Total Pageviews

Monday, May 6, 2013

नगर जवळ दरोडेखोरांनी ट्रॅव्हल्स बस लुटली.


नगर जवळ दरोडेखोरांनी ट्रॅव्हल्स बस लुटली.

नगर-सोलापूर रस्त्यावरील मिरजगाव येथे असलेल्या  मानव हायवे पेट्रोल पंपावर रविवारी आठ दरोडेखोराने एका खाजगी ट्रॅव्हल्स बस  वर दरोडा घातला.

मिळालेल्या माहितीनुसार काल रविवारी, हि बस शनिशिंग नापुर हून आंध्र प्रदेशात  जायला निघाली होती. हि बस पेट्रोल पंपावर आली असताना बस अडवून दरोडेखोरांनी त्यामध्ये प्रवेश केला.  दरोडेखोरांनी तलवार आणि इतर हत्यारांचा लोकांना धाक दाखवून त्यांच्या कडील सोने - चांदी लुटले. तसेच पैशे हि लुटले. काही लोकांना मारहाण हि केली. दरोडेखोरांनी  लाखो रुपयाचा ऐवज लुटल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिस घटना स्थळी दाखल झाले. दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.

No comments: