Total Pageviews

Friday, February 15, 2013

Kala Ghoda Art Festival 2013.

                  Kala Ghoda Art Festival 2013.


दर वर्षी काळाघोडा कला महोत्सवात कला, संगीत, थिएटर, कार्यशाळा, फोटोग्राफी, सेमिनार, नृत्य  तसेच सांस्कृतिक, साहित्यिक, कलात्मक,  खवय्येगिरी  अश्या प्रकारच्या एका पेक्षा एक सरस कार्यक्रमाचा खजिना  कला घोडा फेस्टिवल दरवर्षी मुंबईकरांसाठी घेऊन येते.  कला घोडा फेस्टिवल दरवर्षी दक्षिण मुंबई मध्ये २ फेब्रुवारी ते  १० फेब्रुवारी यादिवशी भरवण्यात येते.  कला घोडा फेस्टिवल पूर्ण नऊ  दिवस चालतो. काळाघोडा फेस्टिवल हे प्रत्येकासाठी एक पर्वणीच असते. केवळ भारतातूनच नाही, जगातून परदेशी पर्यटक ह्या फेस्टिवलला न चुकता हजेरी लावतात. हे  फेस्टिवल प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी खुले असते आणि प्रत्येक जण  ह्या फेस्टिवल मध्ये उत्साहाने सहभागी होते. दरवर्षी इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतले कार्यक्रम होतात पण ह्या वर्षी आवर्जून मराठी भाषे मधले कार्यक्रम ठेवण्यात आले होते. कला घोडा फेस्टिवल मध्ये प्रवेश करतानाच मुंबईची धंदा (व्यवसाय) संस्कृती वरची एक प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ह्या वर्षी भारतीय सिनेमा सृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे बॉलीवूड च्या सिने तारकांचे पोस्टर उभारण्यात आले होते. तसेच दादासाहेब फाळके यांच्या भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला होता. ह्याचे निमित्त साधून वंदना गुप्ते, सुमित राघवन,जॅकी श्रॉफ,शबाना आझमी, उषा उत्थुप  इ. कलाकारांनी या महोत्सवाला भेट दिली. तसेच वसंत डहाके यांच्या हातून  पॉप्युलर प्रकाशनाच्या  'जास्तीचे नाही' ह्या मराठी अनुवाद पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लहान मुलां साठी चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आली होती. तसेच त्यांच्या साठी वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.
           

मुंबई हि स्वप्नाची नगरी. ह्या स्वप्नाच्या नगरी मध्ये रोजच्या रोज हजारो लोक काम करण्या साठी इथे येतात. येथिल धंदा (व्यवसाय) हा इथला मुख्य उदरनिर्वाहाचे साधन आहे. अश्याच प्रकारे धंदा ह्या प्रतिकृती मधून मुंबईची धंदा (व्यवसाय) संस्कृती काहीशी साकारली आहे ह्या फोटो मध्ये.


(शंभरी सिनेमाची )
दादा साहेब फाळके ह्यांनी भारतीय चित्रपटाची सुरुवात हरिश्चंद्र ह्या चित्रपटाने केली. ह्या इंडस्ट्रीला ह्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून गाजलेल्या चित्रपटांचे पोस्टर ची प्रतिकृती साकारली होती. 


दादासाहेब फाळके यांचा पुतळा साकारण्यात आला होता.

 

         
कासवात स्वतःचे अंग आत ओढून घेण्याची शक्ती असते. तसेच माणसाला स्वताच्या इंद्रियांवर संयम ठेवता आला पाहिजे. जेव्हा तो इंद्रियांवर संयम ठेवता तेव्हा त्याची  बुद्धी स्थिर होते.  म्हणून माणसाने योग्य ते नियंत्रण आपल्या शरीरावर ठेवले पाहिजे. वसईच्या सचिन चौधरी या तरुणांनी हि कासवाच्या रूपातील प्रतिकृती सादर केली होती.

मुंबईचा डब्बेवाला

नेहमीच दुर्लक्षित पण लक्षात राहणारा हा असा  मुंबईचा डब्बेवाल्याची प्रतिकृती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.विक्रम अरोरा ह्या तरुणांनी ह्या प्रतिकृती मधून आपले नेते किती  करप्ट आहे हे हया प्रतिकृती मधून साकारले.फक्त त्यांना पैशाची भाषा कळते हे या प्रतिकृती मधून साकारण्यात आले होते.
         हल्ली आपल्या मुंबई मध्ये एवढे प्रदूषण झाले कि ह्या प्रतिकृती मधून  कि सायकल चलाओ सीटी बचाव असा  संदेश देण्यात आला आहे.


                                            
                    

तुम्हाला हा फोटो पाहून एखादे फॅशन शो चे फोटो आपण पाहत आहोत असे वाटत असेल ना पण ते तसे नसून  मुंबईत माणसाला जगण्यासाठी नेहमीच तारेवरची  कसरत करावी लागते. अश्याच या तारण पासून माणसाची प्रतिकृती साकारली होती आणि ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. 
                          
                                                                     प्रसिद्ध लावणी सम्राज्ञा 

 काळाघोडा फेस्टिवल मध्ये छोट्यान बरोबर मोठे हि अगदी फोटो काढण्यात दंग झाले होते. अगदी लहानान पासून ते मोठ्यान पर्यंत सर्व जण वेगवेगळ्या पोझ मध्ये फोटो काढून घेत होते. येथे मुंबई मधले लाइफ स्टाईल चे दर्शन घडवण्यात आले. त्याच प्रमाणे विविध हस्तकलांचे प्रदर्शन आणि विक्रीचे स्टॉल्सही येथे उभारण्यात आले होते . खिशाला मस्त फोडणी देणारी खवय्यांसाठी मेक्सिकन, इटालियन या फूडची चवही येथे चाखता येत होती.     


                                                                               -  Continue the next post Part 2

No comments: