ऑस्ट्रेलियाला नमवून युवा
यंगब्रिगेडने अंडर १९ चा वर्ल्डकप जिंकला .
ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या अंडर १९
वर्ल्डकप मध्ये भारतीय टीमने अतिंम लढतीत ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वचषकावर आपले नाव
कोरले. तब्बल १७ महिन्यापूर्वी धोनीच्या टीम इंडियाने विश्वचषकावर आपले नाव कोरले
त्याची पुनरावृत्तीकारीत अंडर १९ वर्ल्डकपमध्ये गतविजेत्या
ऑस्ट्रेलियाला नमवित भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले. ४ बाद ९७ अशा कठीण
परिस्थितीत सापडलेल्या भारतीय संघाला कर्णधार उन्मुक्त चंद ( नाबाद १११ ) आणि स्मित
पटेल ( नाबाद ६२ ) यांच्या शतकी भागीदारीने एकाक्षणी असाध्य वाटणारे ध्येय गाठून
दिले . भारताच्या तरुण संघाचे हे तिसरे विश्वविजेतेपद ठरले. याआधी भारताने २०००
मध्ये मोहम्मद कैफच्या आणि २००८मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आपण अंडर १९
वर्ल्डकप जिंकला आहे.
-Ni3more
No comments:
Post a Comment