Total Pageviews

Monday, September 10, 2012

ग्रामीण पत्रकारिता



Lecture Date : ३१-०८-२०१२ & ०६-०९-२०१२      व्याख्यात : सुनील पुहीकर .

                                                                                     विषय : ग्रामीण पत्रकारिता 

ग्रामीण पत्रकारिता कशी करावी?
आपल्याला ग्रामीण पत्रकारिता करायची असेल तर ग्रामीण भागातल्या राजकीय रचना आणि ग्रामीण शेतकर्यान पुढे  पडणार्या  समस्येचा  जाणीव असली पाहिजे. आपण ग्रामीण पत्रकारितेचा अभ्यास करायला गेलो तर आपल्याला महाराष्ट्राची भोगोलिक रचना माहित असली पाहिजे. महाराष्ट्राची भोगोलिक रचना ही पाच विभागात विभागली गेली आहे.विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिममहाराष्ट्र अशी विभागली गेलेली आहे. तसेच महाराष्ट्राचे विभाग मुंबई, कोकण,पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती असे पडतात.
 ग्रामीण पत्रकारितेमध्ये तीन प्रकारच्या बातम्या प्रसारित होतात 
१.Events २.Fact ३.Views Em-pressed .
ग्रामीण पत्रकारिता करताना आपल्याला ग्रामीण भागातल्या राजकीय रचना आणि ग्रामीण शेतकर्यान पुढे  पडणार्या  समस्या माहित असल्या पाहिजे.
ग्रामीण विभागातील सर्व जीवन हे कृषीवर आधारित असते.  ग्रामीण पत्रकारिता करताना पत्रकाराला आपण जी बातमी निवडणार आहोत ती बातमी निवडण्याचे ज्ञान असले पाहिजे. आणि जी बातमी लिहणार आहोत ती पूर्ण बातमीचा परिचय करून देणारी असावी.आणि आपण जी काही बातमी देणार आहोत ती तटस्त असली पाहिजे. पत्रकारितेचा विचार केला तर ती दोन भागांमध्ये विभागलेली आहे १.शहरी पत्रकारिता २.ग्रामीण पत्रकारिता.
हळूहळू आता वर्तमान पत्र आणि इलेक्ट्रोनिक मिडियाला लोकलटच  लागला. पहिला वर्तमानपत्र हे आठ - दहा पानांचे निघायचे पण आता वर्तमानपात्रांना लोकल टच देण्याच्या हेतूने नंतर वर्तमानपत्राच्या आवृत्या निघू लागल्या. इलेक्ट्रोनिक मिडिया मध्ये चोवीस तास बातम्या दिल्या जातात.

साधन  सुविधांचा  अभाव.
शहरी पत्रकारितेच्या तुलनेत आपण जर ग्रामीण पत्रकारितेकडे वळलो तर त्यामध्ये साधन सुविधांचा अभाव प्रकर्षाने दिसून येतो. समजा एखाद्या गावात एक घटना घडली आहे पत्रकाराला तिथे जाण्यासाठी अनेक साधनांचा आधार त्याला घ्यावा लागतो त्याला त्या घटना स्थळी पोहोचण्यासाठी त्याला बस बोला किवा बैलगाडी बोला अश्या तटपुंज्या सुविधांचा आधार घेत त्याला स्वखर्चावर तिथे त्यावेळेत पोहचून ती बातमी कव्हर करून त्या वेळात त्या बातमीचे रिपोर्टिंग करायचे असते. म्हणून शहरी पत्रकारीते पेक्षा ग्रामीण पत्रकारिता करताना साधन सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.

व्यक्तीचा सहभाग 
आपल्याकडे राजकारण हा विषय सध्याचा दृष्टीने खूप महत्वाचा विषय बनला आहे.तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पाहायला गेले तर काही जणाचा राजकारणात असलेला सहभाग (Involvement)  हा असेलच असे नाही तर काही जणाचा सहभाग (Involvement ) राज्यपातळीवर किवा अंतरार्ष्ट्रीय पातळीवर असू शकतो. हे प्रत्यक्षात त्या व्यक्तीवर अवलंबून असते.

वार्ताहर म्हणून नेमला?
जर तुम्हाला वार्ताहर म्हणून नेमला तर तुम्ही शहरी भागात काम करा किंवा ग्रामीण भागात काम करा तुमच्या मध्ये Basic skill असणे गरजेचे आहे.
तुम्हाला समजा अंतरार्ष्ट्रीय सभेला किवां एखाद्या ग्रामीण भागात वार्ताहर म्हणून नेमला तर आपल्याला वार्ता संपादन करण्याची क्षमता असली पाहिजे तसेच ती योग्य प्रकारे मदत आली पाहिजे.त्यासाठी आपल्या कडे skill असणे गरजेचे असते. एखाद्या पत्रकाराला बातमी द्यायची असेल तर कोणत्या बातमीवर बातमी होऊ शकते आणि कोणती बातमी आपण बातमी म्हणून निवडू शकतो ह्याचे पूर्ण ज्ञान असणे  गरजेचे असते.

कृषी 
ग्रामीण पत्रकारिता हि पूर्णपणे कृषी वर आधारित आहे. ग्रामीण विभागातील जीवन हे शेतीवर आधरित आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेती करताना बी - बियाणे, खत हे पुरवावी लागतात. साधारणतः आपल्या कोकण भागात रब्बी पिके आणि खरीप पिके घेतली जातात. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे  नेहमीचीच पिके घेतात. आणि साधारणतः शेतकरी तिसरे पिक घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कापूस पेरणारे वर्ष दोन वर्ष कापूसच पेरतात ज्वारी पेरणारे ज्वारी पेरतात. ह्या आधी पश्चिममहाराष्ट्रात खोब्राकडे नावाच्या शेतकर्याने तांदळाच्या पिकावर प्रयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ पिकवले  ह्याद्वारे ह्या शेतकर्याने crop pattern मधला ट्रेंड आणून त्यांनी HMT प्रकारचा तांदळाच्या जाती विकसित केल्या. आणि त्यावर वेगवेगळे प्रयोग करून तो तांदळाचा तुकडा किती मोठा आहे आणि तो खाण्यासाठी  किती सुगंधित आहे आणि खावयास किती चांगला आहे हे दर्शवून दिले. अश्या प्रकारे हल्लीच्या जगतात काही काही शेतकरी आहेत ते शेतीवर वेगवेगळे प्रयोग करून आपली शेती करतात.


शेतकऱ्यांच्या आत्महत्या 
ग्रामीण विभाग हा संपूर्णपाने शेतीवर अवलंबून असल्याने शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करतात त्यामुळे वर्षानुवर्षे त्याच जमिनीवर एकाचप्रकाराने शेती केल्याने जमीन नापीक होते आणि त्या जमिनीचे पिक देण्याचे प्रमाण कमी होते. आपण जर पाहायला गेलो तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात त्या मागील करणे हि खूप आहेत. शेतकर्यांना शेती करताना बी - बियांनान साठी सावकार कडून कर्ज  काढावे लागतात किवां घरातल्या करणान मुळे शेतकऱ्याला कर्ज काढावे लागते. आणि पाऊस अनियमित झाल्याने शेती नीट होत नाही त्या मुळे शेतकऱ्याला योग्य ते मानधन  मिळत नाही . एकीकडे सरकार कापसाचे चांगले उपन्न झाले तर सरकार लगेच काही दिवसाचे त्या आयातीवर निर्बंध लावते आणि त्या काळात लगेच मोठ मोठे दुकानदार सावकार आणि कारखान्याचे मलिक कमी किमतीत तोच माल शेतकर्यान कडून विकत घेतात आणि तोच माल बनवून जास्त किमतीत विकतात शेतकर्यांना मात्र त्या दरम्यान कमी किमतीत आपले पिक विकावे लागते त्यामुळे त्यांची कर्ज काढलेली रक्कम पण वसूल होत नाही त्यामुळे दिवसेंदिवस कर्ज काढून काढून त्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर होते त्यामुळे शेतकर्यांकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. तितेच सरकार त्या मालावारून बंदी उठवतो तेव्हा शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काहीच पडत नाही.

                                    

                                                                                                                        - Ni3more

No comments: