Total Pageviews

Monday, March 18, 2013

भारताने साधली विजयाची हॅटट्रिक !!!


मोहाली - सर्वोत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी करीत भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत विजयाची हॅटट्रिक साधली आहे. तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासह भारताने 3-0  अशा फरकाने मालिका जिंकली आहे. तिसऱ्या कसोटीत भारताने ६ गडी राखून ऑस्ट्रेलियाला मैदान      खविले.
आज (सोमवार) सामन्याच्या शेवटच्या दिवशी रवींद्र जडेजा, प्रग्यान ओझा आणि आर. अश्विन या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ पॅव्हेलियन पाठविले. ओझाने नॅथन लिऑनला धोनीकरवी झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असूनही कर्णधार मायकेल क्लार्क मैदानात उतरला. क्लार्कने थोडाफार जम बसविण्याचा प्रयत्न केला. पण, रवींद्र जडेजाने मालिकेत पाचव्यांदा त्याला बाद करण्याची कामगिरी केली. त्यापाठोपाठ हेन्रिकसही जडेजाकडेच झेल देऊन बाद झाला. सिडलला ओझाने त्रिफळाबाद केले. ब्रॅड हॅडीन, मिशेल स्टार्क आणि झेव्हियर डोहर्टी यांनी काही षटके खेळून काढत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. अखेर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २२३ धावांत संपुष्टात आला. भारताकडून जडेजा आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी तीन, तर ओझा आणि अश्विनने प्रत्येकी दोन बळी मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासमोर भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरवात करत चहापानापर्यंत बिनबाद ३० धावा केल्या आहेत. हाताच्या दुखापतीमुळे शिखर धवन दुसऱ्या डावात खेळू शकला नाही.

त्यापूर्वी, चौथ्या दिवशी मुरली विजयची दमदार दीडशतकी खेळी आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे पहिल्या डावात 91 धावांची आघाडी घेतलेल्या भारताने भुवनेश्‍वर कुमारच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाची 3 बाद 75 अशी बिकट अवस्था करून विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. 91 धावांनी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरवात खराब झाली. भुवनेश्‍वरच्या पहिल्याच षटकात आततायी फटका मारण्याच्या प्रयत्नात वॉर्नर बाद झाला. भुवनेश्‍वरने त्यानंतर कोवनचा अडथळा दूर केला. कर्णधार मायकेल क्‍लार्कच्या पाठीला दुखापत झाल्याने तो वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आला नाही. भुवनेश्‍वरने स्टीव्हन स्मिथला त्रिफळाचीत करून ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्‍का दिल्यानंतर त्यांनी बचावात्मक पवित्रा घेत नाईट वॉचमन म्हणून नॅथन लियॉनला फलंदाजीला पाठविले. फिल ह्युजने प्रथमच मालिकेत संघाला सावरताना अर्धशतक पूर्ण केले. सामन्यापूर्वी विजयाची भाषा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला उद्या (सोमवारी) पाचव्या दिवशी पराभव टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. भारताकडे अजून 16 धावांची आघाडी आहे आणि ह्युज 53 धावांवर खेळत आहे.

तत्पूर्वी, चौथ्या दिवशीचा खेळ सुरू होताना सर्वांच्या नजरा शिखर धवनवर होत्या. पदार्पणात द्विशतक करायची कमाल धवन करतो का, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र, लियॉनच्या ऑफस्पीनवर धवन लगेचच बाद झाला. त्याने 33 चौकार 2 षटकारांसह 187 धावांची खेळी केली. चेतेश्‍वर पुजाराला पंचांनी चुकीचे पायचीत दिले. सिडलचा चेंडू पायावर लागण्यापूर्वी पुजाराच्या बॅटला लागला होता. सचिन तेंडुलकरला 37 धावांवर स्मिथने बाद केले. त्यानंतर मिचेल स्टार्कने मुरली विजय आणि धोनीला लागोपाठ पायचीत केले, तर सिडलने रवींद्र जडेजा आणि अश्‍विनला बाद केले. भारतीय संघ पहिल्या डावात आघाडी मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना अचानक 7 फलंदाज तंबूत परतले. त्या वेळी विराट कोहलीला संयमी भुवनेश्‍वर कुमारने साथ दिली. भुवनेश्‍वर बाद झाल्यावर सिडलने तळातील फलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली नाही आणि भारताचा डाव 499 धावांवर संपला. विराट कोहली 67 धावांवर नाबाद राहिला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 408
भारत पहिला डाव
विजय पायचीत गो. स्टार्क 153
(317 चेंडूंत 19 चौकार, 3 षटकार)
धवन झे. कोवन गो. लियॉन 187
(174 चेंडूंत 33 चौकार, 2 षटकार)
पुजारा पायचीत गो. सिडल 1
तेंडुलकर झे. कोवन गो. स्मिथ 37
कोहली नाबाद 67
(129 चेंडूंत 7 चौकार, 1 षटकार)
धोनी पायचीत गो. स्टार्क 4
जडेजा झे. हॅडिन गो सिडल 8
अश्‍विन झे. हॅडिन गो. सिडल 4
भुवनेश्‍वर झे. हॅडिन गो. हेन्रिकेस 18
इशांत झे. हॅडिन गो. सिडल 0
ओझा त्रि. गो. सिडल 1
अवांतर 19
एकूण 132.1 षटकांत सर्व बाद 499
बाद क्रम : 1-289, 2-292, 3-384, 4-412, 5-416, 6-427, 7-431, 8-492, 9-493, 10-499.
गोलंदाजी
मिचेल स्टार्क 23-5-74-2
पीटर सिडल 29.1-9-71-5
मोझेस हेन्रिकेस 15-1-62-1
नॅथन लियॉन 31-4-124-1
झेव्हिएर डोहर्टी 24-8-87-0
स्टीव्हन स्मिथ 10-0-63-1

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव
वॉर्नर झे. धोनी गो. भुवनेश्‍वर 2
कोवन पायचीत गो. भुवनेश्‍वर 8
फिल ह्यूज खेळत आहे 53
(68 चेंडूंत 9 चौकार, 1 षटकार)
स्मिथ त्रि. गो. भुवनेश्‍वर 5
लियॉन खेळत आहे 4
अवांतर 3
एकूण 21 षटकांत 3 बाद 75
बाद क्रम : 1-2, 2-35, 3-55.
गोलंदाजी
भुवनेश्‍वर कुमार 8-1-25-3
इशांत शर्मा 2-0-11-0
आर. अश्‍विन 7-2-25-0
रवींद्र जडेजा 2-1-11-0
प्रग्यान ओझा 2-1-1-0

Thursday, March 7, 2013

Happy Woman' s Day !!!



जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेछा







जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेछा !!!!
Happy Woman's Day
   
   -Ni3more