Total Pageviews

Monday, January 28, 2013

किल्ले वसई


                                                                     किल्ले वसई
                आपल्या वसईला म्हणजे शूर्पारक नगरीला पौराणिक काळापासून ते ब्रिटीश काळापासून असा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
उत्तरेकडे वैतरणा दक्षिणेला उल्हास नदी तसेच पूर्वेला तुंग पर्वत व पश्चिमेला विशाल समुद्र ह्यामुळे वसईला भौगोलिक दृष्टीने खूपच महत्व प्राप्त झाले होते.
अनेक तीर्थक्षेत्र , तलाव, बावखले ह्यांनी वसईची जमीन खूपच सुपीक होती. आशियातील सर्वोत्तम प्रतीची साखर आपल्या वसई मध्ये बनत असे.
शूर्पारक बंदरातून अखाती देशांशी इथे मिळणारे मसाले, साखर ह्या सारख्या अनेक उत्पादनांचा व्यापार चालत असे. बोट बांधणी साठी शूर्पारक फारच प्रसिद्ध होते.
किंबहुना म्हणूनच अनेक परकीय आक्रमण इथे झाली. ई.स. १५१५ च्या दरम्यान पोर्तुगीजांनी ह्या भूमीत पाऊल ठेवले त्यानंतर ई.स. १७३९ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांनी तीन वर्षे झुंज देऊन पोर्तुगीजांना परास्त केले व वसई परकीय सत्तेपासून मुक्त केली. आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या पोर्तुगीजांवर पारंपारिक शास्त्रांच्या सहाय्याने मिळवलेला हा विजय महत्वाचा होता.
युरोपीय सत्तेविरोधातील भारतीयांचा हा पहिलाच विजय वसई मध्ये झाला ह्याचा वसई करांना सार्थ अभिमान वाटायला हवा. परंतु ह्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष देणारा आपला वसईचा किल्ला, अनेक महत्वाचा ऐतिहासिक वास्तू मात्र उपेक्षित अवस्थेत आहेत.


                                                             ( चिमाजी अप्पा स्मारक )
तीन वर्षे राज्य वसवून मोर्चे बसवून सभोवती धमामी..
सुरुंगानी पाडिला अलगत बुरुज बदामी..
हल्ल्यात उडाले लोक, करिती किती शोक, पडून संग्रामी...
नऊ लक्ष बांगडी फुटली हो !! वसई मुव्कामी
सन १५५६ च्या दरम्यान वसई मध्ये पोतुगीज तोफांचा आवाज प्रथम कडाडला. त्यानंतर पोतुगीजांनी सन १५३४ मध्ये प्रथम बाले किल्ला व नंतर सध्या दिसत असलेल्या किल्ल्याच्या भव्य परिसरात एक सुसज्ज शहर वसवून तब्बल २०५ वर्षे वसईवर राज्य केले. पोतुगीजांच्या राजवटीत वसई मधील धार्मिक, राजकीय अन सामाजिक वातावरण ढवळून निघाले. पोतुगिजांकडून र-थानिकांवर अनेक जुलूम , धार्मिक छळ, अत्याचार झाले. अजूरकर नाईक आणि अंताजी कावळे ह्यां र-थानिक वतनदारांनी आपल्याला र-वराज्यात सामावून घेण्यासाठी पेशव्यांकडे साद घातली आणि त्याची परिणती म्हणून नरवीर चिमाजी अप्पांनी वसई मोहीम हाती घेतली. सन १७३७ ते १७३९ तीन वर्षे मराठी सैन्याने शौर्याची शिकस्त करुन वैशाख वद्य द्वितीयेस (१६ मे १७३९) वसई किल्लावर विजयीची पताका फडकावली. आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज  असलेल्या पोतुगीजांवर पारंपारिक शस्त्रांच्या सहाय्याने मिळवलेला हा विजय महत्वाचा आहे.
युरोप सत्तेविरोधातील भारतीयांचा हा पहिलाच विजय वसईमध्ये झाला हा सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद  आहे....

पुराणप्रसिद्ध श्री नागेश्र्वर मंदिर 
तेराव्या शतकात सदर मंदिराचा परिसर नागेश महातीर्थ या नावाने प्रचलित होता. इ.स. १७४० मध्ये नरवीर चिमाजी अप्पांच्या अकाली मृत्यु नंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या मंदिरेचा जीर्णोद्धार करण्यात आला. आजही अनेक धार्मिक कार्यक्रम ह्या मंदिरात होत असतात.
           

                                                
                                                          ( पुराणप्रसिद्ध श्री नागेश्र्वर मंदिर )                              


  • बालेकिल्ला 
१४ व्या शतकात आरंभी शेषवंशी क्षत्रिय घराण्यातील नाथाराव भंडारी भोगळे ह्याने नागेश्र्वर तीर्थजवळ गढी उभारली. १५३० मध्ये गुरजातच्या बहादुरशहाचा सुभेदार मलिक तुघान हयाने हया किल्लावर प्रथम वर्चर-व प्रर-थापित केले. त्यानंतर १५३५ च्या दरम्यान "नुनो दा कुन्हा" या पोतुगीज गव्हर्नरच्या हुकुमावरुन पहिला कप्तान "गार्सिया दिसा" हयांनी हा किल्ला बांधला.
                                     
                                                               ( बालेकिल्ला )



  • जिवनदायी ख्रिर-तमाता मंदिर

बालेकिल्याच्या उत्तर तटाला लागूनच हे चर्च आहे. पोतुगीज भाषेत हया चर्चचे नाव "नोसा-सिन्होरा-द-विदा" असे आहे. हया चर्चची उभारणी इ.स. १५३६ च्या दरम्यान करण्यात आली. पोतुगीज काळात गॅरीझन चर्च हया नावाने प्रसिद्ध होते. ब्रिटिशांनी १८५२ मध्ये हया वार-तुचा वापर साखर कारखान्यासाठी केला. प्रवेशव्दाराजवळ कॉरेन्थियन पद्धतीचे खांब आहेत. तसेच आत वेदीवरचे अर्धवर्तुळाकार छत हे हया वार-तुचे वैशिष्टय आहे.                                       
                                                                    

                                                   
                                        


  • टाऊन हॉल (कमारा) म्हणजेच नगरपालिकेची इमारत.
पोतुगीज कालीन शासकीय कामासाठी वापरात असलेली देखणी वार-तु. इ.स. १६०६ च्या दरम्यान ही वार-तु उभारली. बालेकिल्ल्याच्या आसपास पोतुगीज सरदारांनी मोठमोठे वाडे बांधल्यामुळे वसई किल्ल्यात आधुनिक नगरी निर्माण झाली. नगरपालिकेला लागुनच "मिझेरी कॉर्दिया" म्हणजेच रुग्णालय व कारागृह आहे.

                                       
                                     
                                                                          
                                                                     टाऊन हॉल




                                                  
                                                   


  • संत जोजेफ ख्रिर-त मंदिर

इ.स. १५४६ हे चर्च उभारले गेले. वसई किल्ल्यातील सर्वात उंच ख्रिस्ती मंदिर म्हणुन ही वार-तु प्रसिद्घ आहे. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एक मनोरा असुन त्यावर एक चक्री जिनाही आहे. मनोर-यावर चार रांजणाकृती कळस होते. मंदिरात सुरुवातीला दोन मनोरे होते त्यातील ऐक शिल्लक आहे. त्याला चक्रीमाडी जिना आहे. गोव्याचे बिशप यामध्ये वार-तव करत असे. इ.स. १५४६ ते १६०० साली हे चर्च उभारले गेले. यात चार कळस होते. आता तीन कळस शिल्लक आहेत. अगदी नगरपरिषदेच्या मागल्या बाजुस ऐक मोठी बाजारपेठेची जागा होती तिथे धान्यापासून ते दारुगोळा पर्यत सर्व वर-तू मिळत असे. हया किल्ल्याचे बांधकाम आर सी सी कस्ट्रकशन पद्धतीचे नसून प्रत्येक पायरी मोकळी आणि बाजुच्या भितींमध्ये अडवलेली आहे.तीन पर-यांचे चित्रे, केळीचा बुधां, फुलांचा रस यातून रंग संगती केली आहे. तब्बल १२०० वर्षे राहिलेली आहे. यात १५ भुरुज होते आता फव-त ऐक शिल्लक आहे.हनुमान मंदिराच्या समोर पडीक वार-तू आहे. तिथे बाजारपेठ होती. चिमाजी अप्पांनी हयातील बांधलेले पहिले मंदिर मिशीवाला मारुतिला कमरेला खंजिर आहे. चर्चच्या मागे वखार होती तेथे लागणारे साहित्य ठेवले जात असे. हयाच मंदिराच्या बाजुला लक्ष्मण भुरुज सागरी दरवाजा आहे.हा भुरुज ४-५ फुट उंच आहे. हया गंधक, शिरुर टाकून बांधकाम केले आहे. शत्रू जेव्हा किल्ल्यामध्ये प्रवेश करेल तेव्हा आपण गाफिल रहावे शत्रूची चूकामूक होण्यासाठी असे वेडेवाकडे दरवाजे बनवण्यात आले. वसई किल्लया मध्ये युद्ध झाले तेव्हा ऐकही हत्ती, उंट नव्हते फव-त घोडदळ होती. हत्तींनी वसई किल्ल्याचा  समुद्रीदरवाजा हि अफवा होती.


                                           
                                                        


  • गोन्सालो गार्सिया ख्रिस्त मंदिर
इ.स. १५४४ दरम्यान या चर्चच्या प्रवेशद्वराशी कॉरेन्थियन पद्धतीचे दगडी खांब आहेत तसेच वरच्या भागात सुर्य व चंद्र यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. कोरल्या आहेत. इ.स. १५५८ मध्ये या चर्चची पुर्नबांधणी करण्यात आली. यालाच लागुन महाविद्यालयाची वास्तु आहे.गोन्सालो गार्सिया भारतामध्ये आले होते. गव्याचे बिशप आणि व्हाईसरॉय याच्यां उपस्थितीत वेलबुट्टीचे नक्षी, शंकर पार्वती, भारतीय आणि रोम पद्धतीने १० फुट रुंद २२ फुट अर्धगोलाकार अश्या या महाविदयालयाचे बांधकाम १५६० मध्ये करण्यात आले.ख्रिस्ती धर्मांची दिक्षा देण्यासाठी या महाविदयालयाची स्थापना करण्यात आली.त्यावेळी परशुराम शास्त्री या पंडिताचे धर्मांतर करण्यात आले आणि हेगंरी डिसुजा हे नाव त्याले देण्यात आले.  
                                                                         
                                                     



  • हॉस्पिटल

इ.स. १६४९ मध्ये ६८ हजार रईस (त्यावेळचे चलन) खर्च वार्षिक मदत मिळायची ती मदत पोर्तुगीजांनी बंद केल्या मुले हे हॉस्पिटल दीड ते दोन वर्षात बंद झाले. इ.स. १६४९ मध्ये ६८ हजार रईस (त्यावेळचे चलन) खर्च वार्षिक मदत मिळायची ती मदत पोर्तुगीजांनी बंद केल्या मुले हे हॉस्पिटल दीड ते दोन वर्षात बंद झाले.


                                               
                                               

  • फ्रान्सिस्कन ख्रिस्त मंदिर 
इ.स. १५५७ मध्ये हया चर्चची बांधणी करण्यात आली. १५ मे १७३९ रोजी पोतुगीज कप्तान डिसोजा परेरा याने पोतुगीज अधिकाऱ्यांची येथे सभा घेऊन मराठ्यांना शरण येण्यामध्ये बारा कलमी तहाची ऐतिहासिक बैठक याच चर्चमध्ये झाली.
 

                                                 
                                              ( बारा कलमी तहाची ऐतिहासिक बैठक येथे झाली )


या किल्ल्याच्या संरक्षणासाठी तब्बल २४०० परदेशी नागरीक, १८०० गुलाम, २०० .युरोपीय नागरीक वापरण्यात आले.हा सर्वात जुना किल्ला आहे. हे सुसज्ज शहर म्हणून त्यावेळेला घोषित करण्यात आले. आणि त्याबाजुला लोक वार-तव्य करु लागली. येथे ऐक ताधांले तलाव आहे.आणि येथे शभंर च्या वरती गोडया पाण्याच्या विहीरी आहेत.येथे उत्खन्न करताना वेगवेगळी शस्त्रात्रे सापडली. येथील बांधकाम हे पूर्णता दगडाचे आहे. येथे सर्वात पहिले बांधलेले पोतुगीज चिन्ह आहे. त्याला राज चिन्ह असे म्हणतात.या किल्ल्यात शिरल्यावर पहिला दरवाजा आहे तिथे सर्वात पहिले राज चिन्ह बनवले आहे.
इ.स. १५१५ मध्ये पोर्तुगीज आले. आणि अरबी लोकांवर विजय संपादन करून त्यावेळी त्या त्या अधिकार्यांना वतन दिली हे सर्व मॅनेज करण्यासाठी नगरपालिका बांधली. व्हाईसरॉय यांनी त्याकाळी हे अत्याधुनिक सहकार म्हणून घोषित केले.  चर्चच्या आतमध्ये थडगे असणारे हे एकच चर्च आहे. हे फ्रान्सिसकन पंथातील चर्च आहे. इ.स १५३९ मध्ये चिमाजी अप्पांनी ह्या किल्ल्यावर आक्रमण करून बुरुज फोडला आणि सतत तीन वर्ष आक्रमण करून ह्या चर्च मधला कॅप्टन फ्रान्सीस डिसिल्वा अक्षरश: मराठ्यांची आक्रमांची शिकस्त पाहून हैराण झाला आणि शेवटी चिमाजी अप्पाना शरण आला आणि १२ पानाचा तह झाला तो याच चर्च मध्ये झाला आणि युद्धाला विराम दिला.

                                 

                                                           नगरपरिषद



 
                                                   
                                                                     शिलालेख

                                                            ( लक्ष्मण भुरुज दरवाजा )





                              आम्ही किल्ल्याला व्हिजीट दिली तेव्हा उत्खननाचे काम चालू होते


नितिन मोरे 

Wednesday, January 23, 2013

सुभाषचंद्र बोस जयंती


                                                               सुभाषचंद्र बोस




सुभाषचंद्र बोस ऐक ज्वलंत आणि धगधगत व्यव्तिमत्व. आज त्यांची जयंती.ते भारतीय स्वतंत्रलढयातील अग्रेसर नेते होते. ते नेताजी या नावाने ओळखले जातात.सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. भारतीय स्वतंत्रलढयात त्यांचे योगदान हे महत्वपूर्ण आहे. हे विसरुन चालणार नाही. दुसरे महायुद्ध सुरु असताना त्यांनी जपानची मदतीने आझाद हिंद फौज र-थापन केली. त्यांनी दिलेला जय हिंद चा नारा पुढे राष्ट्रीय नारा बनला. नेताजींचा प्रभाव आणि योगदान ईतके मोठे होते की, जाणकार मानतात जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असले तर भारताची फाळणी न होता भारत एकसंघ राष्ट्र म्हणून राहीला असता.  स्वत: गांधीजी देखील हेच मानत असे. लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाष मधली सुप्त देशभक्ती जागृत केली.

वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.

महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाष ने महाविद्यालयात संप पुकारला होता.

१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.
१९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून,पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडूनवसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेरवसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.

जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले. आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी कॉंग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना कॉंग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले. नंतर त्यांनी तेथून पलायन केले

  •  बेपत्ता होणे आणि मृत्यूची बातमी

 दुसर्या महायुद्धात जपान चा पराभव झाल्या कारणाने दुसरी कडून मदत मागणे रास होते म्हणून नेताजींनी रशिया कडून मदत मागायचे ठरवले

ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.

ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमिवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

स्वातंत्र्यनंतर, आपल्या सरकारने १९५६ आणि १९७७ मध्ये सरकारने या घटनेची चौकशी साठी एका आयोगाची नियुक्ती केली पण तेव्हा तसाच निष्कर्ष काढण्यात आला. १९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५साली तैवानच्या भूमिवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरीत रहस्य बनले आहे.

नितिन मोरे

Friday, January 18, 2013

आमची मुंबई...'सुरक्षित' मुंबई...?

                                               
                                                  
                                                                              
                                                                          
                                                आमची मुंबई सुरक्षित मुंबई आहे का?
           'मुंबई" एक स्वप्नांची नगरी.या नगरीत जगण्याचा सर्व जण काटेकोरपणे प्रयत्न करत असतात. 'मुंबई' हि आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. या राजधानीत पोटाची खळगी भागवण्यासाठी देश भरातून लोक येथे प्रस्थान करतात. जेणेकरून येथे पुरेसा कामधंदा उपलब्ध होत असल्याने लोक या स्वप्नांच्या नगरीची वाट धरतात. पण आपण पाहायला गेलो तर या मुंबईत रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने परप्रांतीयांचे एवढे लोंढे दिवसेंदिवस या स्वप्नांच्या नगरीत प्रस्थान करतात. एवढी प्रचंड गर्दी वाढली आहे, की विचारयला नको. म्हणून तर प्रत्येक जण या स्वप्नांच्या नगरीत फक्त एकच स्वप्न घेऊन येतात , 'मुंबई' म्हटले तर CID फिल्म मधले हे गाणे आठवते  ये दिल ही मुश्किल ही जीना याह, जरा हट  के, जर बच के  येह बोम्बय मेरी जान !!!. याच स्वप्नांच्या नगरी मध्ये प्रत्येक जण मोठे - छोटे काम करण्याच्या उद्देशाने मुंबईत येत असतो पण आपण ह्याचा कधी विचार केला का, मुंबईत एवढे परप्रांतीय लोंढे वाढले आहेत की त्यामुळे मुंबई मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.  मुंबई हि खरच सुरक्षित आहे की नाही हे म्हण्याची वेळ आली आहे .
            याच धर्तीवर पाहायला गेलो तर आताच थोड्या दिवसापूर्वी राजधानी दिल्लीत बसमध्ये एका २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराने आणि अत्त्याचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरच कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त उशिरा पर्यंत घराबाहेर पडणाऱ्या मुली, तरुणी, महिला सुरक्षित आहेत का...? रात्री अपरात्री त्या मुंबईत बिनधास्त फिरू शकतात का...? घराबाहेर सोडा , निदान आपल्या घरामध्ये तरी महिला सुरक्षित असतात का...? त्याचाच घेतलेला हा एक आढावा.
          राजधानी दिल्लीत एका २३ वर्षीय तरुणीवरील सामुहिक बलात्काराच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली असताना राजधानी दिल्लीची मान शरमेने खाली टाकणारी घटना घडली. फेसबुकच्या माध्यमातून जाळ्यात ओढून एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला ३१ च्या रात्री हा प्रकार घडला. दोघेही आरोपी उच्चशिक्षित आहेत. दिल्लीत दहा दिवसापूर्वी एका तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाने देश हादरला असतानाच आणखी एक घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशात एका ४२ वर्षीय महिलेवर तीन पुरुषांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली अश्या किती तरी घटना  घडल्या आहेत. पाहायला गेलो तर ज्या घटना घडल्या आहेत त्या वेगवेगळ्या राज्यात घडल्या आहेत आणि सर्व राज्याचा विचार करायला गेलो  तर माझ्या मते मुंबई ही ईतर राज्यांपेक्षा सुरक्षित राज्य आहे. 
मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने साहजिकच येथे महिलांचे काम करण्याचे प्रमाण खूप आहे.  कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त उशिरा पर्यंत घराबाहेर असणाऱ्या मुली, तरुणी, महिला सुरीक्षित आहेत का...? रात्री अपरात्री त्या मुंबईत बिनधास्त फिरू शकत नाहीत आणि घराबाहेर सोडा त्या आपल्याच घरामध्ये सुरक्षित नाही आहेत. त्याचेच उदहरण पहिले तर हल्लीच डोंबिवलीत माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य घडले. डोंबिवलीत एका मुलीवर तिच्याच वडिलांनी आणि भावानी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. खरच मुली, स्त्रिया बाहेरच काय तर आपल्या घरात देखील सुरक्षित नाही आहेत.
       महिलांवर होणारे अत्याचार, विनयभंग, छेडछाड अशा निषेधार्ह घटनांचे प्रमाण संपूर्ण समाजच गावगुंडांच्या पातळीवर येऊन पोहचला असावा अशी शंका येण्याइतपत वाढले आहेत. केवळ सार्वजनिक ठिकाणी महिला पोलीस तैनात करून या गावगुंडाना धाक बसणार नाही. अत्यंत कठोर कायदा आणि आजामीनपात्र गुन्हा यामुळेच अशा वासनांधांना जरब बसू शकेल. मुक्या म्हणजे स्त्रियांनी, ज्यांना आमचे जुने लोक 'अबला' म्हणतात, त्यांनीच आता 'सबला' होऊन अशा गाव गुंडांना धडा शिकवणेही तितकेच गरजेचे आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:' अशा अर्थाचे एक संस्कृत वचन आहे. याचा अर्थ 'जेथे महिलांना सन्मान केला जातो, स्त्रीला पूजनीय मानले जाते तिथे देवतांचा निवास असतो. आपल्या देशात स्त्रीयाबाबत बोलताना नेहमीच हे वाक्य ऐकवले जाते, त्याचप्रमाणे ते अनेक ठिकाणी वाचनातही येते. दुर्देव असे कि अशा प्रकारचे वाक्य आपल्या बोलण्यात किवा ऐकण्यात सातत्याने येत असते तरी ते आचरणात मात्र येत नाही. आपल्याकडे काय होते तर, महिलांचे शोषण, ताडन, तिच्यावर अत्याचार, मारहाण, लंपटगिरी, विकृत शेरेबाजी. अलीकडच्या काळातील घटना पहिल्या तर लक्षात येते कि, वासनांध विकृतांच्या या टोळ्यांकडून तरुण मुलीही लक्ष्य होतात आणि अगदी साठीतल्या ज्येष्ठ महिलाही. भर रस्त्यातही हे सुरु असते आणि बंद दाराआडही अश्या महिलांचे अनेक हुंदके पदरचे बोळे तोंडात कोंबून दाबले जातात. कुटुंबियांकडून, वडीलधार्यांकडून, नातेवाईकांकडून, शिक्षकांकडून होणारे लैंगिक शोषण तर मृत्यू परवडावा इतके लज्जास्पद. लहान मुलीही या विकृत कामुकांच्या  चाळ्यांची शिकार बनतात, नकळत्या वयात वडिलांकडून त्यांचे लैंगिक शोषण होते हे 'मेरा भारत महान' म्हणणाऱ्या कुणालाच लांच्छनास्पद वाटत नाही. ऑनर किलिंगच्या घटनांमध्येही महिलाच लक्ष्य बनते. मग कोलकात्यात कुणी भाऊच जिचे रक्षण कार्याचे त्याच बहिणीचे मुंडके धडावेगळे करतो, कुठे आई वडील मुलीचा गळा दाबतात. केरळमध्ये सहा वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण वडिलाच करतात, डोंबिवलीत सडकछाप मुले त्यांच्या शेरेबाजीला विरोध करणाऱ्या मित्रालाच खलास करतात, पवईत ज्येष्ठ महिलेवर अत्याचार केला जातो... अशा कितीतरी घटना. नकळत्या वयातील अशा घटना मनावर कायमचे ओरखडे उठवतात, मानसिक आणि वर्तन समस्यांना कारणीभूत ठरतात. खेळण्याबागडण्याच्या वयात आपले लैंगिक शोषण होते आहे हे कळण्याचीही समज  आलेली नसते. अशा किती जणी उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि होत आहेत. मंदिरामध्ये स्त्रीशक्तीची देविस्वरुपात पूजा होते आणि सार्वजनिक ठिकाणी, अनेक घरांच्या बंद दाराआड मात्र तिची विटंबना, उपेक्षा सुरु असते. पुरुषप्रधान संस्कृतीत हा दुटप्पीपणा  पिढ्यानपिढ्या सुरु आहे. आजची स्त्री कितीही सुशिक्षित असली, स्वताच्या पायावर उभी असली तरीही तिला अशी हीन वागणूक मिळावी ही दुर्दैवी बाब आहे. विचार मनाला अस्वस्थ करणारे हे वास्तव चित्र भयानक आहे. स्त्री म्हटली की, ती कमकुवत किवा दुय्यम मानण्याची मानसिकता अजूनही बदलत नाही. संस्कृतीत स्त्री पुज्य मानणे आणि प्रत्यक्षात तिला केवळ भोग्य वस्तू समजून तिची अशी मानहानी होणे, अशा प्रकारच्या संतापजनक विरोधाभास दुर्दैवाने आपली सामाजिक ओळख बनला आहे. घरापासून शाळा-महाविद्यालया पर्यंत आणि अगदी कार्यालया पर्यंत महिलांशी दुय्यम व्यवहार केला जातो. या सगळ्याला सारवलेल्या पुरुषांना यात काही चुकते आहे, असेही वाटत नाही. मुलगा हा वंशाचा दिवा आणि मुलगी हे परक्याचे धन मानण्याची पद्धत आपल्याकडे आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेप्रमाणे मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो. त्यासाठी  आपल्या समाजानी आणि आपण आपल्या विचारा मध्ये बदल करून स्त्री आणि पुरुष यांना समानतेने वागवले पाहिजे. जेणे करून हे भेद निर्माण होणार नाहीत
        भारतीय तत्वानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी दुसर्या बाजूला टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदुमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती अश्या प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरुष दैवतांची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची. तरीही आज समाजात स्त्री च्या पोटात मुलगी आहे हे काळल्यावर तिला या जगात येऊन दिले जात नाही आणि येऊन दिले तर त्या आईचा मानसिक आणि शारीरक  छळ केला जातो किवा त्या जन्मलेल्या  मुलीला एखाद्या कचर्याच्या डब्यात किवा गटारात सोडून दिले जाते. अश्याच एक घटना मागे कल्याण मध्ये घडली होती. खरच पाहायला गेलो तर एक स्त्रीच एका स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक  छळाला कारणीभूत असते त्यामुळे आज स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. एकी कडे स्त्री ला देवी म्हणून तिची पूजा अर्चा करायची आणि तिचा मानसिक आणि शारीरक छळ करायचा खरच हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार अजून ही आपल्या महाराष्ट्रात घडत आहे. या वर सरकारने कितीही कायदे केले तरी अश्या घटनान मध्ये दिवसेंदिवस  झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. स्त्रिया कितीही शिकलेल्या असल्या तरी त्यांना स्त्रियांना शारीरिक , मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. आणि त्या निमूट पणे सहन करत असतात. हल्ली मुंबई लोकल मध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार वाढले असतानाच  मागेच चर्चगेट-बोरीवली लोकल मध्ये एका मुलीला लोकल रोमियो कडून चाकूचा धाक दाखवण्यात आला आणि तिची लुट करण्यात आली. तसेच दिवसेंदिवस वृद्धांवर होणारे हल्ले आणि अत्याचार यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणे वाढले आहेत. डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या घटनेने महिलावरील अत्याचारांनी कळस गाठल्याचे सिद्ध झाले आहे.गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनां मध्ये बरीच वाढ झाल्याचे दिसले आहे.गेल्या वर्षभरात ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत १०६ बलात्कार १९८ विनयभंगाचे प्रकार घडले आहेत.एकीकडे अशा गुन्ह्यांची संख्या वाढली असली तरी हत्येचे गुन्हे मात्र कमी झालेत. सन २०११ मध्ये १२७ हत्यांनी ठाणे जिल्हा हादरला होता. मागील वर्षी ही संख्या ११० इतकी नोंदवली गेली. 
            दिल्लीत ज्या २३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला त्या घटनेने संपूर्ण देश हादरून  गेला असून जागोजागी आंदोलने आणि निर्दशने करण्यात आली ह्याच पार्श्वभूमीवर सरकारने बलात्कार करणार्यांवर फास्ट ट्रक कोर्ट स्थापन करून त्याची जलद गतीने चौकशी करावी असा दबाव संपूर्ण जनसमुदायाकडून सरकारवर टाकण्यात आला. पण या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण होत असताना महिलांवरील अत्याचाराची गंभीर दखल घेऊन सरकारने अधिकाधिक कडक कायदे करावेत, यासाठी आंदोलनांचा भडका उडाला असला तरी अश्या सर्व स्फोटक वातावरणात आमची मुंबई, 'सुरक्षित' मुंबई नाही आहे कारण दिवसेंदिवस येथील वृद्धांवर, महिलांवर, मुलींवर होणारे अत्याचार हे कधीच थांबणार नाहीत कारण आपण आज ज्या एकवीस साव्या शतकात वावरत आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीवर पाश्चिमात्य देशांचा एवढा प्रभाव पडला आहे कि आपण त्या पुढारलेल्या आणि पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करत आहोत. चित्रपटान मध्ये वाढलेले अश्लीलीकरण ह्याला कारणीभूत आहे. हल्लीच एका नेत्याने वक्तव्य केले कि पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करून आजची पिढी वाया गेली आहे.
                       माझ्या मते, दिल्ली, उत्तर प्रदेश, हैद्राबाद,पुणे या राज्या पेक्षा थोडी तरी सुरक्षित आहे.  कारण मुंबई मध्ये कोणीही केव्हाही अपरात्री फिरू शकतो. पण सध्या राजधानी दिल्लीत बसमध्ये एका 23 वर्षीय तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरून गेला आहे. पण त्यामुळे आता मुंबई ही मुलींसाठी सुरक्षित आहे हे सांगता येणार नाही. पाहायला गेलो तर मुली हि काही प्रमाणात ह्याला जबाबदार आहेत. प्रत्येकालाच आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा, फिरण्याचे स्वतंत्र, हवे तसे कपडे घालण्याचे स्वतंत्र  आपल्या राज्य घटनेने दिले असले तरी स्त्रियांनी व मुलींनी आपल्याला शोभेल असेच कपडे परिधान करावे जेणे करून मुल आकर्षित होणार नाहीत. मुलींनी आपल्या स्व:स्वरक्षणासाठी त्यांनी आपल्या जवळ चाकू, मिरची पूड, स्प्रे स्वतः जवळ ठेवावा जेणे करून अशी वेळ आली तर आपण आपले स्वतःचे स्व:रक्षण करू शकतो.
                                                               

 याच पार्श्वभूमीवर आपली मुंबई ही सुरक्षित आहे की नाही त्याबद्दल घेतलेल्या प्रतिक्रिया खालील प्रमाणे

मुंबई शहरातही मुली सुरक्षित नाहीत. मात्र अन्य शहरांच्या तुलनेत पहिले तर मुंबई सुरक्षित आहे. मी स्वतः मिडिया क्षेत्रात गेली तीन वर्ष काम करीत आहे. त्यामुळे सातच्या आत घरात हि चौकात पाळणे शक्य नाही. रात्री नेहमी उशिरा घरी येण होतच. पण अद्याप मला कोणताही वाईट अनुभव आला नाही. उशिरा येताना कोणीही छेड kadhan, किवा पाठलाग करणं, विनयभंगाचा प्रयत्न असा कोणताही प्रकार माझ्यासोबत घडला नाही आणि शेजारी राहणाऱ्या कोणत्या हि मुलीवर असा प्रकार अद्याप असा घडलेला नाही. वाईट घटना सर्वत्रच गाढत आहेत पण तुलनेने मुंबई शहरात फार कमी आहेत असे माजे मत आहे. मी रात्री १२ च्या सुमारास रिक्षा न मिळाल्यामुळे जोगेश्वरी स्टेशन पासून घरापर्यंत अर्ध्या तासाचे अंतर चालत प्रवास केला आहे. मात्र आजपर्यंत मला काही समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळे आमची मुंबई सुरक्षित मुंबई नक्कीच आहे.
                                                                     -वैजंता गोगावले, उपसंपादक, दै. मुंबई लक्षदीप 


महिला,मुली या मुंबई मध्ये सुरक्षित असण्या पेक्षा त्याआधी पोटात तरी सुरक्षित आहेत का? माझा प्रश्न हा आहे. बलात्कार, छेडछाड,विनयभंग, हुंडाबळी, स्त्री- भ्रूणहत्या ही तर स्त्री वर होणाऱ्या अत्याचाराची यादीच आहे. स्त्रीच्या पोटात मुलगी आहे हे कळल्यावरती तिला या जगात येवून देत नाही जरी येऊन दिले तर तिचा आईचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो . स्त्रीचे चारित्र्य हे काचेच्या ग्लासा सारखे आहे. एकदा तिच्यावर शिंतोडे उडवले कि खूप बदनामी सहणार करावी लागते. मुलीना दिल्ली मध्ये चालत्या बस मध्ये त्या मुलीवर जालेला तो प्रकार सगळ्यांच्याच मनावर जखम देऊन गेला आहे.आज दिल्ली काय मुंबई हि मुलींसाठी सुरक्षित नाही आहे.
                                                                              -  प्रिती सरदेसाई,  (ज्युनिअर असोसिएट)

बलात्कारसारखे प्रकार कुठेही घडू शकतात. त्यामुळे अमुक एक ठिकाणच स्त्रियांच्या दृष्टीने सुरक्षित आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर देत येण कठीण आहे. फक्त मुंबईतच कशाला माझ्या मते कोणत्याही ठिकाणी रात्री अपरात्री एकटीने बहरे पडताना कोणतीही स्त्री कचरते. दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणाने देश खडबडून जागा झाला. डोंबिवलीच्या एका मुलीवर तब्बल २ वर्ष तिच्याच वडिलांनी आणि भावाने होणार्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक घटना समोर आली. या अशा घटना पाहता स्त्रिया आपल्या घरीच सुरक्षित नाही आहेत. बलात्कार सारख्या अक्षम्य गुन्ह्यासाठी कडक शिक्षा हवीच पण त्याच बरोबर पुरुषांना योग्य समुपदेशाची गरज आहे. मुलांना लैंगिक शिक्षणाचे योग्य ते शिक्षण दिले पाहिजे.                                                                                                 
                                                                                                   - प्रणाली पवार,  डोंबिवली



सध्या आपल्या देशात मुलींचे आणि स्त्रियांच्या बाबतीतले वातावरण एकदम भयावह झाले आहे. अशा वातावरणात आपली मुंबई सुरक्षित आहे कि नाही सांगूच शकत नाही. सध्या रोज नवीन नवीन घटना बलात्कार, छेडछाडीच्या घटना ऐकायला येतात. कामासाठी किवा शिक्षणासाठी मुलीना आणि तरुणींना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. त्या घरी पोहचे पर्यंत घरची माणसे खूप चिंते मध्ये असतात. हे सर्व कुठे तरी थांबले पाहिजे. रात्री अपरात्री मुली बिनधास्त पुरुषान प्रमाणे फिरू शकत नाही. रात्री मुलगी रस्त्यावर दिसली कि पुरुषांचा तिच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन लगेच बदलतो. आज तर लहान निरागस मुलींनासुद्धा हे नराधम सोडत नाही. आपल्या देशात तर एवढी वाईट  परिस्थिती निर्माण झाली आहे कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. शेजारच्या माणसांवर किवा नातेवाईकांवर पण पूर्ण पाने विश्वास ठेवता येत नाही. रक्ताची माणसेच स्त्रीत्वाचा आदर करत नाही तर बाहेरच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार. हे कुठे तरी थांबायल पाहिजे मुलींना सुद्धा मोकळे पणाने फिरू दिले पाहिजे. माझ्या मते स्त्रियांसाठी, मुलींसाठी मुंबई अन्य राज्यानप्रमाणे सुरक्षित नाही आहे  
                                                                                 - श्रद्धा कामत, (ज्युनिअर असोसिएट)


नितीन मोरे 

Monday, January 14, 2013

मकरसंक्रांत !!!!!


                       
                                             
                               


             महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहतात. तो सण म्हणजे मकरसंक्रांत ! मकरसंक्रांत हा भारतातील शेती संबंधित सण आहे. सुर्य ज्या दिवशी दक्षिणायातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथिला मकरसंक्रांत साजरी केली जाते. यादिवशी सुर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. यादिवसापासून सुर्याचे उत्तरायण सूरु होते.पृथ्वीवरुन पाहिले असता सुर्याची उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.

सूर्याच्या संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकारासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगळ्या असतात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते व दुसऱ्या दिशेला जाते. त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते हा सण सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. यास भोगी, संक्रांती व किंक्रांती असे म्हणतात.संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश भाषा महिन्यानुसार हा दिवस १४जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
 मकरसंक्रांती  येण्याची चाहूल लागताच सर्वत्र लाडवाचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक आनंद पसरतो. काही काही घरात तर गृहिणी आवर्जून तिळाचे लाडू बनवतात . संक्रांतीला तिळाचे लाडू खाण्यामागे अजून एक शास्त्रीय कारण आहे.तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध म्हणजे प्रेम म्हणून ह्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात आणि वाटले जातात. हा सण थंडीत येतो. थंडी मध्ये अंगात उष्णता निर्माण व्हावी आणि  तिळामध्ये उष्णता असल्याने ह्या सणाला तिळाचे लाडू बनवले जातात. या सणाला सर्वत्र वेगवेगळ्या रंगाचे पतंग उडविले जातात. लहान मोठे सर्वच जन पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटतात.



                                            तुम्हा सर्वाना मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा
                                                      तिळगुळ घ्या गोड गोड बोल !!!

      




                                                                                                   - Nitin More

                               
                                             

राजकीय पत्रकारिता


Date : ११ - ०१ - २०१३
Lecturer : मधुकर कांबळे 


राजकीय पत्रकारिता 

राजकीय पत्रकारीता करताना सर्व विषयाला जाणून घेऊन विचार करावा. जिज्ञासा कायम जागी असावी. ज्या नैसर्गिक घटना घडत असतात तेव्हा त्याच्या विरोधी घटना ही घडत असतात. त्याला बातमी बोलतात.त्यामध्ये विरोधाभास शोधणे. चांगली निरीक्षण द्ष्टी असली पाहिजे.भारतीय राज्य घटना माहित असली पाहिजे. पत्रकारिता करताना बुद्धिवादी, तर्कवादी, निष्टावादी, असले पाहिजे.  
मंत्रालय म्हणजे काय?
मंत्रालयामध्ये काम करताना आपल्याला बेसिक रिपोटीग आले पाहिजे. म्हणजे प्रशासन म्हणजे काय हे माहित असणे आवश्यक असते. 
आपल्याला राजकीय पत्रकार म्हणून काम करताना लोकशाही रचना माहिती पाहिजे.लोकशाहीच्या रचनेवर कामकाज सिस्टिम वर आपली सगळी शासनाची व्यवस्था चालु असते. मंत्रालयात  भाषाविभाग आणि अल्पसंख्याक विभाग एकूण २७ विभाग आहेत.या प्रशासकिय विभागात ज्या घडामोडी घडतात त्याचे रिपोटीग करणे. शासन जेव्हा एखादा निर्णय घेते त्यामागे एक राजकीय हेतु असतो. त्याला विरोध करणारी ऐक यत्रंणा असते त्याला विरोधी पक्ष म्हणतात. मत्रांलयात काम करताना तूमचा संपर्क हा दाडगा जेणे करुन तूम्हाला कोणतीही न्यूज मिळवताना अडचणी येत नाहीत.सबंध सर्व थराच्या लोकांपर्यत असायला पाहिजे. 
विधिमंडळ रिपोटीग 
महाराष्ट्राचेतीन अधिवेशन होतात. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबर संबंध ठेवावे लागतात.जे तारतम्य ठेवावे लागते त्या तारतम्याला अभ्यासाची जोड असणे गरजेची असते.आपण पत्रकारिता करीत असताना आपण ज्या सोर्स कडून बातमी मिळवणार आहोत त्याचे नाव कोणाला हि सांगू नये जर सांगितले तर तो सोर्स आपल्याला ती बातमी देणार नाही. म्हणून त्यामुळे त्या सोर्स ला आपल्या बदल कटुता निर्माण होऊ नये आणि आपल्या बद्दल ची धास्ती आणि आदर राहिला पाहिजे. आपली नजर कायम वेगवेगळी बातमी शोधणारी पाहिजे आणि वेगवगळे शोधण्याची धडपड पाहिजे.
जर आपल्याला कोणत्या हि बातमीची किवा घटनेची इतम्भूत (सविस्तर) माहिती पाहिजे असेल तर ईऊघ ओमू (मानवी अधिकार आयोग) ने आपण ती माहिती मिळवू शकतो उदाहरणार्थ : आपल्या राज्यात आताच टोलनाक्या वरून खूप आंदोलने झाले कि आम्ही टोल भरणार नाही टोल रद्द करा म्हणून खूप आंदोलने झाले. एकूण किती टोलनाके आहेत. कोणत्या कंपनीला काम दिले आहे. त्या रस्त्याला किती खर्च आला आहे. हि इतम्भूत (सविस्तर) माहिती आपण ईऊघ ओमू ने मिळवू शकतो आणि ती पत्रकार म्हणून आपण लोकांसमोर आणि आपल्या समजा समोर मांडू शकतो.
लोकशाहीत पत्रकारितेला चौथा स्तंभ म्हणून गणले गेले आहे



-Nitin More




Wednesday, January 9, 2013

पेपर टॅब च्या रूपाने लंडन मध्ये तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार


'पेपर टॅब'च्या रूपाने लंडनमध्ये तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार

वृत्तसंस्था, लंडन

गॅजेटच्या वापराचा ट्रेंड सध्या स्मार्टफोनकडून टॅबकडे वळत आहे. या पार्श्वभूमीवर टॅब्लेटच्या क्षेत्रात सध्या दररोज नवनवे संशोधन होत आहे. कॅनडातील शास्त्रज्ञांनी त्यात एका क्रांतिकारी संशोधनाची भर घातली आहे. अगदी कागदाच्या जाडीचा आणि सहजपणे गुंडाळून कुठेही नेता येण्याजोगा टॅब्लेट या शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. येत्या पाच वर्षांत कदाचित तो तुमच्या 'पीसी'ची जागा घेऊ शकेल.

कॅनडातील क्वीन्स युनिव्हर्सिटीने प्लॅस्टिक लॉजिक आणि इंटेल लॅब्ज यांच्या सहकार्याने हे संशोधन केले आहे. या संशोधनातून 'अनब्रेकेबल' अशा क्रांतिकारी गॅजेट्सचा जन्म होणार आहे.

पेपर टॅबला लवचिक, हाय रिझॉल्यूशनचा १०.७ इंची प्लॅस्टिक डिस्प्ले आणि टचस्क्रीन आहे. इंटेल कोअर आय फाइव्ह या दुसऱ्या पिढीतील प्रोसेसरवर या टॅबचे काम चालते. 'या डिस्प्लेच्या माध्यमातून टॅबशी इंटरॅक्शन सुलभ होते. आजच्या घडीला काचेचे डिस्प्ले आहेत. त्या तुलनेत प्लॅस्टिकचे डिस्प्ले अधिक हलके, बारीक आणि वापरायला सुलभ आहेत,' असे 'प्लॅस्टिक लॉजिक'चे सीईओ इंद्रो मुखर्जी यांनी सांगितले.

येत्या आठवड्यात लास व्हेगासमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो होणार आहे. त्यावेळी या पेपर टॅबचे सादरीकरण करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

सध्याच्या पारंपरिक डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये एका स्क्रीनवर विंडोज वापरले जाते. त्याऐवजी प्रत्येक अॅप्लिकेशनसाठी स्वतंत्र कागद (पेपर शीट) वापरण्याची संकल्पना असलेल्या डेस्कटॉपची कल्पना या संशोधकांनी मांडली आहे. त्यामुळे एकाच स्क्रीनऐवजी दहा किंवा अधिक इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले किंवा पेपर टॅब वापरता येऊ शकतात. त्यांचा ई-बुक म्हणूनही वापर करता येऊ शकतो, ज्यात वाचणाऱ्यांना फक्त स्क्रीन वाकवून पाने उलटता येऊ शकतात. अनेक पेपर टॅब वापरणे हे अधिक सोपे असल्याचे मत क्वीन्स युनिव्हर्सिटीच्या ह्युमन मीडिया लॅबचे संचालक रोएल व्हर्टेगाल यांनी सांगितले.

'येत्या पाच-दहा वर्षांत कम्प्युटर्स, अल्ट्रा नोटबुक्स, टॅब्लेट्सऐवजी अशा रंगीत प्रिंटेड कागदांचा (पेपर टॅब) वापर सुरू होईल,' असा दावा इंटेलचे शास्त्रज्ञ रायन ब्रॉटमन यांनी केला आहे. तसेच कागदांचा वापरही मर्यादित होणार असल्यामुळे कागदांच्या गठ्ठ्यांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.

Tuesday, January 8, 2013

स्त्री - पुरुष समानता आणि त्यांचे प्रश्न?

दि.३१-१२-२०१२


Lecturer : जयश्री बोरकर

            सुरुवातीला माणूस एकत्र टोळीने वावरत असे. शिकार करून तो आपली भुक भागवत असे. शिकार केल्यानंतर तो जे शिकार केलेले मांस सारख्या पद्धतीने सर्वान मध्ये वाटत असे. मांस तो जास्त वेळ टिकवू आणि साठवू शकत नव्हता . मग प्रामुख्यांनी माणसाच्या डोक्यात कल्पना आली कि शेती करूया मग माणूस पारंपारिक पद्धतीने शेती करू लागला आणि त्याचा योग्य प्रकारे साठा करू लागला. या शेतीसाठ्यावर पुरुषाने आपल्या मसल पॉवर ने  प्रभुत्व दाखवू लागला. पुरुषाच्या मालकी हक्काला स्त्रियांनी कधीच विरोध दाखवला नाही आणि इथेच स्त्री- पुरुष समानतेला तडा गेला. 
            यानंतर वैदिक काळात शिक्षण- आयुष्यभर शिक्षण घेणं किंवा वयाच्या १६व्या वर्षापर्यंत शिक्षण घेणं २. कुटुंब संकल्पना- यामध्ये स्त्रीने चारित्र्य, शील, संस्कृती सांभाळायची. म्हणजे स्त्रियांनी सोवळे ओवाळे उपवास एकट्या स्त्रीनेच करायचे. पोथ्या वाचायच्या.एका पोथीत स्त्रीला असलेल्या मासिक पाळीच्या काळात तीने पोथी ऐकली की तीच्यासाठी चांडाळणी इ. शब्दांचा प्रयोग केला आहे. हे शब्द पुरुषांसाठी का नाहीत. जर एखाद्या या संकल्पनेचा विकास झाला हेच एकट्या स्त्रियांनी का करावे पुरुषाने का करू नये इथेच स्त्री - पुरुष समानतेला तडा गेला. 
आपल्या समाजाची मानसिकताच बघा ना जर एखाद्या पुरुषाची बायको मरण पावली तर त्याला लगेच त्याचे नातेवाईक (समाज) बोलतो आता तुला जेवण कोण बनवून घालणार, मुलांना कोण सांभाळणारपण हेच प्रश्न स्त्रीला कोणी विचारात नाही.  मग तो पुरुष लगेच सहा महिन्यात लग्न करून मोकळा होतो. पण तेच एखाद्या स्त्री चा नवरा मरण पावला तर बोलतात तू  आता राहणार कशी आणि मुलांना सांभाळणार कशी तू बाहेर जाऊन काम करणार कशी  तुला तर सवय नाही आहे तर तिला कोणीच बोलत नाही कि तू दुसरे लग्न कर तू  हीच आपल्या समाजाची मानसिकता आपण बदलली पाहिजे. 
अजूनही आपल्या जगात पुरुष प्रधान संस्कृती वावरत आहे. तर त्या ५० टक्के स्त्री आरक्षणाचा किती उपयोग होतो आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे.
उदा. रमाबाई रानडेंच्या सिरीयलमध्ये असं दाखवलं आहे की, त्यांची आत्या शिकली म्हणून तिचा नवरा वारला यामुळे त्यांची पूर्ण स्त्री पिढी शिकली नाही.आपण पाहायला गेलो तर आपल्या समाजाची अशी मानसिकता आहे कि एकट्या स्त्रीनेच घर सभांळायचे आणि २४ तास मोलकरणी सारखे घरात राबायचे. आणि त्यासाठी तिला कोणी पगार देत नाही. स्त्री  नवर्याचा पगार स्वतः साठी किती वापरते , जगात फक्त २ भेद स्त्री आणि पुरुष. भेद असायला हवे कारण पुढचं जग चालायला हवं. कोणीही एकटं हे जग चालवू शकत नाही. 
त्यामुळे ह्याच काळात स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार होत असे स्त्री ने बहुपत्नीकत्व, सती पद्धत, बायका ठेवणं. रामबाईचे लग्न वयाच्या १२ व्या वर्ष झाले तरी लग्न ठरत नव्हते तर त्यांच्या आई वडिलांना टेन्शन आले होते.त्याकाळात अगदी ५० वर्षाच्या माणसाबरोबर सात - आठ वर्षाच्या मुलीचे लग्न लावले जात असे. पण ती त्याकाळची गरज होती कारण त्याकाळी मुलीना उपभोगाची वस्तू  म्हणून मानले जात असे. तर हीच मानसिकता आपल्याला आता बदलयला हवी. 
              इंग्रज  भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले. ठराविक ठिकाणी ठराविक पिकवा ह्या त्यांच्या धोरणाने येथील शेती व्यवस्था आणि समाजरचना कोलमडून पडली आणि जिथे कारखाना तिथे लोक स्थलांतरित होऊ लागली. त्यामुळे शिक्षणाची गरज भासू लागली इंग्रजांना त्यांच्या देशातून शिकलेली माणसं इथे काम करायला आणावी लागत असे म्हणून इथल्याच लोकांना इंग्रजी भाषा यावी म्हणून शिक्षण पद्धती आणली. त्याचाच प्रसार होऊन, पुण्यात १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू झाली. इंग्रजांनी स्वत:च्या स्वार्थासाठी शिक्षण सुरू केलं. त्यानंतर १९४७ साली देश स्वतंत्र झाला त्यानंतर आतापर्यंतची स्थिती कशी आहे, स्त्री पुरुष समानता आहे का, काय वाटतं, पुरुषाने मुलं झाली म्हणून करियर सोडलं का, लिंग तपासण्यासाठी १०००रु. घेतले जातात. आपल्याकडे लग्न व्यवस्था  कशी आहे, जात, पगार, नोकरी, जेवण येतं का  यांविषयीचे प्रश्न विचारले जातात. त्याऐवजी एकमेकांच्या आवडीनिवडी विचारायला हव्यात. कारण लग्न व्यवस्थेमुळे दोन घरे एकत्र येतात. तसेच लग्नानंतर काही वर्षांत बायको  मरण पावली तर  तू आता कसं सांभाळणार मुलांना, तुला जेवण करून कोण घालणार असे प्रश्न त्याला विचारले जातात हे प्रश्न स्त्रीला कोणी विचारत नाही. शिवाय पुरुष सहा महिन्यांच्या आत लग्न करून मोकळाही होतो. तसं स्त्रीचं नाही ती मात्र आयुष्यभर नव-यानंतर मुलांना मरेपर्यंत सांभाळते. यावरून स्त्री ही अबला नाही तर सबला आहे सबला नसती तर स्त्रीने नव-यानंतर मुलांना मरेपर्यंत मोठं केलं नसतं.
           आज ८० टक्के स्त्रिया या शिकलेल्या आहेत आणि त्या घरातच बसून आहेत. विकास आणि वाढ ह्या परस्पर दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपली वाढ हि होत असते आणि ती आपण थांबवू शकत नाही आणि विकास थांबवू शकतो किवा करू शकतो. आजच्या कलियुगात माणूस फक्त आपला आणि आपलाच विचार करतो बाकीच्या कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही. कुठे एकीकडे बलात्कार झाला ना तर आपण विचार करतो त्या मुलीवर बलात्कार झाला ना आपल्या आया आणि बहिणीवर झाला नाही ना हि समाजात  पसरत चाललेली मानसिकता आपल्या बदलयला हवी नाही तर आपण नुसते बोलयाचे भारत माझा देश आहे आणि सारे बांधव माझे भावू - बहिण आहेत ते का थुंकण्यासाठी ? म्हणून आपण सर्वांनी स्त्रीयांन कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलयला हवा आणि आपण सर्वांनी विचार केला तर जे ५० टक्के आरक्षण महिलांना दिले आहे त्याचा पुरेपूर वापर होत आहे का ? ते हि पहिले पाहिजे आणि आपली पुरुषप्रधान संस्कृतीत  स्त्रियांना आपण स्त्री - पुरुष समानतेचा समान हक्क देत आहोत का ह्याचा हि आवर्जून आपण आणि आपल्या पत्रकारांनी विचार करावा? आपण हि आपल्या समाजाचे काही तरी देणे लागतो हे सर्वांनी  विसरू नये.


 -ni3more