Total Pageviews

Monday, September 17, 2012

लॉगॉन..


नेहमीचा अभ्यास बोअर होतोय.?
आपलं ‘जी.के.’ दाखवून कुणाला इम्प्रेस करायचंय.?
डोक्याला द्यायचां खुराक नवा.? - मग या साइट्स पाहा.

हाय ! 
कॉलेज सुरू झालं. पहिलावहिला फ्रेण्डशिप डेही पार पडला. आता हळूहळू अभ्यास आणि प्रोजेक्ट्ससुद्धा वाढतील. या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करणार्‍या अनेक वेबसाइट्स आहेत. ज्या आपल्याला ‘अप टू डेट’ तर ठेवतीलच पण बोअरिंग वाटणारा विषय इंटरेस्टिंग पण होईल.

http://www.admissionnews.com 
एखाद्या कोर्सची माहिती हवी असेल त्यासाठीच्या परीक्षा कधी होणार आहेत, फॉर्म कधी मिळणार या सगळ्यावर लक्ष ठेवणारी ही वेबसाइट. देशभरातल्या युनिव्हर्सिटीज, कॉलेजेसमधले कोर्सेस इथे आहेत. शिवाय वेगवेगळ्या परीक्षांचे रिझल्ट्स, स्कॉलरशिप्स याचीही माहिती इथे मिळेल. 

http://www.refdesk.com/ 
तुम्हाला जर वेगवेगळ्या विषयांवरची माहिती रोज हवी असेल तर ही एक भन्नाट साइट. या वेबसाइटच्या होम पेजवरच त्या दिवसाचा इतिहास, बातम्या, महत्त्वाचे वाढदिवस, आणि लेख वाचायला मिळतील. तर जगभरातल्या वेगवेगळ्या पेपरच्या त्यांचे संपादकीय, लेख हेदेखील वाचायला मिळतील. 

http://www.gutenberg.org/ 
भरपूर वाचणार्‍यांसाठी ही एक मेजवानी. या वेबसाइटवर तब्बल ३९,000 पुस्तकं आहेत. ही तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा किंडलवर डाउनलोड क शकता. वेबसाइटवरच्या कॅटलॉग्समधून तुम्ही तुम्हाला हवं ते पुस्तक शोधू शकता. शिवाय इथे अनेर्क ीवळे लेज्ञी देखील आहेत.

http://www.khanacademy.org 
घरच्या घरी कोणताही विषय शिकवणारी ही वेबसाइट. तुमचा प्रायव्हेट क्लास. कारण इथे वेगवेगळ्या विषयांवरची लेक्चर्स आहेत. विषय सोपा करून दाखवणार्‍या आकृत्या आहेत. रअळ, ¬टअळ, ककळ खएए सारख्या परीक्षांची तयारी करून घेणार्‍या परीक्षादेखील आहेत. शाळा - कॉलेजसारखाच अभ्यास घरबसल्या शिकवणारी ही वेबसाइट.

http://www.iknowthat.com 
के जी पासून ते मोठय़ा वर्गांंंंसाठीच गणित, विज्ञान, इतिहास - भूगोल, भाषा धमाल गेम्स आणि व्हिडीओजच्या माध्यामतून इथे शिकता येतील. 

http://www.factmonster.com 
तुमचं जनरल नॉलेज दाखवून जर समोरच्या माणसाला इम्प्रेस करायचं असेल तर ही वेबसाइट वापरा. साहित्य, गणित, सायन्स, जगभरातल्या घडामोडी याविषयीची भन्नाट माहिती इथे आहे. 

www.math.com 
ऑनलाइन गणित शिकण्यासाठी ही वेबसाइट. बेसिक गणितापासून ते अगदी ट्रिग्नोमेट्रीपर्यंंंंत सगळ्या प्रकारांचं गणित इथे शिकता येईल. गणित फटाफट सोडवण्याच्या सोप्या पद्धतीदेखील इथे आहेत. 

http://www.howstuffworks.com/ 
एखादी गोष्ट का होते, यंत्र कशी चालतात, विज्ञानाची वेगवेगळी तत्त्व सोप्या पद्धतीनं शिकण्यासाठी ही वेबसाइट जरूर पाहा. मेंदूच्या रचनेपासून ते कारच्या रचनेपर्यंंंंत, भौगोलिक आश्‍चर्यापासून ते अगदी घरामागच्या बागेतल्या गोष्टीपर्यंंंंतचा सगळं काही इथे आहे. कुतूहल शमवणारी ही वेबसाइट.

या सगळ्यांशिवाय यु ट्यूब, 
National Geographic, TLC, Discovery Channel यांच्या वेबसाइट्सदेखील भरपूर माहिती देणार्‍या आहेत. सो या पाहा आणि कंटाळा वाटणारा अभ्यासदेखील रंजक करा.



                                                                                                    -Ni3more

No comments: