाभावर समाधान व पायात शक्ती अधिक असणे हे शूद्रत्व. शक्तीचे उत्थान
करण्याच्या प्रयत्नात मूल आपल्या पायाचा अंगठा धरून तोंडात घालते. लहान मुलांना
व्यायाम करण्यासाठी मालिश करून त्यांचे पाय डोक्यापर्यंत नेले जातात, पायांची अढी
घालून एकमेकांवर दाबले जातात. जरा कळायला लागले, की लहान मुलांचा हात त्यांच्या
जननेंद्रियाकडे जातो. उपस्थ तोंडाशी जोडलेले असते, त्यामुळे दर दोन तासांनी मुलाला
खायला-प्यायला हवे असते. "मला खाऊ हवा' हा विचार आला, की खाऊ लगेच मिळाला
पाहिजे असे त्याला वाटते. खाऊ मिळाल्यावरच त्याचे समाधान होते. शूद्रप्रवृत्तीच्या
व्यक्तीसुद्धा थांबायला तयार नसतात. काम केल्याचा मोबदला मिळण्यासाठी ते महिनाभर
थांबायला तयार नसतात. दिवसा काम केले, की त्यांना संध्याकाळी मोबदला हातात हवा
असतो. मात्र, सेवा करण्यात त्यांना आनंद मिळतो व त्यामुळे त्यांची प्रगती होते.
मनुष्य पोटार्थी झाला, की त्याची वैश्यवृत्ती सुरू होते. त्याला जबाबदारी येते.
काही संग्रह करावा, पोटाची काळजी करावी असे त्याला वाटू लागते. तो थोडा उत्क्रांत
झालेला असतो, पण त्याला सगळे आपल्याकडे साठवून ठेवण्याचा, संग्रह करण्याचा लोभ
असतो. हा केलेला संग्रह सांभाळून ठेवायचा असल्याने त्याला भीती वाटते. सर्वांनी
शेतीतून धान्ये नेले, की शेतीत इकडेतिकडे पडलेले धान्य वेचून त्यावर आपला निर्वाह
कणाद ऋषी करत असत. कणाद हे मोठ्या योग्यतेचे होते. त्यांना राजाने धनधान्य देऊ
केले असता त्यांनी ते सर्व नाकारले. ते म्हणाले, "तुम्ही मला जे काही द्याल
त्याची मला देखभाल करावी लागेल, ते कोणी चोरणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल.'
संग्रह नेहमी भीतीला जन्म देतो. संग्रहातून आलेल्या भीतीमुळे अधोगती सुरू होते.
संग्रह आहे; पण त्याबद्दल भीती नसेल व देऊन टाकायची वृत्ती असेल, तर ती उत्तम वैश्यवृत्ती.
दुष्काळात सरकार आपली कोठारे उघडते. ही आहे वैश्यवृत्तीची उत्क्रांती.
मनुष्याने आपली बरीचशी भीती घालवलेली असते, कारण आपल्याला
सगळ्यांना माणसाळवता येते, आपल्या ताब्यात आणता येते, हे त्याच्या लक्षात आले.
क्षत्रिय प्रवृत्ती असणाऱ्यांमध्ये असा भाव प्रकट झालेला असतो, की माझ्यात
असलेल्या ताकदीमुळे मी इतरांना संरक्षण देईन. पण त्याची वैश्यवृत्ती कमी झालेली
असेलच असे नाही. अथक प्रयत्नांनी उत्क्रांतीत क्रमाक्रमाने वर चढता येते. अधोगती
होणे सोपे असते, जसे वैश्यवृत्तीचे शूद्रत्व कमी झालेले असेलच असे नाही किंवा
क्षत्रिय वृत्तीचे वैश्यत्व कमी होईलच असे नाही. आपण पृथ्वीकडे खाली ओढले जाणे
साहजिक आहे; पण त्याच्याविरुद्ध आपल्याला वर उत्क्रांत होता येणार आहे का, हे पाहणे
आवश्यक आहे. क्षत्रिय वृत्ती संरक्षणापुरती आहे. तुम्ही मला राजा केले तर मी
तुम्हाला संरक्षण देईन, असे म्हणणे हे त्यांच्यातील वैश्यत्व पूर्णतः न संपल्याचे
द्योतक आहे. प्रत्येकात हे चारही गुण अस्तित्वात असतातच. पण ज्याला आध्यात्मिक
व्हायचे आहे त्याने खाली ओढणारा स्वभाव सोडणे व वर उत्क्रांतीकडे नेणारे गुण
आत्मसात करणे आवश्यक आहे.
- डॉ . श्री. बालाजी तांबे .
Subscribe to:
Posts (Atom)