Total Pageviews

Tuesday, February 26, 2013

....!!! मराठी राजभाषा दिन !!!...


                     
                     ....!!! मराठी राजभाषा दिन !!!...


आपल्याला अगदी परिचयाचे आणि जवळचे मराठी लोकप्रिय कवी, लेखक, समीक्षक व नाटककार विष्णु वामन शिरवाडकर म्हणजे  कुसुमाग्रज यांचा उद्या जन्म दिवस. ते मराठीतील एक आत्मनिष्ट व समाज निष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक मानले जातात. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने आपले लेखन केले.ते सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक होते. त्यांनी दिलेले योगदान पाहून त्यांचा जन्म दिवस हा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.
आपण मराठी माणसांनी कधी विचार केला आहे का आपली मराठी भाषा का लुप्त होत चालली आहे जर हा भाषादिना दिवशी मी घेतलेला आढावा. अठराव्या शतकात इंग्रज आले.इंग्रज आपल्या देशात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले. आपला देश हिंदू भाषिक असल्याने त्या काळात आपल्या इथे मराठी भाषा आणि हिंदी  भाषा सर्रास बोलली जात होती.  इंग्रज त्या काळी आपल्या इथे व्यापार करण्याच्या उद्देशाने आले होते आणि त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा घेऊन इथे आपल्या व्यापाराची सुरुवात केली. तेव्हा इंग्रजांनी ईर-ट इंडिया कंपनीची र-थापना केली. आपल्या ईथे मराठी आणि हिंदी बोलली जात असे. येथील लोकांना इंग्रजी भाषा यावी आणि त्यांना इथे व्यापार करणे सुलभ व्हावे म्हणून त्यांनी इथे इंग्रजी शाळा काढल्या आणि येथील लोकांनी इंग्रजी शिकावी आणि त्यांनी त्यांच्या स्वार्थ साठी इंग्रजी भाषेचा प्रसार करायला सुरुवात केली.  तेथ पासून इंग्रजी भाषा इथे रूढ झाली.  ती आजतागायत. त्याकाळात आपल्या इथे मोठ मोठे संत होऊन गेले. उदाहरणार्थ: संत तुकाराम, ज्ञानेश्र्वर, सावतामाळी, बहिणाबाई आदि. ह्यांनी त्याकाळात आपल्या मातृभाषा (मराठी भाषेचा ) प्रसार केला.ज्ञानेश्वरांनी आपल्या ओव्यांतून आणि तुकारामांनी आपल्या अभंगातून मराठीचे महात्म्य सांगितले आहे. पण इंग्रज आले आणि त्यांनी मराठी भाषेला डावलून इंग्रजी भाषेचा प्रसार करायला सुरुवात केली. पण आपण पाहायला गेलो तर आताच्या एकविसाव्या शतकात आपली मराठी भाषा एवढी लुप्त होत चाली आहे कि विचारायला नको . अलीकडे मराठी शाळेच्या अनुदानावरून आणि मराठी महापालिका शाळा बंद करण्याच्या बंडच काही राजकीय पक्षाने माडला होता.त्यातच आपली मराठी माध्यमाची शाळा आणि भाषा ह्या राजकीय उद्देशा पायी भरडून निघाली. सी बी एस ई , आय सी एस ई आणि इंग्रजी माध्यमिक शाळामुळे आपली मराठी माध्यमिक शाळा आणि मराठी भाषा भरडून निघाली.  आपण ह्या सर्व कडे लक्ष देवून आपली मराठी भाषा लुप्त होणार नाही आणि आपली मराठी मायबोलीचा प्रसार करण्यासाठी आपण सर्व मराठी माणसांनी योग्य ते पाऊल उचलले  पाहिजे. पण अलीकडच्या काळात पाहायला गेलो तर मराठीसाठी अभिमान वाटावी असे चित्रपट थेट ऑस्कारपर्यंत श्वास सारखे चित्रपट जाऊन आले. तसेच हल्लीच आपल्या मराठी भाषेला आणि मराठी माणसाला गर्व वाटावा असे  स्टार प्रवाह वरचे दोन कार्यक्रम १. होम मिनिस्टर २.डान्स महाराष्ट्र डान्स  ह्या दोन सिरियल ब्रिटन मध्ये हप्त्यातून दोन दिवस त्यांच्या टिव्ही चेनल वर दाखवण्यात येणार आहेत. हि तर खरच आपल्या मराठी माणसा साठी गर्वाची बाब आहे हे आपण विचार करून आपल्या मराठी भाषेचा प्रसार करावा. आजच्या काळात इंग्रजी आपण शिकू नाय असे मी बोलत नाही पण आपण आपल्या मराठी भाषेला हि विसरून चालणार नाही. आपल्या मराठी इतिहासात मोठ मोठ्या कवींनी महत्वाचे योगदान दिले आहे हे आपण विसरून चालणार नाही. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्म दिनी आज मराठी भाषा दिन साजरा करूया.


                                                "पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
                                                आपुल्या घरात हाल सोसते मराठी
                                                 हे असे कितीक खेळ पाहते मराठी
                                                 शेवढी मदांध तख्त फोडते मराठी"                              
                                  ....!!! मराठी भाषा दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!....
-Ni3more

No comments: