Total Pageviews

Friday, September 21, 2012

प्रोब्लेम


             प्रोब्लेम म्हणझे काय मित्रानो? मित्रानो प्रोब्लेम हे सर्वांनाच असतात. पण त्यातून वाट काढणे हि महत्वाची  गोष्ट  असते. प्रोब्लेम हि अशी  गोष्ट आहे तिचे अनेक समस्यान मध्ये रुपांतर होऊ शकते. आपण पाहायला गेलो तर घरातली गृहिणीच पहा ना रोज सकाळी उठते आणि ती तिच्या नवर्यासाठी आणि मुलांसाठी  टीफीन बनवते. मुलांना  शाळेत जाण्यासाठी तयार करते  तेवढयात नवरा बायको कडून रुमाल मागतो आग ये रुमाल दे ग, घड्याळ दे ग अश्या आर्त स्वरात नवरा बायको कडून एक - एक मागण्या करत असतो. आणि ती गृहिणी  त्याच्या मागण्या पूर्ण करत असते. आणि ती गृहिण सर्वांचे काम आवरून मग स्वतः कामाला देखील  जाते. सकाळ मग चीड - चीड करते आणि बोलते तुम्हाला तर काही करायला नको मुलांना शाळेत सोडून यावे याचे काही नाही नुसते तुम्हाला चहा ढोसायला हवी आणि पेपर वाचायला हवे अशे काहीसे  चित्र  लग्न झालेल्या  काहींच्या  घरी दिसते याला काही अपवाद नाही.
         प्रोब्लेम ह्या जगात कोणाला नाही आपल्याला त्याला फेस करता आले पाहिजे. २१ व्या शतकात तर मुली ह्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून शिकत आहेत आणि त्या हि स्वताच्या पायावर उभ्या आहेत. अगदी पाहायला गेलो तर १७ व्या आणि १८ व्या शतकात अर्रेंज पद्धतीने लग्न होत असे म्हणून त्या काळात लग्न झालेल्या जोडप्यान मध्ये एवढे प्रोब्लेम नव्हते ते एकमेकान वर अतोनात प्रेम करत असे पण ते समजाच्या चौकटीत सीमित असत.ते लोक त्याचा गयावया कुठेच करत नसत. कारण तेव्हा कोण एवढे शिकलेले नव्हते त्यामुळे नवरा काही हि बोलला तर मुली मुग गिळून गप्प बसत असे आणि नवरा जे काम सांगेल ते निमूट पणे  करत असे. त्यामुळे एवढे प्रोब्लेम होत नसे आता ह्या २१ व्या शतकात सर्व जन पुढारलेल्या देशाचे अनुकरण करू लागले आहेत. आणि प्रेमविवाह करतात त्यामुळे ते लग्न जास्त काल टिकत नाही आपला जोडीदार आपल्याला जरा तरी काही बोलला तर त्याला प्रतिउत्तर करायचे आणि बायकोने काही बोलले तर नवर्याने प्रतिउत्तर करायचे.ह्या मधून कधी कधी वाद घटस्पोटा पर्यंत पोहचतो. मुळात पाहायला गेलो तर  दोघाच त्या कारणाला जबाबदार असतात. त्यामध्ये एकही जन समजून घेत नाही त्यामुळे हाप्रकार होतो. माझ्या मते संसाराचा गाडा हाकताना जोडीदारा मधले एक तरी व्यक्ती समजूतदार असायला हवी.तर हे प्रोब्लेम कधीच उदभवणार  नाहीत . म्हणजे आताच्या जगात समजूत दार पणा हा लोप पावत जात आहे असे मला वाटते. तरीही बोटावर मोजण्या इतकी काही जोडपी आहेत बरे का ते आपल्या पार्टनरला समजून घेतात आणि तिला तिच्या घरातल्या कामात मदत करतात. जर असा समंजस पणा सर्वान मध्ये उतरला तर  जीवनात कधी प्रोब्लेम येणारच नाहीत. प्रोब्लेम ह्या नावावर  फुल्ली मारून  आपण आपले जीवन सुख आणि समृद्धी करू शकतो.                                                                                                 - Ni3more
                                                 
                        

No comments: