Total Pageviews

Wednesday, February 27, 2013

...!!!आमुची मायबोली !!!...


...!!!आमुची मायबोली !!!...
मराठी असे आमुची मायबोली जरी
आज ही राजभाषा नसे,
नसो आज ऐश्वर्य या माउलीला,
यशाची पुढे दिव्य आशा असे,
जरी पंचखण्डांतही मान्यता घे
र-वसत्ताबळे श्रीमती इड.ग्रजी,
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा
तिच्या, तीस केवी त्यजी?

 जरी मान्यता आज हिन्दीस देई उदेलें
नवे राष्ट्र हें हिन्दवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची
जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं उत्तरीं वा असूदक्षिणिं
दूर तन्जावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी.

मराठीअसे आमुची मायबोली जरी
भिन्नधर्मानुयायी असुं,
पुरी बाणली बन्धुता अन्तरड्.गी, हिच्या
एक ताटांत आम्ही बसूं; 
हिचे पुत्र आम्हा हिचे पाड्.ग फेडूं , वसे 
आमुच्या मात्र हन्मन्दिरी,
जग न्मान्यता हिस  अप्रू प्रतापे हिला 
बैसवू वैभवाच्या शिरी.

हिच्या लक्तरांची असे आज आम्हा,
नका फक्त पाहू हिच्या लक्तरं 
प्रभावी हिंचे रूप चापल्य देख पदवी 
फिकी ज्यापुढे अप्सरा;
न घालू जरी वाड्मया तील उंची हिरे 
मोतियांचे हिला दागिने,
मराठी असे आमुची मायबोली, वृथा हि 
बढाई सुकार्याविणे.
मराठी असे आमुची मायबोली, अहो,
पारतंत्र्यात हि खड्.गली,

हिची थोर संपती गेली उपे क्षेमुळे खोल 
 कालार्णवाच्या तळीं,
तरी सिन्धु  मन्थुनि  काढुनि रंत्ने नियोजूं
तयांना हिच्या  मण्डनीं-
नको रीण ! देवोत देतील तेव्हा जगांतील 
भाषा हिला खण्डणी.
                   
                          -माधव जुलियन 




Tuesday, February 26, 2013

....!!! मराठी राजभाषा दिन !!!...


                     
                     ....!!! मराठी राजभाषा दिन !!!...


आपल्याला अगदी परिचयाचे आणि जवळचे मराठी लोकप्रिय कवी, लेखक, समीक्षक व नाटककार विष्णु वामन शिरवाडकर म्हणजे  कुसुमाग्रज यांचा उद्या जन्म दिवस. ते मराठीतील एक आत्मनिष्ट व समाज निष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक मानले जातात. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने आपले लेखन केले.ते सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक होते. त्यांनी दिलेले योगदान पाहून त्यांचा जन्म दिवस हा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.
आपण मराठी माणसांनी कधी विचार केला आहे का आपली मराठी भाषा का लुप्त होत चालली आहे जर हा भाषादिना दिवशी मी घेतलेला आढावा. अठराव्या शतकात इंग्रज आले.इंग्रज आपल्या देशात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले. आपला देश हिंदू भाषिक असल्याने त्या काळात आपल्या इथे मराठी भाषा आणि हिंदी  भाषा सर्रास बोलली जात होती.  इंग्रज त्या काळी आपल्या इथे व्यापार करण्याच्या उद्देशाने आले होते आणि त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा घेऊन इथे आपल्या व्यापाराची सुरुवात केली. तेव्हा इंग्रजांनी ईर-ट इंडिया कंपनीची र-थापना केली. आपल्या ईथे मराठी आणि हिंदी बोलली जात असे. येथील लोकांना इंग्रजी भाषा यावी आणि त्यांना इथे व्यापार करणे सुलभ व्हावे म्हणून त्यांनी इथे इंग्रजी शाळा काढल्या आणि येथील लोकांनी इंग्रजी शिकावी आणि त्यांनी त्यांच्या स्वार्थ साठी इंग्रजी भाषेचा प्रसार करायला सुरुवात केली.  तेथ पासून इंग्रजी भाषा इथे रूढ झाली.  ती आजतागायत. त्याकाळात आपल्या इथे मोठ मोठे संत होऊन गेले. उदाहरणार्थ: संत तुकाराम, ज्ञानेश्र्वर, सावतामाळी, बहिणाबाई आदि. ह्यांनी त्याकाळात आपल्या मातृभाषा (मराठी भाषेचा ) प्रसार केला.ज्ञानेश्वरांनी आपल्या ओव्यांतून आणि तुकारामांनी आपल्या अभंगातून मराठीचे महात्म्य सांगितले आहे. पण इंग्रज आले आणि त्यांनी मराठी भाषेला डावलून इंग्रजी भाषेचा प्रसार करायला सुरुवात केली. पण आपण पाहायला गेलो तर आताच्या एकविसाव्या शतकात आपली मराठी भाषा एवढी लुप्त होत चाली आहे कि विचारायला नको . अलीकडे मराठी शाळेच्या अनुदानावरून आणि मराठी महापालिका शाळा बंद करण्याच्या बंडच काही राजकीय पक्षाने माडला होता.त्यातच आपली मराठी माध्यमाची शाळा आणि भाषा ह्या राजकीय उद्देशा पायी भरडून निघाली. सी बी एस ई , आय सी एस ई आणि इंग्रजी माध्यमिक शाळामुळे आपली मराठी माध्यमिक शाळा आणि मराठी भाषा भरडून निघाली.  आपण ह्या सर्व कडे लक्ष देवून आपली मराठी भाषा लुप्त होणार नाही आणि आपली मराठी मायबोलीचा प्रसार करण्यासाठी आपण सर्व मराठी माणसांनी योग्य ते पाऊल उचलले  पाहिजे. पण अलीकडच्या काळात पाहायला गेलो तर मराठीसाठी अभिमान वाटावी असे चित्रपट थेट ऑस्कारपर्यंत श्वास सारखे चित्रपट जाऊन आले. तसेच हल्लीच आपल्या मराठी भाषेला आणि मराठी माणसाला गर्व वाटावा असे  स्टार प्रवाह वरचे दोन कार्यक्रम १. होम मिनिस्टर २.डान्स महाराष्ट्र डान्स  ह्या दोन सिरियल ब्रिटन मध्ये हप्त्यातून दोन दिवस त्यांच्या टिव्ही चेनल वर दाखवण्यात येणार आहेत. हि तर खरच आपल्या मराठी माणसा साठी गर्वाची बाब आहे हे आपण विचार करून आपल्या मराठी भाषेचा प्रसार करावा. आजच्या काळात इंग्रजी आपण शिकू नाय असे मी बोलत नाही पण आपण आपल्या मराठी भाषेला हि विसरून चालणार नाही. आपल्या मराठी इतिहासात मोठ मोठ्या कवींनी महत्वाचे योगदान दिले आहे हे आपण विसरून चालणार नाही. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्म दिनी आज मराठी भाषा दिन साजरा करूया.


                                                "पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
                                                आपुल्या घरात हाल सोसते मराठी
                                                 हे असे कितीक खेळ पाहते मराठी
                                                 शेवढी मदांध तख्त फोडते मराठी"                              
                                  ....!!! मराठी भाषा दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!....




-Ni3more

भारतीयटीमने ऑस्ट्रेलियाला नमवून चार मालिकेच्या कसोटीत १ - ० ने आघाडी.






Sachin Tendulkar smashes his first ball for a six, India v Australia, 1st Test, Chennai, 5th day

Sachin Tendulkar and Cheteshwar Pujara took India home, India v Australia, 1st Test, Chennai, 5th day, February 26, 2013

 "आम्ही कुणाला भीत नाही कच्चा दुध पीत नाही" असे म्हणणार्या आर-ट्रेलियाला आज भारतीय संघाने आठ विकेट ने पहिल्या कसोटीत पराभवाची धूळ चारली. गेले तीन दिवस वर-चढ राहिलेल्या सामन्यात अखेर भारताने बाजी मारली. आणि दाखवून दिले कि 'हम भी हे जोश मे बाते कर होश मे यु न आंखे दिखा" हे ऑस्ट्रेलियाला दाखवून दिले. गेले दहा कसोटी मध्ये पराभवाची चव पाहणारा भारतीय संघ आणि तीन कसोटी मालिकांची  पराभवाची चव पाहणार्या भारतीय संघाने अखेर ह्या वर्षाची सुरुवात दणक्यात विजयाने केली. चार कसोटीमध्ये  १ - ० अशी आघाडी घेतली.
कालच टीम इंडियाचा विजय दृष्टी क्षेपात आला होता आज औपचारिकता म्हणून खेळ बाकी होता. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या तडाकेबाज द्विशतकिय खेळीने आणि आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा आर अश्विन याने ऑस्ट्रलिया च्या फलंदाजी मध्ये खिंडार पाडत  भारतीय संघाच्या विजयात महत्व पूर्ण खारीचा वाटा  उचलला.
गौतम गंभीरला डावलून विजय मुरलीला पसंती दिली गेली. पण विजय मुरलीने ने निराशाच केली. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग चे हि तसेच नेहमी सारखे येरे माझ्या मांगल्या. ह्या पुढील मॅचला सलामीवीर म्हणून  कोणाची निवड होईल हे पाहणे. रंजक ठरेल. पण मधल्या फळीत अनुभवाची थोडी कमी असली तरी विक्रमवीर सचिन तेंडूलकर चे अर्धशतक, चेतेश्वर पुजारची ४२ रन्सची खेळी आणि मधल्या फळीत येऊन भारतीय संघाचा भरोशाचा फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार महेंद्र सिंघ धोनी यांच्या शतकी खेळीने भारताचे पारडे जड केले.भारताच्या मधल्या फळीतली कामगिरी दिलासा दायक असली तरी आपल्या सलामीवीरांनी आपली कामगिरी उंचावून धावा करणे गरजचे आहे त्या कडे त्यांनी आवर्जून लक्ष देणे आणि त्याची कारण मीमांसा शोधणे हि गरजेचे आहे. तरीही भारतीय संघाने ह्या विजयाने हुरळून न जाता आता झालेल्या चुकांचे योग्य ते निवारण केले पाहिजे. फिरकीपटू आर अश्विनची फिरकी दिलासा दायक देणारी असून, ४०० विकेट घेणारा हरभजन सिंघ मात्र  विकेटसाठी अक्षरश झगडताना दिसला.  आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेल्या जडेजाने ३ विकेट घेवून त्याला सुयोग्य साथ दिली. ऑस्ट्रेलिया फिरकीला बरोबर खेळत नाही हे परत निर्देशनात आले. अक्षरश ऑस्ट्रेलियन टीम  स्पिनर्सला खेळताना अडखळताना  दिसली. एकी कडे ऑस्ट्रेलियाचा अखा संघ पवेलियन मध्ये परतला असताना अष्टपैलू म्हणून निवड केलेल्या ऑस्ट्रेलियाचा नवा शिलेदार मॉइसेस हेन्रिक्सची चिवट खेळी आणि नॅथन लिऑननं दिलेली सुयोग्य साथीच्या  जोरावर त्यांनी चौथ्या दिवशी  एक इंनिंग आणि  पराभवाची नामुष्की टाळली.  ६६ धावांची भागीदारी करून त्याला सुयोग्य साथ दिली. त्यांची भागेदारी रवींद्र जडेजा यांनी तोडली. आणि त्या जोरावर त्यांनी ५० रन्स ची लीड भारतीय संघाला दिली.  भारतीय संघाचे सलामीवीर हे लक्ष गाठतील असे वाटत असताना दोन विकेट पडल्या. आणि सचिन ने आल्या आल्या दोन उत्तुंग षटकार मारले आणि बाराव्या ओवर मध्ये चेतेश्वर पुजाराने कांगारूंचा खेळ खल्लास केला आणि विजयावर शिक्का मोर्तब केला. ह्या विजयाने भारतीय संघाने हुरळून न जाता पुढच्या मिशनची तयारी करून आपल्याला सलामीवीरांची भेडसावणारी कमी भरून काढत आणि फास्टर बोलरची असफलता लक्षात घेऊन त्यांचे कारण शोधून आपल्या पुढच्या मॅचची तयारी केली पाहिजे.
ह्या सामन्या मध्ये ऑस्ट्रेलिया च्या बॅंटिग मध्ये अनुभवाची कमतरता जाणवली आणि त्यांना फिरकी गोलंदाजी नीट खेळणे जमत नव्हते हे प्रकर्षाने जाणवत होते. अलीकडे ऑस्ट्रेलिया संघा मधून अनुभवी फलंदाजांनी (रिकी पोंटिंग, माईक हस्सी)   निवृत्ती घेतल्या मुळे ह्यांची पोकळी भरून निघणे खूप कठीण आहे तरीही ऑस्ट्रेलिया मध्ये परत उठून लढण्याची ताकद आहे. तसेच दुखापती नंतर आलेल्या पॅंटिनसन चा आलेला फॉर्म ऑस्ट्रेलिया साठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल . ऑस्ट्रेलिया कडे फिरकीची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. भारतीय संघाने ह्या विजयाला हुरळून न जाता सलामीवीरांना आलेले अपयश सलामीवीरांनी पुसत काढत आपला फॉर्म शोधण्य साठी त्यांना प्रयत्नाची पराकाष्ट करावी लागेल. फिरकी पटूची चांगली कामगिरी झाली असली तरी वेगवान गोलंदाजांनी आपला फॉर्म  शोधणे हे एक आव्हान धोनी आणि त्याच्या यंग टीम इंडिया समोर आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोन्ही टीम बांधणीच्या तयारीतून जात आहे आणि ह्या मध्ये कोण वर चढ ठरते हे पाहणे रंजक ठरेल.

-Ni3more


Monday, February 18, 2013

विंटेज अँड क्लासिक कार कलेक्शन

बिनाटपाची, मोठ्या चाकांची, तर कधी अगदीच विचित्र आकाराची...फक्त चित्रपटांत दिसणा-या या गाड्या रविवारी (9 फेब्रुवारी २०१३) विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या रॅलीच्या निमित्तानं मुंबईतल्या काळाघोडा येथे अवतरल्या होत्या. अगदी स्वतंत्रत्तोर काळापासून जतन केलेल्या गाडयाचे ते आता पर्यंतच्या गाडयाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. माझे ऑफिस येथेच असल्याने फोटो काढण्याचा छंद मला आवरता आला नाही.

      
    

                                                    वेगवेगळ्या अँगलने काढलेले फोटो.


                                                                                             -  Continue of the next Part 2


 - Ni3more


विंटेज अँड क्लासिक कार कलेक्शन (Part - II )


विंटेज अँड क्लासिक कार कलेक्शन



                                                      
                                                       वेगवेगळ्या अँगलने काढलेले फोटो.

                                                                                                   

- Ni3more

Friday, February 15, 2013

Kala Ghoda Art Festival 2013. (Part ll )

                                                      Kala Ghoda Art Festival 2013. (Part ll )