कालच टीम इंडियाचा विजय दृष्टी क्षेपात आला होता आज औपचारिकता
म्हणून खेळ बाकी होता. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या तडाकेबाज द्विशतकिय खेळीने
आणि आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा आर अश्विन याने ऑस्ट्रलिया च्या
फलंदाजी मध्ये खिंडार पाडत भारतीय
संघाच्या विजयात महत्व पूर्ण खारीचा वाटा
उचलला.
गौतम गंभीरला डावलून विजय मुरलीला पसंती दिली गेली. पण विजय
मुरलीने ने निराशाच केली. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग चे हि तसेच नेहमी सारखे येरे
माझ्या मांगल्या. ह्या पुढील मॅचला सलामीवीर म्हणून कोणाची निवड होईल हे पाहणे. रंजक ठरेल. पण मधल्या फळीत अनुभवाची
थोडी कमी असली तरी विक्रमवीर सचिन तेंडूलकर चे अर्धशतक, चेतेश्वर पुजारची ४२
रन्सची खेळी आणि मधल्या फळीत येऊन भारतीय संघाचा भरोशाचा फलंदाज विराट कोहली आणि
कर्णधार महेंद्र सिंघ धोनी यांच्या शतकी खेळीने भारताचे पारडे जड केले.भारताच्या
मधल्या फळीतली कामगिरी दिलासा दायक असली तरी आपल्या सलामीवीरांनी आपली कामगिरी
उंचावून धावा करणे गरजचे आहे त्या कडे त्यांनी आवर्जून लक्ष देणे आणि त्याची कारण
मीमांसा शोधणे हि गरजेचे आहे. तरीही भारतीय संघाने ह्या विजयाने हुरळून न जाता आता
झालेल्या चुकांचे योग्य ते निवारण केले पाहिजे. फिरकीपटू आर अश्विनची फिरकी दिलासा
दायक देणारी असून, ४०० विकेट घेणारा हरभजन सिंघ मात्र विकेटसाठी अक्षरश झगडताना दिसला.
आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेल्या जडेजाने ३ विकेट घेवून
त्याला सुयोग्य साथ दिली. ऑस्ट्रेलिया फिरकीला बरोबर खेळत नाही हे परत निर्देशनात
आले. अक्षरश ऑस्ट्रेलियन टीम स्पिनर्सला
खेळताना अडखळताना दिसली. एकी कडे
ऑस्ट्रेलियाचा अखा संघ पवेलियन मध्ये परतला असताना अष्टपैलू म्हणून निवड केलेल्या
ऑस्ट्रेलियाचा नवा शिलेदार मॉइसेस हेन्रिक्सची चिवट खेळी आणि नॅथन लिऑननं दिलेली
सुयोग्य साथीच्या जोरावर त्यांनी चौथ्या
दिवशी एक इंनिंग आणि पराभवाची नामुष्की टाळली. ६६ धावांची भागीदारी करून त्याला सुयोग्य साथ
दिली. त्यांची भागेदारी रवींद्र जडेजा यांनी तोडली. आणि त्या जोरावर त्यांनी ५०
रन्स ची लीड भारतीय संघाला दिली. भारतीय
संघाचे सलामीवीर हे लक्ष गाठतील असे वाटत असताना दोन विकेट पडल्या. आणि सचिन ने
आल्या आल्या दोन उत्तुंग षटकार मारले आणि बाराव्या ओवर मध्ये चेतेश्वर पुजाराने
कांगारूंचा खेळ खल्लास केला आणि विजयावर शिक्का मोर्तब केला. ह्या विजयाने भारतीय
संघाने हुरळून न जाता पुढच्या मिशनची तयारी करून आपल्याला सलामीवीरांची भेडसावणारी
कमी भरून काढत आणि फास्टर बोलरची असफलता लक्षात घेऊन त्यांचे कारण शोधून आपल्या
पुढच्या मॅचची तयारी केली पाहिजे.
ह्या सामन्या मध्ये ऑस्ट्रेलिया च्या बॅंटिग मध्ये अनुभवाची
कमतरता जाणवली आणि त्यांना फिरकी गोलंदाजी नीट खेळणे जमत नव्हते हे प्रकर्षाने
जाणवत होते. अलीकडे ऑस्ट्रेलिया संघा मधून अनुभवी फलंदाजांनी (रिकी पोंटिंग, माईक
हस्सी) निवृत्ती घेतल्या मुळे ह्यांची
पोकळी भरून निघणे खूप कठीण आहे तरीही ऑस्ट्रेलिया मध्ये परत उठून लढण्याची ताकद
आहे. तसेच दुखापती नंतर आलेल्या पॅंटिनसन चा आलेला फॉर्म ऑस्ट्रेलिया साठी
दिलासादायक बाब म्हणावी लागेल . ऑस्ट्रेलिया कडे फिरकीची कमतरता प्रकर्षाने जाणवत
होती. भारतीय संघाने ह्या विजयाला हुरळून न जाता सलामीवीरांना आलेले अपयश
सलामीवीरांनी पुसत काढत आपला फॉर्म शोधण्य साठी त्यांना प्रयत्नाची पराकाष्ट करावी
लागेल. फिरकी पटूची चांगली कामगिरी झाली असली तरी वेगवान गोलंदाजांनी आपला
फॉर्म शोधणे हे एक आव्हान धोनी आणि
त्याच्या यंग टीम इंडिया समोर आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोन्ही टीम
बांधणीच्या तयारीतून जात आहे आणि ह्या मध्ये कोण वर चढ ठरते हे पाहणे रंजक ठरेल.
No comments:
Post a Comment