मुंबई- आयपीएल सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून
राजस्थान रॉयल्सचा खेळाडू एस.श्रीशांत याच्या सह त्याच्या सहचार्याना आज (गुरुवार)
अटक करण्यात आली. याप्रकरणात सात बुकींना देखील अटक करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या पोलीस पथकाने
मरिन ड्राईव्ह येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये छापा टाकून
स्पॉट फिक्सिंग केल्या प्रकरणी राजस्थान रॉयल्सचा खेळाडू
एस.श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलिया यांना अटक करण्यात आली.आणि त्याच्या
सह सात बुकींना देखील अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या कडून पोलिसांना काही
पैशे आणि स्पॉट फिक्सिंगचे साहित्य जप्त करण्यात आले. आयपीएल सामन्यात मोहाली आणि
मुंबईतील आयपीएल सामन्यांचा काही भाग फिक्स करण्यात आला होता, असे प्राथमिक
चौकशीत उघडकीस आले आहे.
हा छापा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे आयुक्त एस. एन.
श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आला होता. याप्रकरणी अजून काही जणांना
अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment