Total Pageviews

Monday, December 17, 2012

नरवीर चिमाजी अप्पा पुण्यतिथी

नरवीर चिमाजी अप्पा 


                                                               
                                                               किल्ले वसई सफर 
                आपल्या वसईला म्हणजे शूर्पारक नगरीला पौराणिक काळापासून ते ब्रिटीश काळापासून असा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
उत्तरेकडे वैतरणा दक्षिणेला उल्हास नदी तसेच पूर्वेला तुंग पर्वत व पश्चिमेला विशाल समुद्र ह्यामुळे वसईला भौगोलिक दृष्टीने खूपच महत्व प्राप्त झाले होते.
अनेक तीर्थक्षेत्र , तलाव, बावखले ह्यांनी वसईची जमीन खूपच सुपीक होती. आशियातील सर्वोत्तम प्रतीची साखर आपल्या वसई मध्ये बनत असे.
शूर्पारक बंदरातून अखाती देशांशी इथे मिळणारे मसाले, साखर ह्या सारख्या अनेक उत्पादनांचा व्यापार चालत असे. बोट बांधणी साठी शूर्पारक फारच प्रसिद्ध होते.
किंबहुना म्हणूनच अनेक परकीय आक्रमण इथे झाली. ई.स. १५१५ च्या दरम्यान पोर्तुगीजांनी ह्या भूमीत पाऊल ठेवले त्यानंतर ई.स. १७३९ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांनी तीन वर्षे झुंज देऊन पोर्तुगीजांना परास्त केले व वसई परकीय सत्तेपासून मुक्त केली. आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या पोर्तुगीजांवर पारंपारिक शास्त्रांच्या सहाय्याने मिळवलेला हा विजय महत्वाचा होता.
युरोपीय सत्तेविरोधातील भारतीयांचा हा पहिलाच विजय वसई मध्ये झाला ह्याचा वसई करांना सार्थ अभिमान वाटायला हवा. परंतु ह्या उज्ज्वल इतिहासाची साक्ष देणारा आपला वसईचा किल्ला, अनेक महत्वाचा ऐतिहासिक वास्तू मात्र उपेक्षित अवस्थेत आहेत. वसईतील सुशिक्षित युवा वर्ग हा उपजीविकेसाठी रोज मुंबई व उपनगरांमध्ये प्रवास करत असतो ह्या धकाधकीच्या जीवनात ह्या सार्यांचा विसर पडत चालला आहे. पण तरीही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहणाऱ्या अनेक युवकांनी एकत्र येऊन आपल्या वसईचे ऐतिहासिक महत्त्व जाणून आपल्या अस्तित्व आणि आदर्शाच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावून झुंजणाऱ्या नरवीर चिमाजी अप्पा व २२००० शहीद मराठा सैन्याला आदरांजली देण्यासाठी...हि स्फूर्ती यात्रा काल काढली होती.
होय स्फूर्ती यात्राच कारण इथून पुढे आपल्याला लढाचय ते वसईतील निसर्ग समृद्धी जपण्यासाठी... अनेक तलाव बावखले, हिरव्यागार पानफुलांच्या वाड्या आता नसता होत चालल्या आहेत... ते वैभव जपण्यासाठी मोहीम हाती घ्यायची आहे म्हणून हि स्फूर्ती यात्रा काल निघाली होती!!!    
                  आज चिमाजी अप्पाची आज १७ डिसेंबर २०१२  पुण्यतिथी असल्याने काल दिनांक १८ डिसेंबर २०१२ रोजी चिमाजी अप्पाच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी आणि वसई किल्ला जिंकताना चिमाजी अप्पानी   किती महत्व पूर्ण भूमिका निभावली होती आणि मराठ्यांचा इतिहास कळण्यासाठी फेसबुक वरील वसई लाईव ह्या ग्रुप ने पुढकार घेवून हि यात्रा आयोजित केली होती ह्या यात्रेत मी आणि माझ्या मित्रांनी आवर्जून हजेरी लावली. हि यात्रा सकाळी ८ वाजता चिमाजी अप्पा स्मारकापासून पासून सुरुवात झाली. सर्वात पहिला चिमाजी अप्पांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन मग हि यात्रा पुढे सरकत गेली. जवळ जवळ शंभर ते दीडशे इतिहास प्रेमींनी ह्या यात्रे मध्ये सहभाग घेतला होता.ह्या यात्रे मध्ये चिमाजी अप्पांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी कसा हा किल्ला काबीज केला आणि आपल्या पराक्रमाची शिकस्त कशी दिली पोर्तुगीजांना त्याची इत्त्म्भूत माहिती देण्यात आली.


                                                                                                    Posted By
                                                                                                     ni3more

No comments: