दि.३१-१२-२०१२
Lecturer : जयश्री बोरकर
सुरुवातीला माणूस एकत्र टोळीने वावरत असे. शिकार करून तो आपली भुक भागवत असे. शिकार केल्यानंतर तो जे शिकार केलेले मांस सारख्या पद्धतीने सर्वान मध्ये वाटत असे. मांस तो जास्त वेळ टिकवू आणि साठवू शकत नव्हता . मग प्रामुख्यांनी माणसाच्या डोक्यात कल्पना आली कि शेती करूया मग माणूस पारंपारिक पद्धतीने शेती करू लागला आणि त्याचा योग्य प्रकारे साठा करू लागला. या शेतीसाठ्यावर पुरुषाने आपल्या मसल पॉवर ने प्रभुत्व दाखवू लागला. पुरुषाच्या मालकी हक्काला स्त्रियांनी कधीच विरोध दाखवला नाही आणि इथेच स्त्री- पुरुष समानतेला तडा गेला.
यानंतर वैदिक काळात शिक्षण- आयुष्यभर शिक्षण घेणं किंवा वयाच्या १६व्या वर्षापर्यंत शिक्षण घेणं २. कुटुंब संकल्पना- यामध्ये स्त्रीने चारित्र्य, शील, संस्कृती सांभाळायची. म्हणजे स्त्रियांनी सोवळे ओवाळे उपवास एकट्या स्त्रीनेच करायचे. पोथ्या वाचायच्या.एका पोथीत स्त्रीला असलेल्या मासिक पाळीच्या काळात तीने पोथी ऐकली की तीच्यासाठी चांडाळणी इ. शब्दांचा प्रयोग केला आहे. हे शब्द पुरुषांसाठी का नाहीत. जर एखाद्या या संकल्पनेचा विकास झाला हेच एकट्या स्त्रियांनी का करावे पुरुषाने का करू नये इथेच स्त्री - पुरुष समानतेला तडा गेला.
आपल्या समाजाची मानसिकताच बघा ना जर एखाद्या पुरुषाची बायको मरण पावली तर त्याला लगेच त्याचे नातेवाईक (समाज) बोलतो आता तुला जेवण कोण बनवून घालणार, मुलांना कोण सांभाळणारपण हेच प्रश्न स्त्रीला कोणी विचारात नाही. मग तो पुरुष लगेच सहा महिन्यात लग्न करून मोकळा होतो. पण तेच एखाद्या स्त्री चा नवरा मरण पावला तर बोलतात तू आता राहणार कशी आणि मुलांना सांभाळणार कशी तू बाहेर जाऊन काम करणार कशी तुला तर सवय नाही आहे तर तिला कोणीच बोलत नाही कि तू दुसरे लग्न कर तू हीच आपल्या समाजाची मानसिकता आपण बदलली पाहिजे.
अजूनही आपल्या जगात पुरुष प्रधान संस्कृती वावरत आहे. तर त्या ५० टक्के स्त्री आरक्षणाचा किती उपयोग होतो आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे.
उदा. रमाबाई रानडेंच्या सिरीयलमध्ये असं दाखवलं आहे की, त्यांची आत्या शिकली म्हणून तिचा नवरा वारला यामुळे त्यांची पूर्ण स्त्री पिढी शिकली नाही.आपण पाहायला गेलो तर आपल्या समाजाची अशी मानसिकता आहे कि एकट्या स्त्रीनेच घर सभांळायचे आणि २४ तास मोलकरणी सारखे घरात राबायचे. आणि त्यासाठी तिला कोणी पगार देत नाही. स्त्री नवर्याचा पगार स्वतः साठी किती वापरते , जगात फक्त २ भेद स्त्री आणि पुरुष. भेद असायला हवे कारण पुढचं जग चालायला हवं. कोणीही एकटं हे जग चालवू शकत नाही.
त्यामुळे ह्याच काळात स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार होत असे स्त्री ने बहुपत्नीकत्व, सती पद्धत, बायका ठेवणं. रामबाईचे लग्न वयाच्या १२ व्या वर्ष झाले तरी लग्न ठरत नव्हते तर त्यांच्या आई वडिलांना टेन्शन आले होते.त्याकाळात अगदी ५० वर्षाच्या माणसाबरोबर सात - आठ वर्षाच्या मुलीचे लग्न लावले जात असे. पण ती त्याकाळची गरज होती कारण त्याकाळी मुलीना उपभोगाची वस्तू म्हणून मानले जात असे. तर हीच मानसिकता आपल्याला आता बदलयला हवी.
इंग्रज भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले. ठराविक ठिकाणी ठराविक पिकवा ह्या त्यांच्या धोरणाने येथील शेती व्यवस्था आणि समाजरचना कोलमडून पडली आणि जिथे कारखाना तिथे लोक स्थलांतरित होऊ लागली. त्यामुळे शिक्षणाची गरज भासू लागली इंग्रजांना त्यांच्या देशातून शिकलेली माणसं इथे काम करायला आणावी लागत असे म्हणून इथल्याच लोकांना इंग्रजी भाषा यावी म्हणून शिक्षण पद्धती आणली. त्याचाच प्रसार होऊन, पुण्यात १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू झाली. इंग्रजांनी स्वत:च्या स्वार्थासाठी शिक्षण सुरू केलं. त्यानंतर १९४७ साली देश स्वतंत्र झाला त्यानंतर आतापर्यंतची स्थिती कशी आहे, स्त्री पुरुष समानता आहे का, काय वाटतं, पुरुषाने मुलं झाली म्हणून करियर सोडलं का, लिंग तपासण्यासाठी १०००रु. घेतले जातात. आपल्याकडे लग्न व्यवस्था कशी आहे, जात, पगार, नोकरी, जेवण येतं का यांविषयीचे प्रश्न विचारले जातात. त्याऐवजी एकमेकांच्या आवडीनिवडी विचारायला हव्यात. कारण लग्न व्यवस्थेमुळे दोन घरे एकत्र येतात. तसेच लग्नानंतर काही वर्षांत बायको मरण पावली तर तू आता कसं सांभाळणार मुलांना, तुला जेवण करून कोण घालणार असे प्रश्न त्याला विचारले जातात हे प्रश्न स्त्रीला कोणी विचारत नाही. शिवाय पुरुष सहा महिन्यांच्या आत लग्न करून मोकळाही होतो. तसं स्त्रीचं नाही ती मात्र आयुष्यभर नव-यानंतर मुलांना मरेपर्यंत सांभाळते. यावरून स्त्री ही अबला नाही तर सबला आहे सबला नसती तर स्त्रीने नव-यानंतर मुलांना मरेपर्यंत मोठं केलं नसतं.
आज ८० टक्के स्त्रिया या शिकलेल्या आहेत आणि त्या घरातच बसून आहेत. विकास आणि वाढ ह्या परस्पर दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपली वाढ हि होत असते आणि ती आपण थांबवू शकत नाही आणि विकास थांबवू शकतो किवा करू शकतो. आजच्या कलियुगात माणूस फक्त आपला आणि आपलाच विचार करतो बाकीच्या कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही. कुठे एकीकडे बलात्कार झाला ना तर आपण विचार करतो त्या मुलीवर बलात्कार झाला ना आपल्या आया आणि बहिणीवर झाला नाही ना हि समाजात पसरत चाललेली मानसिकता आपल्या बदलयला हवी नाही तर आपण नुसते बोलयाचे भारत माझा देश आहे आणि सारे बांधव माझे भावू - बहिण आहेत ते का थुंकण्यासाठी ? म्हणून आपण सर्वांनी स्त्रीयांन कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलयला हवा आणि आपण सर्वांनी विचार केला तर जे ५० टक्के आरक्षण महिलांना दिले आहे त्याचा पुरेपूर वापर होत आहे का ? ते हि पहिले पाहिजे आणि आपली पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आपण स्त्री - पुरुष समानतेचा समान हक्क देत आहोत का ह्याचा हि आवर्जून आपण आणि आपल्या पत्रकारांनी विचार करावा? आपण हि आपल्या समाजाचे काही तरी देणे लागतो हे सर्वांनी विसरू नये.
-ni3more
No comments:
Post a Comment