Total Pageviews

Monday, October 8, 2012

दुष्काळ संपला







तब्बल ३३ वर्षांनी वेस्ट इंडीजने इतिहास घडवला.तब्बल ३३ वर्षा आधी विवियन रिचर्डस, ग्रीनीज,होल्डिंग्स यांच्या कारकिर्दीत वेस्ट इंडीजने वर्ल्ड कप  जिंकला होता.त्यानंतर वेस्ट इंडीजला कोणाची न कोणाची नजर लागली क्रिकेट  वेस्ट इंडीज क्रिकेट तळागाळाला गेला.जशी एकाद्या उंदरावर मांजर झडप घालून कशी शिकार करते अगदी तशीच  क्रिकेट मध्ये सर्व संघ वेस्ट इंडीजवर हवी झाले होते काही वर्ष.त्यानंतर वेस्ट इंडीजने क्रिकेटने कधी डोके वर  काढून कधी पहिलेच नाही.तब्बल ३३ वर्षाने डेरेन सॅमी च्या नेतृत्वाखाली पहिला वाहिला टी २० विश्व चषकावर आपले नाव कोरले आणि एक हाती वेस्ट इंडीज क्रिकेट मधला दुष्काळ संपला. तब्बल १ वर्ष बाहेर असणाऱ्या गेल ला वेस्ट इंडीज क्रिकेट संघात सामील करून घेण्याची बुद्धी वेस्ट इंडीज बोर्डाला आली आणि त्यांनी त्याला आपल्या वेस्ट इंडीज संघ मध्ये खेळवले आणि गेल समोर असला तर भल्या भल्या बोलर ला हृदयात धडकी भरते.अगदी झाले तसेच सेंमीफायनल मध्ये पहिली फलंदाजी करून २०५ रन्स केले आणि ऑस्ट्रेलिया संघाला त्यांनी बाहेर चा रस्ता दाखवून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.वेस्ट इंडीज ने नाणेफेक जिंकल्यावर वेस्ट इंडीज परत ऑस्ट्रेलिया सारखा चमत्कार करून दाखवेल.वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल वि. श्रीलंकेचा संघ अशी ही लढत होती असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरू नये.पण गेल आणि चार्ल्स लवकर आऊट झाल्यानी विंडीज ची हवा गुल केली श्रीलंकन गोलंदाजांनी.याच मैदानात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने विक्रमी २०५ धावा केल्या होत्या. काल ते ६ विकेटस् गमावून १३७ धावा करू शकले. एका ‘स्टेज’ला इतक्या कमी धावा झाल्या होत्या की याच गतीने ते खेळत राहिले तर २० षटकांच्या अखेरीस त्यांची धावसंख्या ४६ असेल असे टीव्हीवरचा कॉमेण्टेटर विनोदाने म्हणाला.
इतर फलंदाज भानामती झाल्यागत विकेटवर वावरत असताना तिकडे दुसर्‍या बाजूने सॅम्युएल्स मारत सुटला होता. संघाच्या पहिल्या ५० धावा निघायला ७५ चेंडू लागले, तर सॅम्युएल्सच्या दणक्यामुळे पुढील धावांचे अर्धशतक २६ चेंडूंत निघाले. एवढी वाताहत होऊनही विंडीज अखेर १५० धावा करणार असं वाटत असताना सॅम्युएल्स बाद झाला. त्यानंतर १३७ धावांवर विंडीजला रोखण्यात श्रीलंकेला यश आले. सॅम्युएल्सने ५६ चेंडूंत ७८ धावा केल्या. त्याच्या या खेळीचं महत्त्व वेगळं सांगायला नकोे. मलिंगाच्या ३ षटकांत ४४ धावा निघाल्या. तुलनेत इतरांची आकडेवारी बघा. मेंडिस - १४ धावांत ४ बळी, धनंजय - १६ धावांत १ बळी, मॅथ्यूज - ११ धावांत १ बळी.

वेस्ट इंडीजचा डाव कुंथत चालू असताना व तो संपल्यावरही ते वर्ल्ड कप जिंकतील असं चुकूनही वाटत नव्हतं. आपण त्यांच्या ‘गँगनाम’ नाचाला मुकणार असं वाटत होतं. ब्राव्होच्या वाढदिवशी विंडीजचा पराभव होणार अशीच लक्षणं दिसत होती. 
पण काय घडलं? वेस्ट इंडीज चक्क जिंकले. दबावाखाली श्रीलंका कोलमडली. पावसाची शक्यता दिसू लागल्यावर ‘डकवर्थ-लुईस’ सिस्टीमचे नियम लागू होतील व त्यात आपण हरू या भीतीने श्रीलंकेच्या खेळाडूंना ग्रासलेले दिसले. संपूर्ण स्पर्धेत सातत्याने ‘रिव्हर्स स्वीप’ मारणारा जयवर्धने नेमका त्याच फटक्यावर बाद झाला. दिलशानची उजवी यष्टी उखडून टाकून रामपॉलने विंडीजला उत्तम सुरुवात करून दिली. जयवर्धने व संगक्कारा विकेटवर होते तोवर श्रीलंकेचा विजय निश्‍चित वाटत होता. पुढे वाट लागली. तरीही वेस्ट इंडीजची धावसंख्या कमी असल्याने श्रीलंकेच्या ८४ धावांत ७ विकेट गेल्यावरही विजय कोणाचाही होऊ शकेल असेच वाटत होते. रामपॉलच्या एका षटकात कुलशेखराने २२ धावा बदडल्या. श्रीलंका सहजासहजी हार मानायला तयार नव्हती. पण ते सोपं नव्हतं व अखेर त्यांचा ३६ धावांनी पराभव झाला. श्रीलंकेसाठी अजंठा मेंडिसने केली तशीच मारक फिरकी गोलंदाजी विंडीजसाठी नारायणने केली. खरोखरच विंडीज संघ एकजुटीने व पेटून उठल्यासारखा खेळला. विजयानंतर सगळ्या संघाने केलेला ‘गँगनाम’ नाच पाहताना मनाला आनंद होत होता. ख्रिस गेल बॅटीचा चमत्कार दाखवू शकला नाही तरी सामना संपल्यावर त्याने आपल्याला अवगत असलेले सगळे नाच करून दाखवले. वेस्ट इंडीजच्या क्रिकेट इतिहासात हा विजय सुवर्ण अक्षराने नोंदला जाईल. (सामनामधून).



ट्वेण्टी - २० वर्ल्ड कप धावफलक
वेस्ट इंडीज-श्रीलंका अंतिम सामना 
निकाल : वेस्ट इंडीज ३६ धावांनी विजयी

वेस्ट इंडीज धावा चेंडू ४ ६
चार्लेस झे. कुलशेखरा गो. मॅथ्यूज ० ५ ० ०
गेल पायचीत गो. मेंडिस ३ १६ ० ०
सॅम्युअल्स झे. मेंडिस गो. धनंजया ७८ ५६ ३ ६
ब्रााव्हो पायचीत गो. मेंडिस १९ १९ ० १
पोलार्ड झे. धनंजया गो. मेंडिस २ ४ ० ०
रस्सेल पायचीत गो. मेंडिस ० १ ० ०
सॅमी नाबाद २६ १५ ३ ०
रामदिन नाबाद ४ ४ ० ०
अवांतर : ५ (लेगबाइज २, वाइड ३)
एकूण : २० षटकांत ६ बाद १३७
गोलंदाजी - मॅथ्यूज ४-१-११-१, कुलशेखरा ३-०-२२-०, मलिंगा ४-०-५४-०,
मेंडिस ४-०-१२-४, धनंजया ३-०-१६-१
श्रीलंका (लक्ष्य १३८ धावा) धावा चेंडू ४ ६
जयवर्धने झे. सॅमी गो. नरिन ३३ ३६ २ ०
दिलशान त्रि. गो. रामपॉल ० ३ ० ०
संगक्कारा झे. पोलार्ड गो. बद्री २२ २६ २ ०
मॅथ्युज त्रि. गो. सॅमी १ ५ ० ०
जीवन मेंडिस धावचीत (ब्राव्हो/नरिन) ३ ३ ० ०
परेरा धावचीत (रामदिन) ३ ५ ० ०
थिरिमने झे. चार्लेस गो. सॅमी ४ ७ ० ०
कुलशेखरा झे. बद्री गो. नरिन २६ १३ ३ १
मलिंगा झे. ब्राव्हो गो. नरिन ५ १३ ० ०
मेंडिस झे. ब्राव्हो गो. सॅम्युअल्स १ २ ० ०
धनंजया नाबाद ० ० ० ०
एकूण : १८.४ षटकांत सर्व बाद १०१
गोलंदाजी - बद्री ४-०-२४-१, रामपॉल ३-०-३१-१, सॅम्युअल्स ४-०-१५-१,
नरिन ३.४-०-९-३, सॅमी २-०-६-२.

                                                                                                                  -ni3more

No comments: