Total Pageviews

Tuesday, May 14, 2013

रॅनबॅक्सीला 50 कोटी अमेरिकन डॉलरचा दंड.


वॉशिंग्टन - जपान मधील रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीला औषधे सुरक्षा संबंधी आरोपांवरून 50 कोटी अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाने रॅनबॅक्सीविरुद्ध कागदपत्रांमध्ये फेरफार आणि औषध निर्माण झाल्यानंतर सुरक्षाबाबत कंपनीवर आरोप लावले होते.गेल्या अनेक दिवस पासून रॅनबॅक्सी कंपनी अमेरिकेच्या कायदा मंत्रालया विरुद्ध न्यायालयात केस लढत होती. अखेर आज हा निकाल रॅनबॅक्सी कंपनीच्या विरोधात लागला.
या निकालानुसार रॅनबॅक्सी कंपनीला दंडाच्या स्वरुपात अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाला 50 कोटी अमेरिकन डॉलर द्यावे लागणार आहेत.
रॅनबॅक्सी कंपनीची स्थापना 1961 मध्ये भारतात झाली होती. मात्र, 2008 मध्ये ही कंपनी 45 कोटी डॉलरला जपानमधील दाइची सांक्यो ग्रुपला विकली. कंपनीचे व्यवहार 43 देशांमध्ये चालतो.या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण साहनी हे आहेत.

No comments: