व्हॅलेंटाइन डे
व्हॅलेंटाइन डे म्हणजे मनातील भावना ऐकांमेकांन कडे प्रेम व्यव-त करण्यासाठी अलिखित मुहूर्तच असतो. यादिवसाची प्रत्येक जण आतूरतेने वाट पाहतो. अगदी ज्याची गर्लफ्रेंड असो वा नसो. व्हॅलेंटाइन डे पश्चिमात्यनकडून आयात केलेला दिवस आहे. पण या दिवसाचे महत्त्व दिवसेंदिवस बदलत चालले आहे. आजची तरुण पिढी याचे अनुकरण करत आहे. कॉलेज च्या तरुण तरुणीन मध्ये तर याची खूपच क्रेझ पाहायला मिळते. याचा मुहुर्त पाहून प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज मारतो. भले होकार मिलो अथवा न मिळो, जर होकार मिळाला तर चांगलेच नाही मिळाला तर देवदास बनून फिरयला मोकळे. याच डे चा औचित्य साधून प्रत्येक तरुण तरुणी आज एकमेकाला प्रपोज करतो आणि आजचा दिवस कसा घालवायचा त्याचे प्लानिग करतो. याच दिवशी कित्येक जण याच दिवसाचा मुहूर्त साधून भटा कडून मुहूर्त काढून लग्न करण्याचा फयाड सर्वत्र रुजू झाला आहे. काही वर्ष पूर्वी या डे ला शिवसेने व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास मज्जाव केला होता, त्यादिवशी जो प्रेमयुगुल दिसेल त्याचे लग्न तिथल्या तिथे करून देण्याचा चंगच बांधला होता. अश्याने प्रकारे शिवसेने कडे येणारे तरुणाची मते कमी झाली आणि कालांतराने त्यांचा व्हॅलेंटाइन डे ला असणारा विरोध हि माळवला. पण एवढा विरोध करून हि तरुण तरुणान मध्ये हा डे साजरा करण्याचा क्रेझ अधिकच वाढीस लागला. याच दिवसाचे निमित्त साधून आजचे तरुण तरुणी "मी तुझ्यावर प्रेम करतो" आय लव यु, विल यु मेरी मी' असे म्हणतात. पण या सर्वांचा आजच्या पिढीमध्ये विसर पडत चालला आहे. हल्लीच्या पिढीला व्हॅलेंटाइन डे कशाला साजरा करतात त्याचाच विसर पडणे हि लज्जास्पद बाब आहे.
. 'व्हॅलेंटाइन डे' हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत भारतीयांमध्ये अंगवळणी लागली आहे. तसेच पाहायला गेल्यास ज्या संत व्हॅलेंटाइनच्या नावावर हा दिवस आहे. त्याच्या एकूण अस्तित्वाबद्दल, व्याक्तीमात्वाबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात. गुढतेचे वलय असणार्या अशा एक नव्हे तर तीन व्हॅलेंटाइन नावाच्या संताना कॅथलिक चर्चची मान्यता आहे. त्यापैकी रोमन सम्राट व-लाडियसने सैन्यातील शिपायांनी लग्न करू नये, असा फतवा काढला होता. अर्थात त्यामागे काही कारणे होती. सम्राटाच्या मते, ज्यांचे लग्न झालेले असते ते जीवावर उदार होऊन लढत नाहीत. परंतु संत व्हॅलेंटाइनने राजाच्या या धोरणा विरोधात जाऊन या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून देण्याचा धडाका लावला होता. राजाला व्हॅलेंटाइनच्या त्या कृतीचा राग आला. त्यामुळे चिडून जाऊन त्याने व्हॅलेंटाइन ला देहदंड दिला. ज्या दिवशी व्हॅलेंटाइन ला मरण आले, तो दिवस 'व्हॅलेंटाइन डे' अर्थात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपिया देशात रूढ झाली.पण, आजच्या युगात पाश्चिमात्यांचे अनुकरण करून प्रेम करण्याचे प्रमाण आजच्या तरुण तरुणीन मध्ये वाढीस लागलेले आहे. व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला गाठून प्रपोज करणे, कॉफी केफे डे, बरिस्त मध्ये एकमेकासमोर बसून अगदी डोळ्यात डोळे घालून आपल्या आजूबाजूच्या विश्वाचा विसर पडून आय लव यु, विल यु माय व्हॅलेंटाइन , विल यु मेरी मी असे बोलून आपल्या प्रेमाचा हिजहार करणे.
पण तात्पर्य एकच तारुण्याच्या ह्या धुंदीत आजच्या युवा पिढीने भुरळून न जाता नव्या नात्याला सुरुवात करताना एकमेकांना समजून घेणे काळजी घेणे. ह्या दिवशी संबंध जोडताना तुमच्या आजूबाजूला तुमचे आई वडील, सगे सोयरे - नातेवाईक कोणी नसते. लग्नाच्या ते बंधन नसतात त्या काळ्या मनी मंगळसूत्राचा गळया भोवती फास नसतो म्हणून योग्य तो विचार करून आपण " विल यु माय व्हॅलेंटाइन " बोलले पाहिजे.
Ni3 more
No comments:
Post a Comment