Date : ०७-०८-२०१२ व्याख्याता : श्यामसुंदर सोनार.
विषय : गुन्हेगारी पत्रकारिता.
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये पत्रकारिता कशी करावी हे सांगितले आहे ?
ज्ञानेश्वरीमध्ये पत्रकारिता करताना ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे कि आपण जी बातमी लोकांना देणार आहोत किवा सांगणार आहोत ती खात्रीलायक आणि सत्य सांगणारी असली पाहिजे तसेच तिच्यात नेमकेपणा असला पाहिजे. पत्रकारीते मध्ये ज्ञानेश्वर त्यांच्या ऐका अभंगातील ओळीचा उल्लेख करताना म्हणतात,
साच आणि मावळ मिथुले आणि रसाळ
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे !!!
आपण पत्रकारिता करताना आपण जी बातमी लोकांना देणार आहोत ती बातमी 'साच' असली पाहिजे. साच म्हणजे सत्य असली पाहिजे. ती मावळ पद्धतीने योग्य रुपात आणि तटस्त पणे लोकांसमोर मवाळ पद्धतीने मांडली पाहिजे . ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे आपण बातमी देताना आपल्या बातमीतली आपली शैली शुद्ध आणि रसाळ असली पाहिजे जेणे करून कोणी त्यावर आक्षेप घेतला नाही पाहिजे आणि जी बातमी मांडणार आहोत ती सत्य सांगणारी असावी.आपल्या वृत्तपत्रामध्ये आपल्या बातमी साठी एक छोटीशी जागा असते. आपण एखादी गुन्हेगारी विषयक माहिती गोळा करण्यासाठी आपण त्या जागेवर जातो नंतर पोलीस स्टेशन मध्ये जातो तिथून माहिती गोळा करतो आणि एवढी पायपीट करून आपण माहिती गोळा करतो आणि आपण संपादन केलीली माहिती घेऊन आपल्या वृत्तपत्राच्या कार्यालयात जातो आणि विचार करतो आता मी ह्या बातमीला न्याय मिळवून देणार आणि तशी एक पूर्ण पान भर बातमी आपण लिहितो पण आपल्या वृत्त पेपर मध्ये छोटीसी जागा असते आणि आपल्याला त्या जागेत पुरेल एवढीच माहिती लिहायची असते म्हणून आपण जी काही बातमी लिहणार आहोत ती अगदी छोट्या आशयामध्ये आणि त्या भागात बसेल एवढी माहिती लिहावी.शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ह्या मध्ये एका शब्दाचे दोन अर्थ कसे होतात ह्याचे हे उत्तम उदाहरण ज्ञानेश्वरांनी समजून देताना एक उदाहरण सांगितले आहे. Exp : एक वृद्ध माणूस रांगेमध्ये उभा असतो आणि त्याचा पुढे असलेल्या माणसाला धक्का लागून तो खाली पडतो तर तो माणूस रागवून त्या वृद्ध माणसा कडे पाहतो तर तो त्याला मारायला जातो तर तो वृद्ध माणूस त्या माणसाला बोलतो मी तुझ्या बापासारखा आहे. तर तो माणूस काहीच बोलत नाही आणि त्याला सोडून देतो. तर त्याने हेच उलटे बोलला असता तर कि मी तुझ्या आईच्या नवर्यासारखा आहे तर तो माणूस त्याला हाणल्या शिवाय राहणार नाही. म्हणून दुसर्या वाक्याने अर्थाचे अनर्थ झाला. म्हणून पत्रकरिता करताना आपली लेखन शैली हि त्या शब्दांचे दोन शब्दांमध्ये कल्लोळ करणारी नसावी ती शुद्ध आणि अर्थाचा अनर्थ करणारी नसावी.
गुन्हेगारी कशी निर्माण झाली?
गुन्हेगारी पत्रकारिता करताना पत्रकाराची लेखन शैली हि अतिशय प्रभावशाली आणि शुद्ध असली पाहिजे.
जेणे करून गुन्हेगारी पत्रकारिता करताना आपल्या लेखांवर कोणत्याही गुन्हेगाराने किवा पक्षाने आक्षेप घेतला नाही पाहिजे. आपण मुंबई मध्ये गुन्हेगारी क्षेत्रात काम करत असताना गुन्हेगारी मध्ये जे काही घडते त्या गुन्हेगारीचे मागचे पुढचे संदर्भ माहित असणे गरजेचे असते. एक चाळीस वर्ष पासून मागे गेलो तर एक सत्तर च्या दशकात संघटीत गुन्हेगारी ना वारूपाला आली. संघटीत गुन्हेगारी मध्ये खूप पैसा असल्या कारणाने ती पुढे खूप फोफावत गेली. सुरवातीला संघटीत गुन्हेगारी मध्ये दादा होते नंतर हळू हळू त्यानावाचे रुपांतर भाई असे नाव नावारूपाला आली होती मग पुढे - पुढे ड्याडी असे नाव नावारूपाला आली.पहिला ह्या दादा ला ऐक एरिया वाटून दिलेला असायचा त्यांनी त्या एरिया मध्ये लोकांचे सामजिक कामे करायची आणि त्यांची सामजिक मदत करत असे हे दादा लोक त्यावेळेला ह्या दादान मध्ये आपापसात मारामारी होऊ लागली आणि खटके उडू लागले. त्यावेळी संघटीत गुन्हेगारीचे उप्पनाचे मोठे साधन म्हणजे मटका, दारू आणि झुगार हे पैशे कमावण्याचे मोठे साधन होते. त्यामुळे खूप सर्र्याप्रकारची गुन्हेगारी महाराष्ट्रात घडू लागली. त्यावेळी महाराष्ट्रात सरकारने दारूवर बंदी आणली होती आणि त्यावेळी गावठी दारू मोठ्या प्रमाणात बनवली जात असे आणि विकली जात असे ती बनवायला महिलांचा वापर केला जात असे आणि त्या महिला गावठी दारूच्या ब्यागा पोटामध्ये लपवून प्रेग्नंट अवस्थे मध्ये त्या जायच्या म्हणून त्या वेळी महाराष्ट्रात पहिल्यांदा महिला पोलिसांची गरज भासु लागली आणि महिला पोलिस कॉनस्टेबलची भरती केली गेली. आणि त्यानंतर महिला पोलीस (PSI) ची भरती केली गेली. त्यावेळी स्मिता जयकर या पहिल्या PSI अधिकारीची भरती करण्यात आली. सरकारने त्यावेळी ज्या गोष्टीन वर बंदी आणत असेल ते बेकायदेशीर प्रकार होत असे आणि त्यावेळी महिला पोलीस भरती होण्याचे श्रेय ज्याला दिले जाते ती आहे दारू. त्यावेळी ह्या सर्वावर महाराष्ट्रात बंदी आल्यामुळे त्यानंतर हि संघटीत गुन्हेगारी सोन्याची तस्करी करायला लागली. आणि सोन्यावर (excise duty ) भरायला लागत असल्याने त्यावेळेला सर्रास सोन्याची तस्करी होत असे आणि ह्या सर्वानमधून हाजी मस्तान, युसुफ पठाण सारखे गुन्हेगार निर्माण झाले.त्यानंतर तस्करीचे काम करत करत दाऊत इब्राहीम तयार झाला आणि त्या नंतर गोल्डन ग्यांग तयार झाली. आणि त्यानंतर ह्या सर्वांनी आपले जागा वाटून घेतल्या आणि आपापले स्वतंत्र काम करायला सुरुवात केली.एखादा जर दुसर्याच्या हद्दीत गेला तर त्यामध्ये खटके उडत आणि त्यामुळे नंतर पुढे ग्यांगवोर सुरु झाले. पोलीसाचाच मुलगा असणारा दाऊत इब्राहीम हा हाजी मस्तान, लाला कासर ह्यांच्या बरोबर काम करत करत नंतर मोठा डॉन झाला. त्यानंतर १९८५ ते १९९० ह्या दरम्यान डान्स बार सुरु झाले. मग नंतर हे डान्स बार उप्पनाचे साधन झाले त्यानंतर ही मंडळी सिनेमा कडे वळली आणि नंतर खंडणी हा प्रकार मोठ्या प्रमाणे सुरु झाले.
गुन्हेगारी पत्रकारिता कशी करावी?
गुन्हेगारी पत्रकारिता करीत असताना आपल्याला जिथे गुन्हा घडला असेल तिथे जाऊन त्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो नेमके काय झाले आहे. तो गुन्हा कुठे घडला ते ठिकाण पाहावे लागते. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वरिष्ट अधिकार्यांना भेटून त्या घटने बद्दल पूर्ण इत्तम्भूत माहिती गोळा करून नंतर त्या घटनेशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेऊन ती माहिती गोळा करून नंतर त्या माहितीची योग्य तर्र्हेने माहिती (Edit ) करून ती लोकांसमोर मांडावी. आणि गुन्हेगारी पत्रकारिता करताना एक गोष्टा पत्रकाराने लक्षात ठेवली पाहिजे, आपण जी बातमी कव्हर करत आहोत त्याची इत्तम्भूत माहिती आपल्या समोर येत नाही आणि ती बातमी अजून काही ठिकाणा हून (confirmed) करीत नाही तोपर्यंत ती बातमी आपण लोकांना देऊ नये.
बातमी म्हणून बातमी देऊ नये.(कर्तव्य)
आपण जी बातमी देत आहोत त्या बातमी ची आपल्याला सामाजिक जान असली पाहिजे ती बातमी म्हणून बातमी देऊ नये तर त्या कडे आपला पाहण्याचा दृष्टीकोन कोण हा सामजिक नजरेचा असावा आणि आपण त्या बातमीला न्याय मिळवून देऊ शकतो ह्या दृष्टीने त्या बातमी कडे पहिले पाहिजे तरच आपण चांगले पत्रकार होऊ शकतो.
Ni3more
No comments:
Post a Comment