Total Pageviews

Tuesday, May 14, 2013

शरण येण्यास नाही मिळणार मुभा.


नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला शरण येण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही असे आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले. संजय दत्त 1993 मध्ये झालेल्या स्पोटा प्रकरणी दोषी आहे. याप्रकरणी संजय दत्तला न्यायालयात शरण येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संजय दत्तची मुदत वाढ देण्याची याचिका याआधीच न्यायालयाने फेटाळून लावली
आता दोन निर्मात्यांनी संजय दत्तला मुदत वाढ देण्याची याचिका दाखल केली होती. आज यावर सुनावणी होत न्यायालयाने याचिका फेटाळत 16 मे रोजीच शरण येण्यास सांगितले आहे. संजय दत्त ला याधीच चार आठवड्यांची मुदत न्यायालयाने दिली होती. पण संजय दत्त ने सहा महिन्याची मुदत मागितली होती.
संजय दत्तला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनाविलेली आहे. त्यातील दीड वर्षांची शिक्षा त्याने भोगली असून, आणखी साडेतीन वर्षे त्याला कारागृहात रहावे लागणार आहे.

No comments: