Total Pageviews

Friday, January 18, 2013

आमची मुंबई...'सुरक्षित' मुंबई...?

                                               
                                                  
                                                                              
                                                                          
                                                आमची मुंबई सुरक्षित मुंबई आहे का?
           'मुंबई" एक स्वप्नांची नगरी.या नगरीत जगण्याचा सर्व जण काटेकोरपणे प्रयत्न करत असतात. 'मुंबई' हि आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. या राजधानीत पोटाची खळगी भागवण्यासाठी देश भरातून लोक येथे प्रस्थान करतात. जेणेकरून येथे पुरेसा कामधंदा उपलब्ध होत असल्याने लोक या स्वप्नांच्या नगरीची वाट धरतात. पण आपण पाहायला गेलो तर या मुंबईत रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने परप्रांतीयांचे एवढे लोंढे दिवसेंदिवस या स्वप्नांच्या नगरीत प्रस्थान करतात. एवढी प्रचंड गर्दी वाढली आहे, की विचारयला नको. म्हणून तर प्रत्येक जण या स्वप्नांच्या नगरीत फक्त एकच स्वप्न घेऊन येतात , 'मुंबई' म्हटले तर CID फिल्म मधले हे गाणे आठवते  ये दिल ही मुश्किल ही जीना याह, जरा हट  के, जर बच के  येह बोम्बय मेरी जान !!!. याच स्वप्नांच्या नगरी मध्ये प्रत्येक जण मोठे - छोटे काम करण्याच्या उद्देशाने मुंबईत येत असतो पण आपण ह्याचा कधी विचार केला का, मुंबईत एवढे परप्रांतीय लोंढे वाढले आहेत की त्यामुळे मुंबई मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.  मुंबई हि खरच सुरक्षित आहे की नाही हे म्हण्याची वेळ आली आहे .
            याच धर्तीवर पाहायला गेलो तर आताच थोड्या दिवसापूर्वी राजधानी दिल्लीत बसमध्ये एका २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराने आणि अत्त्याचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरच कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त उशिरा पर्यंत घराबाहेर पडणाऱ्या मुली, तरुणी, महिला सुरक्षित आहेत का...? रात्री अपरात्री त्या मुंबईत बिनधास्त फिरू शकतात का...? घराबाहेर सोडा , निदान आपल्या घरामध्ये तरी महिला सुरक्षित असतात का...? त्याचाच घेतलेला हा एक आढावा.
          राजधानी दिल्लीत एका २३ वर्षीय तरुणीवरील सामुहिक बलात्काराच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली असताना राजधानी दिल्लीची मान शरमेने खाली टाकणारी घटना घडली. फेसबुकच्या माध्यमातून जाळ्यात ओढून एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला ३१ च्या रात्री हा प्रकार घडला. दोघेही आरोपी उच्चशिक्षित आहेत. दिल्लीत दहा दिवसापूर्वी एका तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाने देश हादरला असतानाच आणखी एक घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशात एका ४२ वर्षीय महिलेवर तीन पुरुषांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली अश्या किती तरी घटना  घडल्या आहेत. पाहायला गेलो तर ज्या घटना घडल्या आहेत त्या वेगवेगळ्या राज्यात घडल्या आहेत आणि सर्व राज्याचा विचार करायला गेलो  तर माझ्या मते मुंबई ही ईतर राज्यांपेक्षा सुरक्षित राज्य आहे. 
मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने साहजिकच येथे महिलांचे काम करण्याचे प्रमाण खूप आहे.  कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त उशिरा पर्यंत घराबाहेर असणाऱ्या मुली, तरुणी, महिला सुरीक्षित आहेत का...? रात्री अपरात्री त्या मुंबईत बिनधास्त फिरू शकत नाहीत आणि घराबाहेर सोडा त्या आपल्याच घरामध्ये सुरक्षित नाही आहेत. त्याचेच उदहरण पहिले तर हल्लीच डोंबिवलीत माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य घडले. डोंबिवलीत एका मुलीवर तिच्याच वडिलांनी आणि भावानी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. खरच मुली, स्त्रिया बाहेरच काय तर आपल्या घरात देखील सुरक्षित नाही आहेत.
       महिलांवर होणारे अत्याचार, विनयभंग, छेडछाड अशा निषेधार्ह घटनांचे प्रमाण संपूर्ण समाजच गावगुंडांच्या पातळीवर येऊन पोहचला असावा अशी शंका येण्याइतपत वाढले आहेत. केवळ सार्वजनिक ठिकाणी महिला पोलीस तैनात करून या गावगुंडाना धाक बसणार नाही. अत्यंत कठोर कायदा आणि आजामीनपात्र गुन्हा यामुळेच अशा वासनांधांना जरब बसू शकेल. मुक्या म्हणजे स्त्रियांनी, ज्यांना आमचे जुने लोक 'अबला' म्हणतात, त्यांनीच आता 'सबला' होऊन अशा गाव गुंडांना धडा शिकवणेही तितकेच गरजेचे आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:' अशा अर्थाचे एक संस्कृत वचन आहे. याचा अर्थ 'जेथे महिलांना सन्मान केला जातो, स्त्रीला पूजनीय मानले जाते तिथे देवतांचा निवास असतो. आपल्या देशात स्त्रीयाबाबत बोलताना नेहमीच हे वाक्य ऐकवले जाते, त्याचप्रमाणे ते अनेक ठिकाणी वाचनातही येते. दुर्देव असे कि अशा प्रकारचे वाक्य आपल्या बोलण्यात किवा ऐकण्यात सातत्याने येत असते तरी ते आचरणात मात्र येत नाही. आपल्याकडे काय होते तर, महिलांचे शोषण, ताडन, तिच्यावर अत्याचार, मारहाण, लंपटगिरी, विकृत शेरेबाजी. अलीकडच्या काळातील घटना पहिल्या तर लक्षात येते कि, वासनांध विकृतांच्या या टोळ्यांकडून तरुण मुलीही लक्ष्य होतात आणि अगदी साठीतल्या ज्येष्ठ महिलाही. भर रस्त्यातही हे सुरु असते आणि बंद दाराआडही अश्या महिलांचे अनेक हुंदके पदरचे बोळे तोंडात कोंबून दाबले जातात. कुटुंबियांकडून, वडीलधार्यांकडून, नातेवाईकांकडून, शिक्षकांकडून होणारे लैंगिक शोषण तर मृत्यू परवडावा इतके लज्जास्पद. लहान मुलीही या विकृत कामुकांच्या  चाळ्यांची शिकार बनतात, नकळत्या वयात वडिलांकडून त्यांचे लैंगिक शोषण होते हे 'मेरा भारत महान' म्हणणाऱ्या कुणालाच लांच्छनास्पद वाटत नाही. ऑनर किलिंगच्या घटनांमध्येही महिलाच लक्ष्य बनते. मग कोलकात्यात कुणी भाऊच जिचे रक्षण कार्याचे त्याच बहिणीचे मुंडके धडावेगळे करतो, कुठे आई वडील मुलीचा गळा दाबतात. केरळमध्ये सहा वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण वडिलाच करतात, डोंबिवलीत सडकछाप मुले त्यांच्या शेरेबाजीला विरोध करणाऱ्या मित्रालाच खलास करतात, पवईत ज्येष्ठ महिलेवर अत्याचार केला जातो... अशा कितीतरी घटना. नकळत्या वयातील अशा घटना मनावर कायमचे ओरखडे उठवतात, मानसिक आणि वर्तन समस्यांना कारणीभूत ठरतात. खेळण्याबागडण्याच्या वयात आपले लैंगिक शोषण होते आहे हे कळण्याचीही समज  आलेली नसते. अशा किती जणी उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि होत आहेत. मंदिरामध्ये स्त्रीशक्तीची देविस्वरुपात पूजा होते आणि सार्वजनिक ठिकाणी, अनेक घरांच्या बंद दाराआड मात्र तिची विटंबना, उपेक्षा सुरु असते. पुरुषप्रधान संस्कृतीत हा दुटप्पीपणा  पिढ्यानपिढ्या सुरु आहे. आजची स्त्री कितीही सुशिक्षित असली, स्वताच्या पायावर उभी असली तरीही तिला अशी हीन वागणूक मिळावी ही दुर्दैवी बाब आहे. विचार मनाला अस्वस्थ करणारे हे वास्तव चित्र भयानक आहे. स्त्री म्हटली की, ती कमकुवत किवा दुय्यम मानण्याची मानसिकता अजूनही बदलत नाही. संस्कृतीत स्त्री पुज्य मानणे आणि प्रत्यक्षात तिला केवळ भोग्य वस्तू समजून तिची अशी मानहानी होणे, अशा प्रकारच्या संतापजनक विरोधाभास दुर्दैवाने आपली सामाजिक ओळख बनला आहे. घरापासून शाळा-महाविद्यालया पर्यंत आणि अगदी कार्यालया पर्यंत महिलांशी दुय्यम व्यवहार केला जातो. या सगळ्याला सारवलेल्या पुरुषांना यात काही चुकते आहे, असेही वाटत नाही. मुलगा हा वंशाचा दिवा आणि मुलगी हे परक्याचे धन मानण्याची पद्धत आपल्याकडे आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेप्रमाणे मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो. त्यासाठी  आपल्या समाजानी आणि आपण आपल्या विचारा मध्ये बदल करून स्त्री आणि पुरुष यांना समानतेने वागवले पाहिजे. जेणे करून हे भेद निर्माण होणार नाहीत
        भारतीय तत्वानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी दुसर्या बाजूला टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदुमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती अश्या प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरुष दैवतांची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची. तरीही आज समाजात स्त्री च्या पोटात मुलगी आहे हे काळल्यावर तिला या जगात येऊन दिले जात नाही आणि येऊन दिले तर त्या आईचा मानसिक आणि शारीरक  छळ केला जातो किवा त्या जन्मलेल्या  मुलीला एखाद्या कचर्याच्या डब्यात किवा गटारात सोडून दिले जाते. अश्याच एक घटना मागे कल्याण मध्ये घडली होती. खरच पाहायला गेलो तर एक स्त्रीच एका स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक  छळाला कारणीभूत असते त्यामुळे आज स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. एकी कडे स्त्री ला देवी म्हणून तिची पूजा अर्चा करायची आणि तिचा मानसिक आणि शारीरक छळ करायचा खरच हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार अजून ही आपल्या महाराष्ट्रात घडत आहे. या वर सरकारने कितीही कायदे केले तरी अश्या घटनान मध्ये दिवसेंदिवस  झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. स्त्रिया कितीही शिकलेल्या असल्या तरी त्यांना स्त्रियांना शारीरिक , मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. आणि त्या निमूट पणे सहन करत असतात. हल्ली मुंबई लोकल मध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार वाढले असतानाच  मागेच चर्चगेट-बोरीवली लोकल मध्ये एका मुलीला लोकल रोमियो कडून चाकूचा धाक दाखवण्यात आला आणि तिची लुट करण्यात आली. तसेच दिवसेंदिवस वृद्धांवर होणारे हल्ले आणि अत्याचार यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणे वाढले आहेत. डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या घटनेने महिलावरील अत्याचारांनी कळस गाठल्याचे सिद्ध झाले आहे.गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनां मध्ये बरीच वाढ झाल्याचे दिसले आहे.गेल्या वर्षभरात ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत १०६ बलात्कार १९८ विनयभंगाचे प्रकार घडले आहेत.एकीकडे अशा गुन्ह्यांची संख्या वाढली असली तरी हत्येचे गुन्हे मात्र कमी झालेत. सन २०११ मध्ये १२७ हत्यांनी ठाणे जिल्हा हादरला होता. मागील वर्षी ही संख्या ११० इतकी नोंदवली गेली. 
            दिल्लीत ज्या २३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला त्या घटनेने संपूर्ण देश हादरून  गेला असून जागोजागी आंदोलने आणि निर्दशने करण्यात आली ह्याच पार्श्वभूमीवर सरकारने बलात्कार करणार्यांवर फास्ट ट्रक कोर्ट स्थापन करून त्याची जलद गतीने चौकशी करावी असा दबाव संपूर्ण जनसमुदायाकडून सरकारवर टाकण्यात आला. पण या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण होत असताना महिलांवरील अत्याचाराची गंभीर दखल घेऊन सरकारने अधिकाधिक कडक कायदे करावेत, यासाठी आंदोलनांचा भडका उडाला असला तरी अश्या सर्व स्फोटक वातावरणात आमची मुंबई, 'सुरक्षित' मुंबई नाही आहे कारण दिवसेंदिवस येथील वृद्धांवर, महिलांवर, मुलींवर होणारे अत्याचार हे कधीच थांबणार नाहीत कारण आपण आज ज्या एकवीस साव्या शतकात वावरत आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीवर पाश्चिमात्य देशांचा एवढा प्रभाव पडला आहे कि आपण त्या पुढारलेल्या आणि पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करत आहोत. चित्रपटान मध्ये वाढलेले अश्लीलीकरण ह्याला कारणीभूत आहे. हल्लीच एका नेत्याने वक्तव्य केले कि पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करून आजची पिढी वाया गेली आहे.
                       माझ्या मते, दिल्ली, उत्तर प्रदेश, हैद्राबाद,पुणे या राज्या पेक्षा थोडी तरी सुरक्षित आहे.  कारण मुंबई मध्ये कोणीही केव्हाही अपरात्री फिरू शकतो. पण सध्या राजधानी दिल्लीत बसमध्ये एका 23 वर्षीय तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरून गेला आहे. पण त्यामुळे आता मुंबई ही मुलींसाठी सुरक्षित आहे हे सांगता येणार नाही. पाहायला गेलो तर मुली हि काही प्रमाणात ह्याला जबाबदार आहेत. प्रत्येकालाच आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा, फिरण्याचे स्वतंत्र, हवे तसे कपडे घालण्याचे स्वतंत्र  आपल्या राज्य घटनेने दिले असले तरी स्त्रियांनी व मुलींनी आपल्याला शोभेल असेच कपडे परिधान करावे जेणे करून मुल आकर्षित होणार नाहीत. मुलींनी आपल्या स्व:स्वरक्षणासाठी त्यांनी आपल्या जवळ चाकू, मिरची पूड, स्प्रे स्वतः जवळ ठेवावा जेणे करून अशी वेळ आली तर आपण आपले स्वतःचे स्व:रक्षण करू शकतो.
                                                               

 याच पार्श्वभूमीवर आपली मुंबई ही सुरक्षित आहे की नाही त्याबद्दल घेतलेल्या प्रतिक्रिया खालील प्रमाणे

मुंबई शहरातही मुली सुरक्षित नाहीत. मात्र अन्य शहरांच्या तुलनेत पहिले तर मुंबई सुरक्षित आहे. मी स्वतः मिडिया क्षेत्रात गेली तीन वर्ष काम करीत आहे. त्यामुळे सातच्या आत घरात हि चौकात पाळणे शक्य नाही. रात्री नेहमी उशिरा घरी येण होतच. पण अद्याप मला कोणताही वाईट अनुभव आला नाही. उशिरा येताना कोणीही छेड kadhan, किवा पाठलाग करणं, विनयभंगाचा प्रयत्न असा कोणताही प्रकार माझ्यासोबत घडला नाही आणि शेजारी राहणाऱ्या कोणत्या हि मुलीवर असा प्रकार अद्याप असा घडलेला नाही. वाईट घटना सर्वत्रच गाढत आहेत पण तुलनेने मुंबई शहरात फार कमी आहेत असे माजे मत आहे. मी रात्री १२ च्या सुमारास रिक्षा न मिळाल्यामुळे जोगेश्वरी स्टेशन पासून घरापर्यंत अर्ध्या तासाचे अंतर चालत प्रवास केला आहे. मात्र आजपर्यंत मला काही समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळे आमची मुंबई सुरक्षित मुंबई नक्कीच आहे.
                                                                     -वैजंता गोगावले, उपसंपादक, दै. मुंबई लक्षदीप 


महिला,मुली या मुंबई मध्ये सुरक्षित असण्या पेक्षा त्याआधी पोटात तरी सुरक्षित आहेत का? माझा प्रश्न हा आहे. बलात्कार, छेडछाड,विनयभंग, हुंडाबळी, स्त्री- भ्रूणहत्या ही तर स्त्री वर होणाऱ्या अत्याचाराची यादीच आहे. स्त्रीच्या पोटात मुलगी आहे हे कळल्यावरती तिला या जगात येवून देत नाही जरी येऊन दिले तर तिचा आईचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो . स्त्रीचे चारित्र्य हे काचेच्या ग्लासा सारखे आहे. एकदा तिच्यावर शिंतोडे उडवले कि खूप बदनामी सहणार करावी लागते. मुलीना दिल्ली मध्ये चालत्या बस मध्ये त्या मुलीवर जालेला तो प्रकार सगळ्यांच्याच मनावर जखम देऊन गेला आहे.आज दिल्ली काय मुंबई हि मुलींसाठी सुरक्षित नाही आहे.
                                                                              -  प्रिती सरदेसाई,  (ज्युनिअर असोसिएट)

बलात्कारसारखे प्रकार कुठेही घडू शकतात. त्यामुळे अमुक एक ठिकाणच स्त्रियांच्या दृष्टीने सुरक्षित आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर देत येण कठीण आहे. फक्त मुंबईतच कशाला माझ्या मते कोणत्याही ठिकाणी रात्री अपरात्री एकटीने बहरे पडताना कोणतीही स्त्री कचरते. दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणाने देश खडबडून जागा झाला. डोंबिवलीच्या एका मुलीवर तब्बल २ वर्ष तिच्याच वडिलांनी आणि भावाने होणार्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक घटना समोर आली. या अशा घटना पाहता स्त्रिया आपल्या घरीच सुरक्षित नाही आहेत. बलात्कार सारख्या अक्षम्य गुन्ह्यासाठी कडक शिक्षा हवीच पण त्याच बरोबर पुरुषांना योग्य समुपदेशाची गरज आहे. मुलांना लैंगिक शिक्षणाचे योग्य ते शिक्षण दिले पाहिजे.                                                                                                 
                                                                                                   - प्रणाली पवार,  डोंबिवली



सध्या आपल्या देशात मुलींचे आणि स्त्रियांच्या बाबतीतले वातावरण एकदम भयावह झाले आहे. अशा वातावरणात आपली मुंबई सुरक्षित आहे कि नाही सांगूच शकत नाही. सध्या रोज नवीन नवीन घटना बलात्कार, छेडछाडीच्या घटना ऐकायला येतात. कामासाठी किवा शिक्षणासाठी मुलीना आणि तरुणींना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. त्या घरी पोहचे पर्यंत घरची माणसे खूप चिंते मध्ये असतात. हे सर्व कुठे तरी थांबले पाहिजे. रात्री अपरात्री मुली बिनधास्त पुरुषान प्रमाणे फिरू शकत नाही. रात्री मुलगी रस्त्यावर दिसली कि पुरुषांचा तिच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन लगेच बदलतो. आज तर लहान निरागस मुलींनासुद्धा हे नराधम सोडत नाही. आपल्या देशात तर एवढी वाईट  परिस्थिती निर्माण झाली आहे कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. शेजारच्या माणसांवर किवा नातेवाईकांवर पण पूर्ण पाने विश्वास ठेवता येत नाही. रक्ताची माणसेच स्त्रीत्वाचा आदर करत नाही तर बाहेरच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार. हे कुठे तरी थांबायल पाहिजे मुलींना सुद्धा मोकळे पणाने फिरू दिले पाहिजे. माझ्या मते स्त्रियांसाठी, मुलींसाठी मुंबई अन्य राज्यानप्रमाणे सुरक्षित नाही आहे  
                                                                                 - श्रद्धा कामत, (ज्युनिअर असोसिएट)


नितीन मोरे 

No comments: