Total Pageviews

Wednesday, February 27, 2013

...!!!आमुची मायबोली !!!...


...!!!आमुची मायबोली !!!...
मराठी असे आमुची मायबोली जरी
आज ही राजभाषा नसे,
नसो आज ऐश्वर्य या माउलीला,
यशाची पुढे दिव्य आशा असे,
जरी पंचखण्डांतही मान्यता घे
र-वसत्ताबळे श्रीमती इड.ग्रजी,
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा
तिच्या, तीस केवी त्यजी?

 जरी मान्यता आज हिन्दीस देई उदेलें
नवे राष्ट्र हें हिन्दवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची
जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं उत्तरीं वा असूदक्षिणिं
दूर तन्जावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी.

मराठीअसे आमुची मायबोली जरी
भिन्नधर्मानुयायी असुं,
पुरी बाणली बन्धुता अन्तरड्.गी, हिच्या
एक ताटांत आम्ही बसूं; 
हिचे पुत्र आम्हा हिचे पाड्.ग फेडूं , वसे 
आमुच्या मात्र हन्मन्दिरी,
जग न्मान्यता हिस  अप्रू प्रतापे हिला 
बैसवू वैभवाच्या शिरी.

हिच्या लक्तरांची असे आज आम्हा,
नका फक्त पाहू हिच्या लक्तरं 
प्रभावी हिंचे रूप चापल्य देख पदवी 
फिकी ज्यापुढे अप्सरा;
न घालू जरी वाड्मया तील उंची हिरे 
मोतियांचे हिला दागिने,
मराठी असे आमुची मायबोली, वृथा हि 
बढाई सुकार्याविणे.
मराठी असे आमुची मायबोली, अहो,
पारतंत्र्यात हि खड्.गली,

हिची थोर संपती गेली उपे क्षेमुळे खोल 
 कालार्णवाच्या तळीं,
तरी सिन्धु  मन्थुनि  काढुनि रंत्ने नियोजूं
तयांना हिच्या  मण्डनीं-
नको रीण ! देवोत देतील तेव्हा जगांतील 
भाषा हिला खण्डणी.
                   
                          -माधव जुलियन 
No comments: