Total Pageviews

Wednesday, May 8, 2013

कर्नाटकात कॉंग्रेसला सत्ता स्थापणे साठी स्पष्ट बहुमत.


बंगळूर - ता ७ कर्नाटकात कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाला (भाजप) हातावर तुरी देत विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवले. येडीयुरप्पा यांचा कर्नाटक जनता पक्षामुळे भाजपला निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांची तिसर्या स्थानापर्यंत पिछेहाट झाली .

कर्नाटकात रविवारी (ता. 5) झालेल्या मतदानानंतर आज (बुधवार) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली होती. सकाळी साडेदहाच्या दरम्यान कर्नाटकमधील पहिला विजय नोंदविला गेला. पुत्तुर मतदारसंघातून काँग्रेसच्या शकुंतला शेट्टी यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. तर बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवारही आघाडीवर आहेत.

२००८ मध्ये दक्षिणेत ( कर्नाटकात) पहिल्यांदाच सत्ता स्थापन करू शकलेल्या भाजप पक्षाला, मात्र ह्या वेळेला आपली सत्ता टिकवता आली नाही आणि पाय उतार व्हावे लागले  आहे. सत्ता स्थापनेसाठी २२४ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता असते. पण आता पर्यंत मिळालेल्या आकड्यात कॉंग्रेसला ११६ जागा मिळवल्या आहेत. तर  दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत ४२ जागा जिंकल्या आहेत. भाजपला अवघ्या ३७ जागा जिंकता आल्या आहेत.येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाला (केजेपी) 12 जागांवर जिंकता आल्या आहेत.

कर्नाटकातील निकालाबाबत मतदानोत्तर चाचण्यामध्ये चाचण्यांमध्ये (एक्‍झिट पोल) निकाल काढला असता भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावे लागेल आणि कॉंग्रेस ला ११० ते  ११३ जागा मिळतील असे वर्तवण्यात आले होते.जर कॉंग्रेस ला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षातील काही नेत्यांनी दर्शविली होती, पण सत्तास्थापनेसाठी इतर कोणत्याही पक्षाची मदत लागणार नाही, असा विश्‍वास कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केला होता. काँग्रेस नेत्यांचा हा विश्वास खरा ठरला आहे. आघाडी मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंगळूर आणि नवी दिल्लीतील पक्ष कार्यालयाबाहेर फटाके वाजवून आनंद साजरा केला.
            

No comments: